आज आपला अंदमान ट्रीपचा शेवटचा दिवस, उद्यापासून आपण सारे
आपापल्या व्यापात मग्न होऊ आणि त्यासाठीच हे थोडेसे मनोगत आणि थोडीशी कृतकृत्यता.
आम्हाला कुठे परकेपणा किंवा अलिप्तपणा जाणवत नव्हता. श्री.
परब यांच्या नावाप्रमाणेच त्यांच्या या ट्रीप आयोजनात ‘आत्मा’ ओतत असल्याने ट्रीप राममय होऊन
जाते. त्यातील रामाच्या जोडीला प्रत्येक वेळी लक्ष्मणाच्या रुपाने प्रभूंची साथ
असते, त्यामुळे संपूर्ण ट्रीपचं वातावरण आनंददायी होतं व लोक ज्या उद्देशाने
ट्रीपला येतात तो उद्देशही सफल होतो.
‘ईशा’मध्ये ट्रीपला येताना ४४ लोक असले
तरी जाताना ती एकच व्यक्ती बनुब जाते, तेव्हा ‘ईशा’ला म्हणजेच श्री. परब आणि श्री.
प्रभू यांना या ट्रीपसाठी धन्यवाद देतानाच त्यांना त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी
आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा!
या वेळी असं म्हणावसं वाटतं.
जो जे वांच्छिल तेथे नेईल ‘ईशा’
जो जे मागेल ते ते देईल ‘ईशा’
सौ.
मनिषा करमरकर
छान वर्णन . आवडले.
ReplyDeleteSonali
www.sahityasanskruti.com
आभारी.
ReplyDelete