लेह शहराकडून पँगगॉंगला निघालं की छांग-ला (पास) नंतरच्या पँगगॉंगकडच्या संपूर्ण भागाला 'चुशूल घाटी' म्हणतात. येथे असणार्य़ा रेजिमेंटला
'चुशूल वॉर्रीअर्स' असं म्हणतात. चांग-ला पासून चीन सीमेपर्यंतची सर्व जबाबदारी या चुशूल वॉर्रीअर्स कडे
असते. याच रस्त्यावर 'मेजर शैतानसिंह' (PVC) फायरिंग रेंज आहे. इथे गेल्यावर चीन-भारत युद्धाच्या इतिहासाच्या आठवणी जाग्या होतात.
मेजर सैतानसिंह यांनी इथे असा पराक्रम गाजवला की त्यांना युद्धा नंतर पुढल्याच वर्षी ‘परमवीर चक्र’ (मरणोत्तर) बहाल केलं गेलं. आज १९ ऑक्टोबर चुशूल घाटीच्या युद्धाला पन्नास वर्षं पुर्ण होत आहेत. दै. लोकसत्ता मध्ये आजच प्रसिद्ध झालेला लेख खास इशा टुर्सच्या वाचकांसाठी आणि प्राणपणाने सिमेचं रक्षण करणार्या भारतीय जवानांना मानाचा मुजरा.
वाचा : दस-दस को एक ने मारा..
No comments:
Post a Comment