निसर्गापुढे सगळेच हतबल असतात. या वर्षीचा लडाखचा हंगाम नुकताच सूरू झाला. स्मिताच्या नेतृत्वाखाली १७ मे ला पहिली बॅच श्रीनगर मार्गे लेह ला जाण्यासाठी निघाली सुद्धा, पण एरवी सरळपणे जाणार्या आमच्या सहलीची वाट यावेळी निसर्गाने आडवली. जोझिला पास परिसरात जोरदार बर्फवृष्टी झाल्याने ग्रुपला श्रीनगर येथेच तीन दिवस अडकून पडावं लागलं. जोझिला बंद असला तरी गुलमर्ग, पहलगाम इथे ग्रुप फिरला आणि त्यानी काश्मिर मधल्या पर्यटनाचा आनंद घेतला. जोझिला मार्गे रस्ता खुला झाल्याबरोबर काल स्मिताची बॅच कारगिलला पोहोचली आणि आज लेहला पोहोचत आहे.
हिमालया सारख्या ठिकाणी सफरीवर जाताना या गोष्टींची तयारी ठेवावीच लागते. कधी लॅन्ड स्लायडींग तर कधी जोरदार बर्फवृष्टी यांचा सामना करावा लागतो. असो आता हि बॅच ते अडथळे पार करून लेहला पोहोचली आहे. अशा वेळी ग्रुपलिडरच्या नेतृत्वाची कसोटी लागते. या वर्षीची ही पहिलीच बॅच घेऊन स्मिता निघाली तेव्हाच मी तीच्या धैर्याला सलाम केला होता. हॅटस् ऑफ टू यू स्मिता...!
No comments:
Post a Comment