फोटोग्राफीची आवड असलेल्यांसाठी
आणि पर्यटन प्रेमींसाठी आत्माराम परब यांचं हे प्रदर्शन म्हणजे दरवर्षी चालून
येणारी एक संधीच असते. देश तसेच विदेशातील दुर्लक्षीत पण अनोख्या स्थानांचं
मनोवेधक छायाचित्रीकरण करून ते रसिकांसमोर मांडून आत्माराम परब यानी कलाक्षेत्रात
एक उत्तम पायंडा पाडला आहे. त्यांच्या आजवरच्या नावलौकीकाला साजेसं असंच हे
प्रदर्शन असून त्यात लडाखची एकमेवाव्दीतीय अशी चांद्रभुमी, १४५०० फुट उंचावरचा
अनोखा खार्यापाण्याचा तलाव पॅंगॉंग लेक, जगातल्या सर्वोत्तम समुद्र किनार्यांपैकी
एक अंदमान जवळचा राधानगर बीच, मेघालय मधील आश्चर्य असलेला लिव्हींग रुट ब्रीज,
हंपी-बदामीचं जागतीक वारसा लाभलेलं विलोभनीय स्थळ, सिक्कीम मधील गुरूडोंगमारचा
तलाव आणि पद्मसंभवाचा भव्य पुतळा, कांचनजंगाची सोनेरी शिखरं, हिमाचल प्रदेश मधील नयनरम्य
खजीयार, अरुणाचल प्रदेश मधील तवांग मॉनेस्ट्री, आसाम मधील पक्षांचं माहेरघर आणि
सर्वच बाबतीत अनोखं असं माजूली आयलंड तसंच एकशींगी गेड्याचं वास्तव्य असलेलं भारतातील
एकमेव ठिकाण काझीरंगा, नागालॅन्डचा हॉर्नबील फेस्टीव्हल, गुजराथ मधील मोडेरा सुर्य
मंदीर, भुतानची आकाशाशी स्पर्धा करणारी तक्संग मॉनेस्ट्री, व्हीएतनाम मधील हॅलॉंग
बे हे जगातील सात नैसर्गीक आश्चर्यापैकी एक ठिकाण, कंबोडीया मधील अंकोरवाट हे
अतिविशाल आणि प्राचिन हिंदू मंदीर, दक्षीण आफ्रीकेतील बो काप हे पुर्वीचं गुलामंचं
आणि आताचं पर्यटकांचं मुख्य आकर्षण असलेलं खेडं, केनीया टांझानीया मधील प्राणी आणि
पक्षांचं वैभव या आणि अशा अनेक ठिकाणची उत्तमोत्तम छायाचित्रं, माहितीपट तसंच या
ठिकाणी कसं आणि कधी जावं याची इतंभुत माहीती या प्रदर्शना दरम्यान मुंबईकरांना
उपलब्द्ध होणार आहे. प्रदर्शन काळात येणारी तीन दिवसांची सुट्टी देशो देशीचे
देखावे पाहून कारणी लावण्याबरोबरच पुढच्या सुट्टीचे नियोजन करण्याकरीता हे
प्रदर्शन नक्कीच मार्गदर्शक ठरेल. अधीक माहितीसाठी आत्माराम परब यांच्याशी ९८९२१८२६५५
atmparab2004@yahoo.com वर संपर्क साधावा.
Tuesday, January 22, 2013
ऑन द रोड लेस ट्रॅव्हल्ड
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment