Tuesday, September 15, 2020

नवरंग - Indian Pitta


 

नवरंग हा उत्तरेकडील थंडीपासून बचाव करण्यासाठी आपल्या स्थलांतर करत असुन साधारण मे-जुन मध्ये आपल्या कडे त्याचे आगमन होते.

हा पक्षी खूप लाजाळू आहे. दिसायला अतिशय सुंदर, सुरेख आणि रंगीत पक्षी. साधारण बुलबुल इतका. (साधारण १९ सेमी) डोक्यावर फिक्कट तपकिरी-पिवळ्या रंगाचा मुकुट व त्यांच्या मधोमधुन माने कडे जाणारी काळी पट्टी. राखाडी चोच व चोची पासुन निघून डोळ्याच्या आरपार गडद काळी पट्टी माने पर्यंत जाते. तर त्याच्यावरून एक बारीक पांढरी पट्टी व तिच्या खालुन कंठा पर्यंतचा भाग पांढरा. काळ्या रंगाचे आयरेस असलेले गडद तपकिरी डोळे व डोळ्या भोवती राखाडी रिंग आहे, डोळ्या खाली लहानशी पातळ पांढरी रेष. पाठीचा व पंखांचा रंग हिरवा पोपटी त्याच्या पिसांवर फिक्कट तांबडी छटा. पंखाच्या बाजूला फिक्के हिरव्या -निळ्या चमकदार पॅच असुन पांढर्‍या रंगाचा प्याॅच आणी पंखांच्या टोकावर पांढरा लहान प्यॉच उडतांना सहजच दिसतो. छाती व पोटा कडील भाग फिक्कट तपकिरी पिवळ्या रंग व पोटा खालील बुडाकडील भाग केशरी लाल, लहान गोलाकार शेपटी त्यावर काळ्यारंगा वर नळ्या रंग आणि एकदम टोकावर पांढरी बारीक धार.परंतु शेपटी स्पष्टपणे दिसत नाही कारण ती जवळजवळ पंखांनी झाकलेली असते. फिकट गुलाबी रंगाचे रंगाचे लांब व मजबूत पाय आहेत.


आहारामध्ये मुख्यत्वे लहान कीटक, अळ्या, मुंग्या, बीटल, कोळी, गांडुळे, लहान नाकतोडे असल्या कारणाने बर्‍याचदा कीटकां करिता सकाळी संध्याकाळी पानांच्या कचर्‍याच्या भोवताली जमिनीवर थिरकताना अन्न शोधताना दिसतो. तसेच दाट झुडपात दिसतो.
*Uday Parab*

*Isha Tours*


No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails