Wednesday, September 16, 2020

शिपाई बुलबुल - Red-whiskered Bulbul


 

शिपाई बुलबुल (Red-whiskered Bulbul ) हा पक्षी साधारण २० सें. मी. (८ इं) लांबी,चा आहे. पाठीकडून तपकिरी-बदामी रंगाचा, पोटाकडून पांढरा, डोके काळे, त्यावर मोठा टोकदार, काळा तुरा, डोळ्यांजवळ लाल कल्ले, तसेच गालावर पांढरा पट्टा आणि लाल रंगाचे बूड. नर-मादी दिसायला सारखेच. हा पक्षी लाल बुडाचा बुलबुलसारखा वाटतो मात्र डोक्यावरील मोठा तुरा आणि डोळ्यांजवळ असलेले ठळक लाल आणि पांढरे भाग हा या दोन पक्ष्यांमधील फरक आहे.

फेब्रुवारी ते ऑगस्ट हा काळ या पक्ष्यांचा प्रजनन काळ असून यांचे घरटे द्रोणाच्या आकाराचे असते. घरटे बहुधा एखाद्या झुडपात किंवा बांबूच्या रांजीत असते. तसेच ते कडेकपारीत किंवा एखाद्या ओसाड घराच्या छताला लागून असलेलेही दिसून येते. मादी एकावेळी २ ते ४ अंडी देते. यांची आणि लाल बुडाचा बुलबुलची अंडी साधारण सारखीच दिसतात. पिलांचे संगोपन वगैरे सर्व कामे नर-मादी मिळून करतात.

*Uday Parab*

*Isha Tours*


No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails