स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या दोन काळ्यापाण्याच्या शिक्षेला नुकतीच शंभर वर्ष पुर्ण झाली. वीर सावरकरांनी त्यांच्या आयुष्यातील उमेदिची दहा वर्ष सश्रम कारावासात व्यतीत केली. अंदमान मधील पोर्टब्लेअर तेथील सेल्युलर जेलमध्ये सावरकरांना ठेवण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पणदिनी इशा टुर्स आणि परिवारातर्फे त्यांना ठेवण्यात आलेल्या कोठडीत जावून आदरांजली वाहण्यात आली. गेल्या २६ फेब्रुवारी २०१० रोजी सेल्युलर जेलमध्ये सावरकर प्रेमींचा जनसागरच लोटला होता, त्याचा एक भाग होता आलं हे आम्ही इशा टुर्स परिवार आपलं भाग्य समजतो. वीर सावरकरांना लाख लाख प्रणाम.
No comments:
Post a Comment