“ईशा टूर्स” तर्फे आत्माराम परब
यांच्या लेह-लडाख छायाचित्रांचं प्रदर्शन डोंबिवलीच्या बालभवन येथे भरलं होतं. मी
आत्मारामना भेटून डोंबिवलीतील नागालँड वसतीगृहातील मुलांची माहिती दिली, त्यावर
आत्मारामनी मुलांना प्रदर्शन पहाण्यासाठी आवर्जून बोलावून घेतलं. मी दुरून पहात
होतो आत्माराम त्या मुलांतीलच एक झाले होते; त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन त्यांना
प्रदर्शनातील छायाचित्रांची महिती देत होते, मुलांची महिती करून घेत होते.
नंतर माझ्याशी बोलतान ते म्हणाले. “मी
दर्ववर्षी हॉर्नबिल फेस्टीव्हलसाठी पर्यटकांना नागालँडमध्ये घेऊन जातो. पण मला
आलिशान लॉज मधील सुखवस्तू पर्यटन अपेक्षित नाही. मला व्हिलेज टुरीझम सुरू करायचंय.
पर्यटकांनी नागालँडमध्यल्या गावात जावं, तेथील नागरीकांच्या घरातच रहावं,
त्यांच्याशी संवाद साधावा ज्यातून खुप काही साध्य होईल. ही दुर्लक्षीत राज्यं आणि
माणसं आपल्याजवळ येतील तेव्हाच दुराव्यातली दरी सांधली जाईल.” हे त्यांचे प्रगल्भ
विचार ऎकून मी थक्क झालो. आत्माराममधील ट्रेकर, मित्र, कार्यकर्ता, संवेदनशील
माणूस या सर्वांची ओळख त्या एका प्रसंगाने मला झाली.
पुरूषोत्तम रानडे
संपादक
prabhuji our ATMA is a great man.
ReplyDeleteThanks Sir.
ReplyDelete