आमचे डॉ. प्रेमानंद
रामाणीसर नुकतेच पंच्याहत्तर वर्षाचे
झाले. त्यानी वयाचा हा टप्पा गाठला हे खरं वाटत नाही. गेल्याच वर्षी रामाणीसर आणि त्यांचे
चिरंजीव अनुप आमच्या लेह-लडाखच्या टूरला आले होते. त्या वेळचा त्यांचा उत्साह पाहून
डॉक्टरांना पंच्याहत्तर वर्षाचे कुणीच म्हणणार नाही. डॉ. रामाणी आमच्याबरोबर लेह-लडाखला
आले हा माझ्यासाठी सुखद धक्काच होता. आणि त्या एका धक्क्यावर समाधान न मानता सरांनी
मला व्यक्तिशः अनेक सुखद धक्के दिले. भारतीय लष्कराचा पाहूणचार आणि मानमरातब समोर हात
जोडून उभा असताना डॉक्टर आमच्या सहलीबरोबर पुर्ण वेळ थांबलेच आणि कोणतीच खास सोय घेण्याचं
त्यानी नम्रपणे नाकारलं. अख्ख्या ग्रुपबरोबर मिळून मिसळून वागत त्यांनी केलेली फोटोग्राफी
हा त्या बॅचसाठी आणि मझ्यासाठी अमुल्य असा ठेवा ठरला. “या सहलीत आम्हाला घरगुती वातावरणात वावरल्याचा आनंद मिळाला” अशा शब्दात त्यानी आमच्या आयोजनाला दाद दिली. हजारो पर्यटकांबरोबरच अशी काही ऋषीतुल्य आणि दिलदार माणसं भेटली की ती टूर नेहमीच स्मरणार राहाते तशीच ही टूर माझ्या सदैव स्मरणात राहील.
डॉ. प्रेमानंद
रामाणींना इशा टुर्स तर्फे लाख लाख शुभेच्छा आणि त्यांच्या दीर्घायुरोग्यासाठी परमेश्वराजवळ
प्रार्थना.
आत्माराम परब
No comments:
Post a Comment