ईशा टूर्स या पर्यटन संस्थेचा दशकपुर्ती सोहळा
नुकताच दादर मुंबई येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात संपन्न झाला. या वेळी
आत्माराम परब आणि नरेन्द्र प्रभू यांनी लिहिलेल्या ‘लडाख प्रवास अजून सुरू आहे’ या नवचैतन्य प्रकाशनाच्या पुस्तकाचं विमोचन सुप्रसिद्ध समाजसेविका आणि
लेखिका रेणूताई गावस्कर आणि न्युरोस्पायनल सर्जन डॉ. प्रेमानंद रामाणी यांच्या
शुभहस्ते करण्यात आलं. प्रसिद्ध क्रिकेटपटू प्रविण आम्रे यावेळी प्रमूख पाहूणे
म्हणून उपस्थित होते. रेणू गावस्कर आणि डॉ. प्रेमानंद रामाणी यांनी ईशा टूर्सला
शुभेच्छा देताना त्यांनी कंपनीबरोबर केलेल्या लडाख आणि अन्य सहलीबद्दलच्या आठवणी
जाग्या केल्या. रेणू गावस्कर यांनी प्रकाशीत पुस्तकाविषयी बोलताना पहिल्याच लडाख
सफरीत आत्माराम परब यांना आलेल्या थरारक अनुभवानंतरही त्यांनी लडाखलाच आपलसं केलं आणि
पर्यटन व्यवसायाला वाहून घेतलं या गोष्टीचं विशेष कौतूक केलं. प्रविण आम्रे यांनी
आत्माराम बरोबर मैदानात खेळलेल्या दिवसांची आठवण सांगितली.
या कार्यक्रमात ईशा टूर्सचे संचालक श्री. आत्माराम
परब यांच्या मिलींद कुलकर्णी यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखतीला उपस्थितांनी
टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली. ईशा टूर्सची गेल्या दशकभरातील वाटचाल आणि कामगिरी
विषद करणारी चित्रफीत या प्रसंगी दाखवण्यात आली. सौ. हर्षदा प्रभू यांनी
कार्यकमाचं सुत्र संचालन केलं होतं.
No comments:
Post a Comment