Tuesday, August 4, 2020

भोरडा




भोरडा या पक्ष्याचे शास्त्रीय नाव स्टर्नस रोझियस आहे. त्याला भोरडी सारिका, गुलाबी सारिका अथवा गुलाबी साळुंकी असेही म्हणतात.भोरडा आकाराने साळुंकीएवढा असतो,बाकी शरीराचा रंग फिकट गुलाबी असतो. चोच पिवळसर गुलाबी रंगाची असते. भोरडा पक्षी पूर्व यूरोप आणि मध्य व पश्चिम आशिया येथील आढळतो; परंतु गुजरात आणि महाराष्ट्र (कच्छ आणि भिगवणं ) या ठिकाणी त्यांचे थवे दिसून येतात. तो समूहाने राहतो. तो स्थलांतर करणारा पक्षी असून जुलै-ऑगस्ट महिन्यांत भारतात येतो व एप्रिलमध्ये परत जातो. एका थव्यात सु ५०० ते १००० पर्यंत भोरडे असू शकतात.आणि त्याचा एकत्रितपणे राहण्याचा त्यांना फायदा म्हणजे शिकारी पक्ष्यांपासून बचाव करणे, या स्टार्लिंग्जचे मोठे कळप बहुतेक वेळेस मोठ्या प्रमाणात एअर स्टंटमध्ये गुंतलेले असतात याला स्टार्लिंग मर्मूरेशन म्हणतात, आणि आणि हे पाहणं म्हणजे खूप अविस्मरणीय असत ते पक्षी सारखे उडताना वेगवेगळे आकार करत असतात कधी माश्याचा आकार तर कधी गोलाकार तर कधी कधी वावटळ सुद्धा डोळ्यांना भासते , पण कधीही एअर स्टंट करताना ते एकमेकांवर आदळत नाही हि त्यांची खासियत असते. वड, पिंपळ, टणटणी, तुती, सावर, पांगारा इ. वृक्षांवर भोरड्यांचे थवे असतात.पळस, पांगारा व शेवरीच्या फुलातील मकरंद ते पितात, तसेच ते या झाडांची फळे खातात. भोरड्यांच्या विष्ठेतील फळांच्या बिया पावसाळ्यात लगेच जमिनीत रुजतात. अशा रीतीने बीजप्रसार होण्यास मोठी मदत होते. परागणाचेही कार्य भोरडे करतात. त्यांचे थवे दुपारी वडाच्या झाडांवर दाट पालवीत विश्रांती घेतात. त्यावेळी ते कर्कश आवाज करून गोंधळ घालतात. मात्र, अधूनमधून ते गोड आवाजही काढतात.

 

ज्वारी-बाजरीचे पीक तयार झाल्यावर भोरड्यांचे थवेच्या थवे पिकांच्या कणसांतील दाणे खातात परंतु त्याचबरोबर पिकांचा नाश करणारे टोळही ते खाऊन टाकतात. एक प्रकारे ते शेतकऱ्यांना मदतच करत असतात.

 

उदय परब

ईशा टूर्स






No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails