नॉर्वेचं मुख्य आकर्षण आहे, ‘नॉर्दन लाईट्स’.
प्रकाशाच्या या अनोख्या खेळात पोपटी, तांबूस, लाल, छटांनी आकाशाचा कॅनव्हास रंगत असतो आणि
आपल्या मनात ‘ यह कौन चित्रकार है’ या ओळी नकळतच येऊन जातात
माझ्या गावच्या काळ्याभोर आकाशातल्या ध्रुव
ताऱ्यांकडे पाहताना मला ‘ध्रुवं ‘ या शब्दाची प्रथम ओळख झाली पुढे पृथ्वीच्या दोन्ही ध्रुवांबद्दल
आकर्षण वाटायला लागलं . पृथ्वीचं ते टोक गाठण्याची माझी मनीषा मला स्वस्थ बसू
देईना नॉर्वे फिनलँड, डेन्मार्क, स्वीडन आणि आइसलँड या देशांचा समावेश
असलेल्या स्कँडिनेव्हिया प्रदेशात मी नुकतीच भटकंती करून आलो. आर्टिक आणि
अंटार्टिका या दोन्ही ध्रुवांवर मनसोक्त फिरायचं आणि तो अद्भुत दुनिया पाहायची हे
माझ स्वप्न आर्टीकपासून सुरु झालं. परिकथेतील ती दुनिया याची देही याची डोळा
पाहताना मला स्वर्गाहून रम्य वाटलं हे इथे नमूद करायलाच हवं. चहूबाजूंना पसरलेलं
बर्फ़, त्यावर केले रंगीबेरंगी रोषणाई, दूर आकाशात वीस-बावीस तास ठाण मांडून
बसलेले तारे-तारका, स्वच्छ व नीटनेटकी घर आणि इमारती
हिवाळ्याच्या दिवसात रस्त्यावरून उणे दहा-पंधरा तपमान असूनही विनाव्यतय चालणाऱ्या
बस, ट्राम आणि रेल्वेगाड्या, मर्सिडिस बेंझच्या टॅक्सी, तसेच या सर्व ठिकाणांना व्यापून
राहिलेलं वाय-फाय, निसर्ग आणि आधुनिक मानवाने जे जे
निर्माण केलं, ते ते अगदी निगुतीनं राखलेलं इथे
आपल्याला पाहायला मिळतं. नॉर्वे या देशाच्या ‘ओस्लो’ या राजधानीच्या शहरात पाऊल टाकताच एका
अनोख्या जगात आपण प्रवेश करतोय याची जाणीव होते. मूळचा व्हायकिंग या सागरी
चाच्यांच्या जमातीचा असलेला हा देश १९६५-७० दरम्यान सापडलेल्या तेल आणि नैसर्गिक
वायूंच्या साठ्यांमुळे जगातील श्रीमंत देशांमध्ये गणला जाऊ लागला. प्रामाणिक माणसांच्या
या देशाने फार लवकर प्रगती केली आणि त्याला आजची संपन्नावस्था प्राप्त झाली
नॉर्स्क हि जर्मन भाषेला जवळची असलेली भाषा इथे बोलली जाते तसंच ‘क्रोनर’ हे इथलं चलन आहे. असं असलं तरी युरो इथे सर्सास चालतात.
ऑस्लोमध्ये असलेलं व्हीजिलंट स्कल्प्चर पार्क
हे शिल्पाकृतींनी समृद्ध असलेलं ठिकाण पाहायला वेळ द्यावा तेवढा कमीच पडतो.
शिल्पाकृतीच हे अनोखं विश्व आपल्या मनात कायमच घर करून राहत. मानवी जीवनाचे नवीन
पैलू आणि भावविशेष यांच मनोज्ञ दर्शन या शिल्पांमधून घडतं. स्तावांगर हे तेल आणि
नैसर्गिक वायूंचं यूरोपातलं एक प्रमुख केंद्र आहे. जगातील एक अतिशय सुंदर असा हा
देश सौदंर्याच्या बाबतीत स्विझर्लंडहूनही अधिक देखणा आहे. विरळ लोकसंख्या (१५.५
प्रति चौरस किमी) असलेल्या या ठिकाणी मुंबई सारख्या गजबजलेल्या शहरातून आपण जाऊन
पोहचतो तेव्हा या ठिकाणचे आपण राजेच असल्याचा भास होतो. प्रत्येक घरात जगातील
उत्तम ब्रँड असलेली वाहन दिमतीला असली तरी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचाच वापर
आठवड्यातील किमान पाच दिवस तरी इथल्या जनतेकडून केला जातो. समाजातील सर्व स्तरातील
लोक जवळच्या प्रवासासाठी सायकलचाच वापर करतात. इथले पंतप्रधानही त्याला अपवाद नाहीत.
सप्ताहच्या अखेरीस दूरवर फिरायला जाण्यासाठीमात्र स्वतःच्या वाहनाचा वापर केला
जातो. श्रीमंत आहे उच्च राहणीमानासाठी ओळखल्या जाणाऱ्या या देशातील जनतेने
पर्यावरण आणि देशप्रेम आपल्या कृतीतून जपलं आहे. संसाधनांचा वापर, आहे म्हणून न करता तो गरजेचा आहे ना? हे प्रथम पहिलं जात. रस्त्यावरची
अनावश्यक वर्दळ आणि गोंगाट इथे पाहायला मिळत नाही. वागण्या-बोलण्याची श्रीमंतीही
असलेली इथली माणसं खरंच प्रेमळ आणि सुस्वभावी आहेत. बाराही महिने कमी अधिक
प्रमाणात पाऊस आणि बर्फ पडत असला तरी एप्रिल, मे
इथले वसंत ऋतूचे महिने. पुढे जून ते ऑगस्ट उन्हाळा असतो. सप्टेंबरच्या दरम्यान
सोसाट्याच्या वाऱ्यांबरोबर इथला मोसम बदलायला लागतो. तुफानी वाऱ्यातच ऑक्टोबर
गेल्यावर नोव्हेंबर ते मार्च ध्रुवीय प्रदेशातील थंडी सारा आसमंत आपल्या कवेत घेत
असते. बर्फाची चंद्र एकदा का ओढून घेतली कि मग पुढचे पाच महिने ती दूर होण्याचं
नाव नाही. या धरविया प्रदेशातला दिवसही असाच हिवाळ्यात वीस-बावीस तासांची रात्र
आहि उन्हाळ्यात तेव्हढाच मोठा दिवस. या अश्या विषम वाटणीमुळेच निसर्गाचे
आगळे-वेगळे विभ्रम आपल्याला अनुभवायला मिळतात. उन्हाळ्यात मध्यरात्रीही तळपणारा
सूर्य आणि हिवाळ्यात इथेच बघायला मिळणारे नॉर्दन लाईट्स हे या प्रदेशाचं वैशिठ्य
आहे. ध्रुवीय प्रदेशात बदलत जाणारं गुरुत्वबल आणि त्यामुळे प्रकाशाचेहि बदलत
जाणारे रंग अनुभवायचे असतील तर इथे जाण्यावाचून पर्याय नाही. उन्हाळ्यात जसं सूर्य
सुख मिळत तसं हिवाळ्यात घडणार नॉर्दन लाईट्स हे इथलं आकर्षण असतं. तिथल्या
ट्रॉम्सो या ठिकाणी जेमतेम तीन तासांचा दिवस असल्यामुळे ते स्थळ नॉर्दन लाईट्स
पाहण्यासाठीच उत्तम ठिकाण आहे.या तीन तासांत प्रत्यक्ष सूर्यदर्शन असं होताच नाही.
क्षितिजाआड असलेल्या सूर्याच्या प्रकाशावरच हा तीन तासांचा दिवस तगतो आणि संपतो.
थोडक्यात, एकाच दिशेला सूर्य उगवतो आणि मावळतो.
नंतर आकाशातील प्रकाशाचा अनोखा खेळ सुरु होतो. तिथल्या गाईडच्या सहकार्याने नॉर्दन
लाईट्स पाहण्याच्या सोहळ्याला सुरवात होते. उणे वीस दरम्यान जाणाऱ्या तापमानाचा
सामना करण्यासाठी कपड्यावर थर्मल सूट चढवले जातात. पायात तसेच बूट अगदी नखशिकांत
झाकून घेऊन डोळे उघडे ठेऊन आपण तयार होतो. हवामानाच्या स्थितीनुसार शंभर ते तीनशे
किलोमीटर प्रवासाची तयारी ठेऊन आणखी उत्तरेकडे कूच करावी लागते. याच प्रवासात आपण
फिनलँड या दुसऱ्या देशात प्रवेश करू शकतो. ढगाळ वातावरण असल्यास पुढचा प्रवास
सुरूच राहतो. तिथला गाईड्ही मोकळ्या हवामानाची आशा बाळगून राहतो. याच प्रयत्नात
आपल्याला ते उत्तरेकडचे प्रकाश दर्शन देतात आणि त्यांचे विभ्रम कॅमेऱ्यात बंद करीत
असताना आपलं भान हरपून जातं. पोपटी, तांबूस
लाल छटांच्या पट्ट्यांनी आकाशाचा कॅनव्हास रंगवला जात असतो आणि कॅमेरा त्याच्या
प्रत्येक कृती टिपत असतो. आपल्या मनात ‘यह
कौन चित्रकार है’ या ओळी नकळतच येऊन जातात. रात्रीच्या
काळोखत उघड्या आकाशातला तो नित्य बदलणारा खेळ त्या दिवसात नव्हे, रात्रीत रोज होत असतो. ट्रायपॉड आणि
उत्तम प्रतीचा एसएलआर कॅमेरा या गोष्टी इथे असल्याचं पाहिजेत.
गाईड ने सोबत आणलेल्या पोर्टेबल गॅसवर केलेली
गरमागरम कॉफी आणि स्वप्नातीत दृश्यांचा आनंद घेत रात्रीचा उत्तर प्रहार केंव्हा
येतो याची जाणीवही होत नाही.पानंगळीला सुरवात झाली म्हणजे बाहेरचं जग अधिक मोहक
रूप धारण करत. गाळून जायच्या आधी ती हिरवी पान पिवळा, केसरी, लाल – जांभळट असे नाना रंग आणि छटा धारण
करतात. नवोन्मेषाची रुजवात घालताना आपल्या अल्पशा आयुष्यात लाभलेले सर्व रंग
अंतरंगातून जणू बाहेर काढून ते पुन्हा सृष्टीला साभार करण्याचा हा सोहळाही डोळे
दिपवणारा असतो. नंतर सुरु होणारा स्किईंगचा मौसम म्हणजे जगभरातल्या आइस – स्केटिंग करण्यासाठी पर्वणीच असते.
इथली नवजात बाळंसुद्धा निसर्गाचा आनंद आपल्या आई – वडिलांसोबत घेत असतात.
वसंत ऋतूला जाग यायला लागते तशी बर्फाची चादर
हलकेच दूर व्हायला लागते आणि मग रंगाचा आकाशात होणारा हा खेळ तिथल्या धरतीवर
उतरतो. डॅफोडींल्स आणि ट्युलिप्सचे रंग अक्षरशः उधळले आणि आपल्या डोळ्याचं पारणं
फिटतं. नॉर्वेचं फ्योर्ड नव्या वधूसारखं सजत. फ्योर्डमध्ये भटकंती करण्यासारखं
दुसरं सुख नाही. संपूर्ण नॉर्वे देशाला सुंदर समुद्रकिनारा लाभला आहे. त्या
समुद्राचं पाणी आतल्या खोल असलेल्या भूभागात शिरतं त्याला ‘फ्योर्ड’ (fjord) असं म्हणतात. या फ्योर्डमधून फिरून नॉर्वेचं खरं सौदंर्य पाहता येत.
निळ्याशार पाण्यामधून नॉर्वेच्या पर्वतराजीत दूरवर गेलेल्या नागमोड्या फ्योर्डमधून
जाण्यासाठी केलेला ‘नॉर्वे-इन-नटशेल’ हा दहा – बारा तासांचा प्रवास आयुष्यभर केलेल्या प्रवसतला एक अविस्मरणीय
प्रवास ठरतो सुरवातीला बस मधून सुरवात होणारा हा प्रवास मग बोट त्यानंतर फ्लाम
ट्रेन पुन्हा बस असा होतो. हि फ्लाम ट्रेन युनेस्कोच्या जागतिक वारसा लाभलेल्या
मार्गावरून. मार्गक्रमण करते. या ट्रेनचा समावेश असलेला बारा तासांचा न थकवणारा हा
प्रवास करीत असतानां फ्योर्डमधली भटकंती म्हणजे नॉर्वे देशाचं खरं दर्शन असतं.
हिरवीगार पर्वतराजी, मधूनच कोसळणारे धबधबे, वर निळं आकाश आणि त्या रंगाशी स्पर्धा
करणारे जलमार्ग, सर्व प्रकारच्या सुविधा असलेल्या
आलिशान बोटीतून हा प्रवास करताना सर्वच दृश्य नजरेत असं वाटत राहत. कॅमेऱ्याची
मेमरी बऱ्यापैकी भरते. या जलसफारीचा आनंद घ्यायचा असेल तर या ठिकाणी उन्हाळ्यात
जायला हवं. या देशाला. विस्तृत समुद्रकिनारा लाभलेला असून किनाऱ्याजवळ शेकडो लहान
लहान बेटं तयार झाली आहेत. पर्यटकांना या जादुई दुनियेची सफर घडवण्यासाठी अनेक
आलिशान सुसज्ज बोटी इथे त्यांच्या दिमतीला हजर असतात.
इथली घर, गाड्या
आणि रेल्वेसह सर्वच सार्वजनिक वाहन हि अत्याधुनिक साधन सुविधांनी युक्त असून
नीटनेटकेपणा आणि शिस्त यामुळे इथल्या वातावरणाला तसंच निसर्गाला धक्का न पोहोचवता
त्यांचा आनंद घेता येतो. सार्वजनिक वाहतुकीची उत्तम व्यवस्था, दार दहा मिनिटांनी चालणारी ट्रेन किंवा
ट्राम. चालत्या ट्रेनमध्ये असलेला वेगळा किड्स झोन, बिझनेस क्लासला लाजवेल अशी आसनव्यवस्था, आतच असलेला कॅफेटरिया, स्वच्छ आणि प्रशस्त प्रसाधनगृह, थंडीपासून संरक्षण करणारं उबदार
वातावरण, बाहेरच्या निसर्गसौदर्याचा मनमुराद
आनंद लुटण्यासाठी शक्य तेव्हढे पारदर्शक असलेले ट्रेनचे डबे आणि गर्दीचा मागमूस
नसलेले रिकामी ऐसपैस जागा,
उत्तम पर्यटनासाठी आवश्यक असलेल्या
सर्वच गोष्टी इथे हात जोडून उभ्या असतात. त्या अर्थानेसुद्धा हे पर्यटकांसाठी
नंदनवनच आहे. ओस्लो, क्रिस्तियांसेंड, स्तावांगर, ट्रॉन्डहाइम किंवा बार्गेन, यापैकी कुठल्याही नॉर्वेमधल्या शहरात
जा, तुम्हाला हेच दृश्य पाहायला मिळेल.
उत्तर ध्रुवाजवळ असल्याने वर्षातील काहीच दिवस असलेल्या सूर्यप्रकाशाच्या दिवसात
इथली तमाम जनता घराबाहेर पडून सूर्यस्नानाचा आनंद लुटते. पुन्हा घरी परतताना तिथला
परिसर स्वच्छ करायला मात्र ते लोक विसरत नाहीत.
एव्हढ्या दूरवरच्या बर्फाळ ध्रुवीय प्रदेशात
सुखसोयी असल्या तरी आपल्यासारख्या देशातल्या प्रवाशांना त्या महागड्या वाटतात. पण
त्याला पर्याय नाही. अप्रतिम निसर्गसौन्दर्याचा आणि आधुनिक सोयीसुविधांचा अनुभव
घेण्यासाठी उभ्या आयुष्यात या ठिकाणी एकदा तरी जायलाच हवं.
आत्माराम
परब
संचालक, ईशा टूर्स
Contact :
9320131910
website :
www.ishatours.net