Thursday, September 17, 2020

कारुण्य कोकिळा/ छोटा पावशा/Grey-bellied Cuckoo

*Grey-bellied Cuckoo* *कारुण्य कोकिळा/ छोटा पावशा* *Grey-bellied Cuckoo* Cacomantis passerinus

Rather small cuckoo of open forests and forest edge. Typical adult is gray all over. Some females are “hepatic” and are ginger-orangish with black barring on the back and on the undersides. Song is a high, fading “ki-keeeer...” often given either very early or very late in the day. Breeds in foothill and montane forests, but migratory individuals typically winter in lowlands.


*Uday Parab*

*Isha Tours*



Wednesday, September 16, 2020

शिपाई बुलबुल - Red-whiskered Bulbul


 

शिपाई बुलबुल (Red-whiskered Bulbul ) हा पक्षी साधारण २० सें. मी. (८ इं) लांबी,चा आहे. पाठीकडून तपकिरी-बदामी रंगाचा, पोटाकडून पांढरा, डोके काळे, त्यावर मोठा टोकदार, काळा तुरा, डोळ्यांजवळ लाल कल्ले, तसेच गालावर पांढरा पट्टा आणि लाल रंगाचे बूड. नर-मादी दिसायला सारखेच. हा पक्षी लाल बुडाचा बुलबुलसारखा वाटतो मात्र डोक्यावरील मोठा तुरा आणि डोळ्यांजवळ असलेले ठळक लाल आणि पांढरे भाग हा या दोन पक्ष्यांमधील फरक आहे.

फेब्रुवारी ते ऑगस्ट हा काळ या पक्ष्यांचा प्रजनन काळ असून यांचे घरटे द्रोणाच्या आकाराचे असते. घरटे बहुधा एखाद्या झुडपात किंवा बांबूच्या रांजीत असते. तसेच ते कडेकपारीत किंवा एखाद्या ओसाड घराच्या छताला लागून असलेलेही दिसून येते. मादी एकावेळी २ ते ४ अंडी देते. यांची आणि लाल बुडाचा बुलबुलची अंडी साधारण सारखीच दिसतात. पिलांचे संगोपन वगैरे सर्व कामे नर-मादी मिळून करतात.

*Uday Parab*

*Isha Tours*


Tuesday, September 15, 2020

नवरंग - Indian Pitta


 

नवरंग हा उत्तरेकडील थंडीपासून बचाव करण्यासाठी आपल्या स्थलांतर करत असुन साधारण मे-जुन मध्ये आपल्या कडे त्याचे आगमन होते.

हा पक्षी खूप लाजाळू आहे. दिसायला अतिशय सुंदर, सुरेख आणि रंगीत पक्षी. साधारण बुलबुल इतका. (साधारण १९ सेमी) डोक्यावर फिक्कट तपकिरी-पिवळ्या रंगाचा मुकुट व त्यांच्या मधोमधुन माने कडे जाणारी काळी पट्टी. राखाडी चोच व चोची पासुन निघून डोळ्याच्या आरपार गडद काळी पट्टी माने पर्यंत जाते. तर त्याच्यावरून एक बारीक पांढरी पट्टी व तिच्या खालुन कंठा पर्यंतचा भाग पांढरा. काळ्या रंगाचे आयरेस असलेले गडद तपकिरी डोळे व डोळ्या भोवती राखाडी रिंग आहे, डोळ्या खाली लहानशी पातळ पांढरी रेष. पाठीचा व पंखांचा रंग हिरवा पोपटी त्याच्या पिसांवर फिक्कट तांबडी छटा. पंखाच्या बाजूला फिक्के हिरव्या -निळ्या चमकदार पॅच असुन पांढर्‍या रंगाचा प्याॅच आणी पंखांच्या टोकावर पांढरा लहान प्यॉच उडतांना सहजच दिसतो. छाती व पोटा कडील भाग फिक्कट तपकिरी पिवळ्या रंग व पोटा खालील बुडाकडील भाग केशरी लाल, लहान गोलाकार शेपटी त्यावर काळ्यारंगा वर नळ्या रंग आणि एकदम टोकावर पांढरी बारीक धार.परंतु शेपटी स्पष्टपणे दिसत नाही कारण ती जवळजवळ पंखांनी झाकलेली असते. फिकट गुलाबी रंगाचे रंगाचे लांब व मजबूत पाय आहेत.


आहारामध्ये मुख्यत्वे लहान कीटक, अळ्या, मुंग्या, बीटल, कोळी, गांडुळे, लहान नाकतोडे असल्या कारणाने बर्‍याचदा कीटकां करिता सकाळी संध्याकाळी पानांच्या कचर्‍याच्या भोवताली जमिनीवर थिरकताना अन्न शोधताना दिसतो. तसेच दाट झुडपात दिसतो.
*Uday Parab*

*Isha Tours*


Monday, September 14, 2020

भारद्वाज पक्षी/Greater coucal /crow pheasant



 *भारद्वाज पक्षी* [ *Greater coucal /crow pheasant* -Centropus sinensis ] डोंबकावळ्याच्या आकाराचा असतो.संपुर्ण शरीर रखरखीत काळ्या रंगाच असून त्यावर लाल मतकट विटकरी रंगाचे पंख असलेला हा पक्षी त्याच्या लांबसडक पंख आणि शेपटीमुळे नजरेत भरतो. मोकळ्या माळरानांवर, झाडांवर, मानवी वस्त्यांजवळ सहज वावरणारा हा पक्षी त्याच्या गुंजेसारख्या लाल डोळ्यांमुळे कायम लक्षात रहातो.भारद्वाजाची शेपटी देखील या कुटुंबाच वैशिष्ठ्य दाखवणारी असते. एकावर एक पिसं असलेली ही शेपटी जणू पायऱ्या पायऱ्याच वाटावी अशी असते. कोकणात कुक्कुड कोंभाम्हणुन ओळखला जाणारा हा पक्षी नर आणि मादी सारखेच दिसतात.


भारद्वाज पक्षाचा आहार त्याला साजेल असाच असतो. मोठे किडेमकोडे, आळ्या, गोगलगाई, विविध सुरवंटे, लहान उंदीर, सरडे खाणारे हे पक्षी अजुन एका गोष्टी साठी प्रसिद्ध आहेत. हे दुसऱ्या लहान पक्षांची अंडी पळवतात नी खाऊन टाकतात.



या दादा पक्षाचा मिलनाचा काळ साधारण पावसाळ्यानंतर समजला जातो. नर मादीच्या मागे मागे फ़िरुन तिला वश करण्याचा प्रयत्न करतो. या वशिकरणासाठी तो तिला खाण्याचे पदार्थ भेट म्हणुन देतो जे ती स्विकारते. मिलनाच्या हंगामात नर आणि मादी एकाच जोडीदाराबरोबर संधान साधतात. मिलनानंतर, नर भारद्वाज उंच झाडावर, कपाच्या आकाराचे घरटे साधारण ५ ते ८ दिवसात बनवतो. या घरट्यासाठी, तो बांबूच्या पानांचा, सुकलेल्या वेलीचे तुकडे आणि काटक्या वापरतो. हे घरटे तयार झाल्यावर मादी त्यात ३ ते ५ अंडी घालते. साधारण १५ ते १६ दिवसांत यातून पिल्ले बाहेर येतात. अंडी व पिल्लांच्या संगोपनाची जबाबदारी दोन्ही पालक पार पाडतात हे खास. असा हा भारद्वाज त्याच्या ओरडण्यासाठी प्रसिद्ध आहे. कूप कूप असा धीर गंभीर आवाज अनेकदा सकाळच्या पारी किंवा उतरत्या संध्याकाळी ऐकायला येतो. हाच तो भारद्वाजाचा आवाज. एका वेळेस साधारण ३/४ पासून १५/२० वेळा हा आवाज भारद्वाज काढतो. संपुर्ण भारतात सापडणारा हा पक्षी अनेकदा जमिनीवर उड्या मारताना दिसतो याचं कारण याच्या फ़्लाईट्स म्हणजेच भराऱ्या फ़ार तिव्र नसतात. नर मादी म्हणजे जोडीजोडीने फ़िरणारे भारद्वाज अनेकदा आपण पहातो. याला आपल्याकडे शुभशकुन समजतात तर उत्तरेकडे अनेक ठिकाणी अशुभ समजतात. आता हा कूप कूप आवाज आल्यावर समजा की तुमच्या जवळपास भारद्वाज असणार*
*Uday Parab*

*Isha Tours*

Thursday, August 20, 2020

मध्यरात्रीच्या सूर्याचा प्रदेश

 

नॉर्वेचं मुख्य आकर्षण आहे, ‘नॉर्दन लाईट्स’.

प्रकाशाच्या या अनोख्या खेळात पोपटी, तांबूस, लाल, छटांनी आकाशाचा कॅनव्हास रंगत असतो आणि आपल्या मनात यह कौन चित्रकार हैया ओळी नकळतच येऊन जातात

माझ्या गावच्या काळ्याभोर आकाशातल्या ध्रुव ताऱ्यांकडे पाहताना मला ध्रुवं या शब्दाची प्रथम ओळख झाली पुढे पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांबद्दल आकर्षण वाटायला लागलं . पृथ्वीचं ते टोक गाठण्याची माझी मनीषा मला स्वस्थ बसू देईना नॉर्वे फिनलँड, डेन्मार्क, स्वीडन आणि आइसलँड या देशांचा समावेश असलेल्या स्कँडिनेव्हिया प्रदेशात मी नुकतीच भटकंती करून आलो. आर्टिक आणि अंटार्टिका या दोन्ही ध्रुवांवर मनसोक्त फिरायचं आणि तो अद्भुत दुनिया पाहायची हे माझ स्वप्न आर्टीकपासून सुरु झालं. परिकथेतील ती दुनिया याची देही याची डोळा पाहताना मला स्वर्गाहून रम्य वाटलं हे इथे नमूद करायलाच हवं. चहूबाजूंना पसरलेलं बर्फ़, त्यावर केले रंगीबेरंगी रोषणाई, दूर आकाशात वीस-बावीस तास ठाण मांडून बसलेले तारे-तारका, स्वच्छ व नीटनेटकी घर आणि इमारती हिवाळ्याच्या दिवसात रस्त्यावरून उणे दहा-पंधरा तपमान असूनही विनाव्यतय चालणाऱ्या बस, ट्राम आणि रेल्वेगाड्या, मर्सिडिस बेंझच्या टॅक्सी, तसेच या सर्व ठिकाणांना व्यापून राहिलेलं वाय-फाय, निसर्ग आणि आधुनिक मानवाने जे जे निर्माण केलं, ते ते अगदी निगुतीनं राखलेलं इथे आपल्याला पाहायला मिळतं. नॉर्वे या देशाच्या ओस्लोया राजधानीच्या शहरात पाऊल टाकताच एका अनोख्या जगात आपण प्रवेश करतोय याची जाणीव होते. मूळचा व्हायकिंग या सागरी चाच्यांच्या जमातीचा असलेला हा देश १९६५-७० दरम्यान सापडलेल्या तेल आणि नैसर्गिक वायूंच्या साठ्यांमुळे जगातील श्रीमंत देशांमध्ये गणला जाऊ लागला. प्रामाणिक माणसांच्या या देशाने फार लवकर प्रगती केली आणि त्याला आजची संपन्नावस्था प्राप्त झाली नॉर्स्क हि जर्मन भाषेला जवळची असलेली भाषा इथे बोलली जाते तसंच क्रोनरहे इथलं चलन आहे. असं असलं तरी युरो इथे सर्सास चालतात.


ऑस्लोमध्ये असलेलं व्हीजिलंट स्कल्प्चर पार्क हे शिल्पाकृतींनी समृद्ध असलेलं ठिकाण पाहायला वेळ द्यावा तेवढा कमीच पडतो. शिल्पाकृतीच हे अनोखं विश्व आपल्या मनात कायमच घर करून राहत. मानवी जीवनाचे नवीन पैलू आणि भावविशेष यांच मनोज्ञ दर्शन या शिल्पांमधून घडतं. स्तावांगर हे तेल आणि नैसर्गिक वायूंचं यूरोपातलं एक प्रमुख केंद्र आहे. जगातील एक अतिशय सुंदर असा हा देश सौदंर्याच्या बाबतीत स्विझर्लंडहूनही अधिक देखणा आहे. विरळ लोकसंख्या (१५.५ प्रति चौरस किमी) असलेल्या या ठिकाणी मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरातून आपण जाऊन पोहचतो तेव्हा या ठिकाणचे आपण राजेच असल्याचा भास होतो. प्रत्येक घरात जगातील उत्तम ब्रँड असलेली वाहन दिमतीला असली तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचाच वापर आठवड्यातील किमान पाच दिवस तरी इथल्या जनतेकडून केला जातो. समाजातील सर्व स्तरातील लोक जवळच्या प्रवासासाठी सायकलचाच वापर करतात. इथले पंतप्रधानही त्याला अपवाद नाहीत. सप्ताहच्या अखेरीस दूरवर फिरायला जाण्यासाठीमात्र स्वतःच्या वाहनाचा वापर केला जातो. श्रीमंत आहे उच्च राहणीमानासाठी ओळखल्या जाणाऱ्या या देशातील जनतेने पर्यावरण आणि देशप्रेम आपल्या कृतीतून जपलं आहे. संसाधनांचा वापर, आहे म्हणून न करता तो गरजेचा आहे ना? हे प्रथम पहिलं जात. रस्त्यावरची अनावश्यक वर्दळ आणि गोंगाट इथे पाहायला मिळत नाही. वागण्या-बोलण्याची श्रीमंतीही असलेली इथली माणसं खरंच प्रेमळ आणि सुस्वभावी आहेत. बाराही महिने कमी अधिक प्रमाणात पाऊस आणि बर्फ पडत असला तरी एप्रिल, मे इथले वसंत ऋतूचे महिने. पुढे जून ते ऑगस्ट उन्हाळा असतो. सप्टेंबरच्या दरम्यान सोसाट्याच्या वाऱ्यांबरोबर इथला मोसम बदलायला लागतो. तुफानी वाऱ्यातच ऑक्टोबर गेल्यावर नोव्हेंबर ते मार्च ध्रुवीय प्रदेशातील थंडी सारा आसमंत आपल्या कवेत घेत असते. बर्फाची चंद्र एकदा का ओढून घेतली कि मग पुढचे पाच महिने ती दूर होण्याचं नाव नाही. या धरविया प्रदेशातला दिवसही असाच हिवाळ्यात वीस-बावीस तासांची रात्र आहि उन्हाळ्यात तेव्हढाच मोठा दिवस. या अश्या विषम वाटणीमुळेच निसर्गाचे आगळे-वेगळे विभ्रम आपल्याला अनुभवायला मिळतात. उन्हाळ्यात मध्यरात्रीही तळपणारा सूर्य आणि हिवाळ्यात इथेच बघायला मिळणारे नॉर्दन लाईट्स हे या प्रदेशाचं वैशिठ्य आहे. ध्रुवीय प्रदेशात बदलत जाणारं गुरुत्वबल आणि त्यामुळे प्रकाशाचेहि बदलत जाणारे रंग अनुभवायचे असतील तर इथे जाण्यावाचून पर्याय नाही. उन्हाळ्यात जसं सूर्य सुख मिळत तसं हिवाळ्यात घडणार नॉर्दन लाईट्स हे इथलं आकर्षण असतं. तिथल्या ट्रॉम्सो या ठिकाणी जेमतेम तीन तासांचा दिवस असल्यामुळे ते स्थळ नॉर्दन लाईट्स पाहण्यासाठीच उत्तम ठिकाण आहे.या तीन तासांत प्रत्यक्ष सूर्यदर्शन असं होताच नाही. क्षितिजाआड असलेल्या सूर्याच्या प्रकाशावरच हा तीन तासांचा दिवस तगतो आणि संपतो. थोडक्यात, एकाच दिशेला सूर्य उगवतो आणि मावळतो. नंतर आकाशातील प्रकाशाचा अनोखा खेळ सुरु होतो. तिथल्या गाईडच्या सहकार्याने नॉर्दन लाईट्स पाहण्याच्या सोहळ्याला सुरवात होते. उणे वीस दरम्यान जाणाऱ्या तापमानाचा सामना करण्यासाठी कपड्यावर थर्मल सूट चढवले जातात. पायात तसेच बूट अगदी नखशिकांत झाकून घेऊन डोळे उघडे ठेऊन आपण तयार होतो. हवामानाच्या स्थितीनुसार शंभर ते तीनशे किलोमीटर प्रवासाची तयारी ठेऊन आणखी उत्तरेकडे कूच करावी लागते. याच प्रवासात आपण फिनलँड या दुसऱ्या देशात प्रवेश करू शकतो. ढगाळ वातावरण असल्यास पुढचा प्रवास सुरूच राहतो. तिथला गाईड्ही मोकळ्या हवामानाची आशा बाळगून राहतो. याच प्रयत्नात आपल्याला ते उत्तरेकडचे प्रकाश दर्शन देतात आणि त्यांचे विभ्रम कॅमेऱ्यात बंद करीत असताना आपलं भान हरपून जातं. पोपटी, तांबूस लाल छटांच्या पट्ट्यांनी आकाशाचा कॅनव्हास रंगवला जात असतो आणि कॅमेरा त्याच्या प्रत्येक कृती टिपत असतो. आपल्या मनात यह कौन चित्रकार हैया ओळी नकळतच येऊन जातात. रात्रीच्या काळोखत उघड्या आकाशातला तो नित्य बदलणारा खेळ त्या दिवसात नव्हे, रात्रीत रोज होत असतो. ट्रायपॉड आणि उत्तम प्रतीचा एसएलआर कॅमेरा या गोष्टी इथे असल्याचं पाहिजेत.

गाईड ने सोबत आणलेल्या पोर्टेबल गॅसवर केलेली गरमागरम कॉफी आणि स्वप्नातीत दृश्यांचा आनंद घेत रात्रीचा उत्तर प्रहार केंव्हा येतो याची जाणीवही होत नाही.पानंगळीला सुरवात झाली म्हणजे बाहेरचं जग अधिक मोहक रूप धारण करत. गाळून जायच्या आधी ती हिरवी पान पिवळा, केसरी, लाल जांभळट असे नाना रंग आणि छटा धारण करतात. नवोन्मेषाची रुजवात घालताना आपल्या अल्पशा आयुष्यात लाभलेले सर्व रंग अंतरंगातून जणू बाहेर काढून ते पुन्हा सृष्टीला साभार करण्याचा हा सोहळाही डोळे दिपवणारा असतो. नंतर सुरु होणारा स्किईंगचा मौसम म्हणजे जगभरातल्या आइस स्केटिंग करण्यासाठी पर्वणीच असते. इथली नवजात बाळंसुद्धा निसर्गाचा आनंद आपल्या आई वडिलांसोबत घेत असतात.

 

वसंत ऋतूला जाग यायला लागते तशी बर्फाची चादर हलकेच दूर व्हायला लागते आणि मग रंगाचा आकाशात होणारा हा खेळ तिथल्या धरतीवर उतरतो. डॅफोडींल्स आणि ट्युलिप्सचे रंग अक्षरशः उधळले आणि आपल्या डोळ्याचं पारणं फिटतं. नॉर्वेचं फ्योर्ड नव्या वधूसारखं सजत. फ्योर्डमध्ये भटकंती करण्यासारखं दुसरं सुख नाही. संपूर्ण नॉर्वे देशाला सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. त्या समुद्राचं पाणी आतल्या खोल असलेल्या भूभागात शिरतं त्याला फ्योर्ड’ (fjord) असं म्हणतात. या फ्योर्डमधून फिरून नॉर्वेचं खरं सौदंर्य पाहता येत. निळ्याशार पाण्यामधून नॉर्वेच्या पर्वतराजीत दूरवर गेलेल्या नागमोड्या फ्योर्डमधून जाण्यासाठी केलेला नॉर्वे-इन-नटशेलहा दहा बारा तासांचा प्रवास आयुष्यभर केलेल्या प्रवसतला एक अविस्मरणीय प्रवास ठरतो सुरवातीला बस मधून सुरवात होणारा हा प्रवास मग बोट त्यानंतर फ्लाम ट्रेन पुन्हा बस असा होतो. हि फ्लाम ट्रेन युनेस्कोच्या जागतिक वारसा लाभलेल्या मार्गावरून. मार्गक्रमण करते. या ट्रेनचा समावेश असलेला बारा तासांचा न थकवणारा हा प्रवास करीत असतानां फ्योर्डमधली भटकंती म्हणजे नॉर्वे देशाचं खरं दर्शन असतं. हिरवीगार पर्वतराजी, मधूनच कोसळणारे धबधबे, वर निळं आकाश आणि त्या रंगाशी स्पर्धा करणारे जलमार्ग, सर्व प्रकारच्या सुविधा असलेल्या आलिशान बोटीतून हा प्रवास करताना सर्वच दृश्य नजरेत असं वाटत राहत. कॅमेऱ्याची मेमरी बऱ्यापैकी भरते. या जलसफारीचा आनंद घ्यायचा असेल तर या ठिकाणी उन्हाळ्यात जायला हवं. या देशाला. विस्तृत समुद्रकिनारा लाभलेला असून किनाऱ्याजवळ शेकडो लहान लहान बेटं तयार झाली आहेत. पर्यटकांना या जादुई दुनियेची सफर घडवण्यासाठी अनेक आलिशान सुसज्ज बोटी इथे त्यांच्या दिमतीला हजर असतात.

इथली घर, गाड्या आणि रेल्वेसह सर्वच सार्वजनिक वाहन हि अत्याधुनिक साधन सुविधांनी युक्त असून नीटनेटकेपणा आणि शिस्त यामुळे इथल्या वातावरणाला तसंच निसर्गाला धक्का न पोहोचवता त्यांचा आनंद घेता येतो. सार्वजनिक वाहतुकीची उत्तम व्यवस्था, दार दहा मिनिटांनी चालणारी ट्रेन किंवा ट्राम. चालत्या ट्रेनमध्ये असलेला वेगळा किड्स झोन, बिझनेस क्लासला लाजवेल अशी आसनव्यवस्था, आतच असलेला कॅफेटरिया, स्वच्छ आणि प्रशस्त प्रसाधनगृह, थंडीपासून संरक्षण करणारं उबदार वातावरण, बाहेरच्या निसर्गसौदर्याचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी शक्य तेव्हढे पारदर्शक असलेले ट्रेनचे डबे आणि गर्दीचा मागमूस नसलेले रिकामी ऐसपैस जागा, उत्तम पर्यटनासाठी आवश्यक असलेल्या सर्वच गोष्टी इथे हात जोडून उभ्या असतात. त्या अर्थानेसुद्धा हे पर्यटकांसाठी नंदनवनच आहे. ओस्लो, क्रिस्तियांसेंड, स्तावांगर, ट्रॉन्डहाइम किंवा बार्गेन, यापैकी कुठल्याही नॉर्वेमधल्या शहरात जा, तुम्हाला हेच दृश्य पाहायला मिळेल. उत्तर ध्रुवाजवळ असल्याने वर्षातील काहीच दिवस असलेल्या सूर्यप्रकाशाच्या दिवसात इथली तमाम जनता घराबाहेर पडून सूर्यस्नानाचा आनंद लुटते. पुन्हा घरी परतताना तिथला परिसर स्वच्छ करायला मात्र ते लोक विसरत नाहीत.

एव्हढ्या दूरवरच्या बर्फाळ ध्रुवीय प्रदेशात सुखसोयी असल्या तरी आपल्यासारख्या देशातल्या प्रवाशांना त्या महागड्या वाटतात. पण त्याला पर्याय नाही. अप्रतिम निसर्गसौन्दर्याचा आणि आधुनिक सोयीसुविधांचा अनुभव घेण्यासाठी उभ्या आयुष्यात या ठिकाणी एकदा तरी जायलाच हवं.

 

आत्माराम परब

संचालक, ईशा टूर्स

Contact : 9320131910

website : www.ishatours.net


Monday, August 17, 2020

लद्दाख मधील जर्दाळूचा बहर


सरत्या हिवाळ्यातला लडाख

प्रत्येक पर्यटन स्थळाचा एक ठरावीक असा मोसम असतो. जपानचा चेरी ब्लॉसम, अॅमस्टरडॅमचा टय़ुलिप फेस्टिव्हल आणि काही प्रमाणात काश्मीर आणि सिक्कीममध्ये फुला-फळांच्या बहरानुसार पर्यटनालादेखील बहर येतो. लडाखमध्येही असाचा बहर असतो तो जर्दाळूच्या फुलोऱ्यामध्ये. अगदी ठरवून अनुभवावा असाच..

प्रत्येक पर्यटन स्थळाचा एक ठरावीक असा मोसम असतो. लडाखच्या बाबतीत काही वर्षांपूर्वी अशीच परिस्थिती होती. लडाखच्या भटकंतीसाठी जून-जुलै हाच काय तो भटकंतीचा मोसम असायचा. कालांतराने सप्टेंबरात सुरू झालेल्या लडाख फेस्टिव्हलने हा कालावधी थोडा वाढला. इतकेच नाही तर आज हिवाळ्यातलं लडाख अनुभवयालादेखील अनेक पर्यटक जातात. गोठलेल्या झंस्कारवरील चादर ट्रेकने तर आता पूर्णत: व्यावसायिक सुविधादेखील उपलब्ध करून दिल्या आहेत. पण सरत्या हिवाळ्यात सध्या तरी लडाखला जाणाऱ्यांची संख्या तशी नगण्यच म्हणावी लागले. याच काळात लडाखमध्ये सृष्टीचं एक मनमोहक रूप पाहायला मिळतं. विशेष म्हणजे त्यासाठी फारशी वाट वाकडी करायची गरज नाही.

लडाख तसा रखरखाटी प्रदेश. विलो, पॉपलर, लेह बेरी, थोडय़ा फार प्रमाणात सफरचंद आणि जर्दाळू (अॅप्रिकॉट) अशी चार-पाच प्रकारचीच वृक्षसंपदा. त्यातदेखील विलो आणि पॉपलर यांना फळं येत नाहीत, पण ऋतूनुसार बदलणारी त्यांची मनमोहक रूपं पाहण्यासारखी असतात. नोव्हेंबरपासून विलोचे विलोभनीय रंग सृष्टिसौंदर्य वाढवू लागतात. लालचुटुक शेंडा पूर्ण बहरात येतो तो फेब्रुवारीमध्ये. आणि सरत्या हिवाळ्यात पिवळा धमक शेंडय़ांनी विलो बहरलेला असतो. विलो तसा सर्वत्रच दिसतो. जर्दाळू हे मात्र तेथे जाणीवपूर्वक लावलं जाणारं झाड. खास लागवडच केलेले. लडाखी घरांच्या अंगणात तर अगदी हमखास सापडणारं. तर कधी रस्त्याच्या कडेने अगदी व्यवस्थित लावलेली ही झाडं. या जर्दाळूला बहर येतो तो मार्चमध्ये. फिकट गुलाबी रंगांची फुलं त्यावर डोलू लागतात. छोटी हिरवी पान डोकावत असतात, पण संपूर्ण झाडच्या झाड फुलांनी बहरून आलेले असते. काहीशी खुरटी म्हणावी अशी उंची, पण विस्तार दांडगा. समुद्रसपाटीपासून ठरावीक उंचीवरच वाढणारे हे जर्दाळू एकूणच लडाखच्या वातावरणात जिवंतपणा आणतात. बर्फ वितळू लागलेलं असते आणि या फुलांचा बहर अगदी टिपेला पोहचलेला असतो. मेच्या अखेरीस छोटी छोटी फळं यायला लागतात. जुलैच्या पहिल्या आठवडय़ात फळं पिकू लागतात. जर्दाळू हा लडाखी जीवनाचा भाग आहे. नुसते फळ तर खातातच, पण ड्रायफ्रूट, जाम, गुलाबजामप्रमाणे पाकात घालून खाणं अशा अनेक प्रकारे जर्दाळू वापरलं जातं. बीच्या आतमध्ये आणखीन बदामाप्रमाणे छोटं बी असतं. तेदेखील खूप चविष्ट. समुद्रसपाटीपासून आठ-नऊ हजार फूट उंचीवरच हे झाड बहरतं. त्यापुढे ते टिकाव धरत नाही. त्यामुळे लडाखमध्ये सर्रास कुठेही हे पाहायला मिळेलच असं नाही. द्रास आणि कारगिल भागातच याची ७० टक्के लागवड आहे.

याच काळात आणखीन एक खास पाहण्यासारखं ठिकाण लडाखमध्ये आहे. पण ते आहे मानवनिर्मित आइस स्तूप. सोनम वाँगचूंग या हरहुन्नरी व्यक्तीने लडाखला दिलेली ही अनोखी देणगीच म्हणावी लागले. सस्टेनेबल जीवनशैलीचा हा पुरस्कर्ता आहे. लेहपासून नऊ किलोमीटरवरच्या फ्यांग या गावी हा अवलिया राहतो. त्याच्या केंद्रावरील संपूर्ण यंत्रणा चालते ती केवळ सौर ऊर्जेवर. तसं पर्यटकांपासून काहीसं दूरच राहणं त्याला आवडंत. पण त्याने लडाखी लोकांसाठी जे काही प्रयोग केले आहेत. त्यामध्ये हे आईस स्तूप पाहण्यासारखे आहेत. आईस स्तूप हे जाणीवपूर्वक दिलेले नाव. उन्हाळ्यात लडाखी गावांची पाण्याची गरज पूर्ण व्हावी म्हणून केलेली ही खास रचना. हिवाळ्यात डोंगरात ठरावीक ठिकाणी पाणी अडवलं जातं. ते पाणी डोंगरपायथ्यातल्या एका पाइपद्वारे आणलं जातं. पायथ्याला या पाइपमधून कारंज्याच्या स्वरूपात हवेत उडवलं जातं. पाणी किती आणि कसं उडवायचं याचं नियंत्रण केलेलं असतं. हवेतून पाणी खाली येताना आपोआप गोठतं. काही खुरटी झुडपं वापरून त्याला एक खास आकार दिला जातो. त्यातूनच हे स्तूप तयार होतात. सुमारे ९० फूट उंच आणि १०० मीटरचा घेर असणारे हे स्तूप एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ापर्यंत गोठलेल्या अवस्थेतच असतात. त्यानंतर मात्र ते वितळायला सुरुवात होते. वितळलेलं पाणी साठवायची पुन्हा एक खास रचना येथे केलेली आहे. त्यातूनच त्या गावाची पुढील एक-दोन महिन्यांची पाण्याची गरज अगदी व्यवस्थित भागते.

लडाखच्या अंतर्गत भागात असे अनेक स्तूप तुम्हाला हमखास दिसतात. सोनम वाँगचूच्या या प्रयोगाला रोलेक्स अॅवार्डने सन्मानित करण्यात आलं आहे. या रचनेला जाणीवपूर्वक स्तूप हे नावं दिलंय. आपल्याकडे जशी देवराई असते तसेच हे स्तूप. देवाच्या नावामुळे त्याला कोणी हात लावत नाही. उलट त्याचं रक्षणच केलं जातं. लडाखचं सौंदर्य जून-जुलैमध्ये बहरात आलेलं असतंच, पण सरत्या हिवाळ्यात एप्रिल महिन्यातलं हे सृष्टिसौंदर्यदेखील आवर्जून अनुभवावं असं आहे. कमी गर्दीच्या काळात काही तरी वेगळं पाहायचं असेल तर लडाखचा हा मोसम अनुभवयाला हवा.

 

आत्माराम परब

संचालक, ईशा टूर्स

Contact : 9320131910

website : www.ishatours.net

Loksatta Link : https://www.loksatta.com/lokbhramanti-news/apricot-flower-tour-of-ladakh-apricot-flower-blooming-ladakh-1460567/

 


Friday, August 14, 2020

शिंपी

 

शिंपी (शास्त्रीय नाव:ऑर्थोटोमस सुटोरियस) हा छोटा पक्षी आहे. याला हिंदी मध्ये दर्जी तर इंग्लिशमध्ये कॉमन टेलरबर्ड अशी नावे आहेत.

आमच्या कोकणातील गावी अंगणात साधारण ३५ ते ४० च्या आसपास दिसतात, खूपच तुडतुडे असतात एका ठिकाणी कधीच बसणार नाही.त्यामुळे फोटो काढताना खूपच कसरत करावी लागते.

 

हा पक्षी साधारण १३ सें. मी. आकाराचा, उत्तम घरटे विणणारा पक्षी म्हणून ओळखला जातो. वरून हिरवा, खालून फिकट पांढरा आणि डोके तांबुस, शेपटीतून दोन अणकुचीदार पिसे निघालेली असतात व हा आपली शेपटी वर ठेवतो. वीण काळात नराची ही पिसे जास्त लांब होतात. शिंपी पक्षी अतिशय सक्रिय आहे. एकट्याने किंवा जोडीने कीटक शोधत आणि पिची, पिची, पिची असा काहीसा आवाज काढत सर्वत्र फिरत राहतो.

 

शिंपी पक्षी हिमालयाच्या १५०० मी. उंचीपर्यंतच्या परिसरापर्यंत संपूर्ण भारतभर आढळतो तसेच तो पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश आणि म्यानमार या ठिकाणीही आढळतो. आकार आणि रंगाच्या थोड्या फरकाने याच्या किमान पाच उपजाती येवढ्या भागात आहेत.

 

लहान कीटक, त्यांची अंडी आणि अळ्या तसेच विविध फुलातील मध हे शिंपी पक्ष्याचे मुख्य अन्न आहे. एप्रिल ते सप्टेंबर हा काळ याचा वीणीचा काळ असून झाडांची पाने, गवत, कोळ्याचे जाळे, कापसाचे धागे वगैरे साहित्य वापरून तयार केलेले याचे घरटे व्यवस्थित शिवलेले असते. मादी एकावेळी निळसर पांढऱ्या किंवा लालसर पांढऱ्या रंगाची आणि त्यावर तपकिरी ठिपके असलेली, ३ ते ४ अंडी देते. अंडी उबविण्याचे काम एकटी मादी करते पण घरटे बांधणे, पिलांना खाऊ घालणे वगैरे कामे नर-मादी मिळून करतात.

*Uday Parab*

*Isha Tours*




Tuesday, August 4, 2020

भोरडा




भोरडा या पक्ष्याचे शास्त्रीय नाव स्टर्नस रोझियस आहे. त्याला भोरडी सारिका, गुलाबी सारिका अथवा गुलाबी साळुंकी असेही म्हणतात.भोरडा आकाराने साळुंकीएवढा असतो,बाकी शरीराचा रंग फिकट गुलाबी असतो. चोच पिवळसर गुलाबी रंगाची असते. भोरडा पक्षी पूर्व यूरोप आणि मध्य व पश्चिम आशिया येथील आढळतो; परंतु गुजरात आणि महाराष्ट्र (कच्छ आणि भिगवणं ) या ठिकाणी त्यांचे थवे दिसून येतात. तो समूहाने राहतो. तो स्थलांतर करणारा पक्षी असून जुलै-ऑगस्ट महिन्यांत भारतात येतो व एप्रिलमध्ये परत जातो. एका थव्यात सु ५०० ते १००० पर्यंत भोरडे असू शकतात.आणि त्याचा एकत्रितपणे राहण्याचा त्यांना फायदा म्हणजे शिकारी पक्ष्यांपासून बचाव करणे, या स्टार्लिंग्जचे मोठे कळप बहुतेक वेळेस मोठ्या प्रमाणात एअर स्टंटमध्ये गुंतलेले असतात याला स्टार्लिंग मर्मूरेशन म्हणतात, आणि आणि हे पाहणं म्हणजे खूप अविस्मरणीय असत ते पक्षी सारखे उडताना वेगवेगळे आकार करत असतात कधी माश्याचा आकार तर कधी गोलाकार तर कधी कधी वावटळ सुद्धा डोळ्यांना भासते , पण कधीही एअर स्टंट करताना ते एकमेकांवर आदळत नाही हि त्यांची खासियत असते. वड, पिंपळ, टणटणी, तुती, सावर, पांगारा इ. वृक्षांवर भोरड्यांचे थवे असतात.पळस, पांगारा व शेवरीच्या फुलातील मकरंद ते पितात, तसेच ते या झाडांची फळे खातात. भोरड्यांच्या विष्ठेतील फळांच्या बिया पावसाळ्यात लगेच जमिनीत रुजतात. अशा रीतीने बीजप्रसार होण्यास मोठी मदत होते. परागणाचेही कार्य भोरडे करतात. त्यांचे थवे दुपारी वडाच्या झाडांवर दाट पालवीत विश्रांती घेतात. त्यावेळी ते कर्कश आवाज करून गोंधळ घालतात. मात्र, अधूनमधून ते गोड आवाजही काढतात.

 

ज्वारी-बाजरीचे पीक तयार झाल्यावर भोरड्यांचे थवेच्या थवे पिकांच्या कणसांतील दाणे खातात परंतु त्याचबरोबर पिकांचा नाश करणारे टोळही ते खाऊन टाकतात. एक प्रकारे ते शेतकऱ्यांना मदतच करत असतात.

 

उदय परब

ईशा टूर्स






LinkWithin

Related Posts with Thumbnails