Thursday, March 18, 2010
India to build rail line to Ladakh
The ambitious and strategically crucial project to link mountain-locked Ladakh region of Jammu and Kashmir with rest of the country by train has moved a step closer to fructification with the Railways finalising the feasibility report in this regard.
The first rail link is proposed to be between Leh and Bilaspur in Himachal Pradesh and six passenger trains and nine goods trains are planned on the 498 km-long section.
"The feasibility report of Leh-Bilaspur rail link project is almost ready and it will be submitted to Railway Ministry shortly for scrutiny. After the scrutiny, the report would be sent to the Planning Commission before being sent to Parliament for final approval," said a senior Railway Ministry official involved with the feasibility study.
The project is strategically crucial as it is part of India's efforts to improve infrastructure in the border region considering that China has already built a rail link to Tibet.
China has also improved connectivity with Pakistan via the Karakoram highway which runs close to the Indian border.
The proposed Leh rail project came up for discussion at the Army Commanders' Conference here recently in the context of improving supply lines along the border like China has done.
Monday, March 15, 2010
आत्मा
हा माझा जवळचा मित्र. याच्या बाबतीत रोज काहीतरी घडत असतं. कधी लडाखला गेलाय तर कधी भुतानला. नुकताच श्रीलंकेला जाऊन आला. ओळखीतलं कुणीही भेटलं तरी विचारणा होते आत्मा काय करतोय? आता काय म्हणून सांगायचं? हा माणूस एका मागोमाग एक काहीतरी करतच असतो. आपल्याला माहिती असलेलं सगळं सांगायचं असं ठरवलं तरी अनेक गोष्टी सांगायच्या राहून जातात. यावर उपाय म्हणून म्हटलं फेस बुकवर एक ग्रुप तयार करावा. तसा केलाय Atmaram Parab Fan Club या नावाने. बघा...वाचा.. जॉईन व्हा.
आत्मा... ज्याच्याशी माणसं मनाने जोडली जातात. जो सह्य आणि असह्य मित्रांनाही हसत मुखाने सामोरा जातो. क्रिकेट, कस्टमस्, फोटोग्राफी, इंटेरिअर डेकोरेशन अशी मुशाफिरी करत जो आता लोकांना भटकवण्यात दंग आहे. आत्ता तरी तेच करतोय, पुढे काय करणार इश्वर जाणे. एकूण काय, देवाक काळजी...!
लडाख, हिमाचल प्रदेश, स्पिती-व्हॅली, सिक्कीम, भुतान, अरुणाचल प्रदेश, असम, मेघालय, मणिपूर सगळ्या हिमालयात भ्रमंती. हिमालय हा त्याचा ध्यास असं असलं तरी तिकडे असताना सह्याद्रीच्या भेटीचीच मनात आस. म्हणून दशसहस्त्र फुटांवरून जो येतो तो समुद्र सपाटीला पार कोकणात तिकडे सिंधुदूर्गात जाऊन थडकतो. प्रत्येकवेळी नवे सखे-सोबती यांची भर पडलेली असते किंबहूना तीच मिळकत असते. असा हा आत्मा. मी त्याचा फॅन..... आपण...?
Sunday, March 14, 2010
लडाखच्या प्रकाशछटा
| ||
या प्रदर्शनाचे निमित्त होते, गिर्यारोहक आणि प्रकाशचित्रकार आत्माराम परब यांच्या नेतृत्वाखाली 'वॉन्डरर्स' या संस्थेमार्फत हितेंद्र सिनकर, सर्वेश जोशी, मकरंद जोशी, अजय कुळकर्णी, शेहजाद आरसीवाला, अपर्णा भट्टे, राजेश पितळे, रुचिरा राव आणि मेघन पाटणकर या हौशी फोटोग्राफर्सनी केलेल्या लडाखवारीचे! गेल्या वर्षी 15 ऑगस्ट रोजीलडाखमध्ये स्वातंत्र्यदिन साजरा करणे आणि 'टाक- थोक' या बौध्द मठाच्या उत्सवास भेट देण्याचे ठरवून त्यांनी लडाखला भेट दिली होती. यांच्या निवडक फोटोंचे प्रदर्शन पिरॅमलमध्ये भरवण्यात आले होते.
फोटो बघत असताना लडाखबद्दल बरेच जाणून घ्यायची इच्छा असते आणि आपल्या मनातील हे विचार ओळखून आत्माराम परब बोलू लागतात, ''लडाखचा प्रवास 'मुंबई ते मुंबई व्हाया लडाख' असा गृहीत धरला तर तो 17 दिवसांचा आहे. मनाली ते लडाख हा 475 कि. मी.चा प्रवास जीपने केला जात असून हा प्रवास करण्यासाठी तीन दिवस लागतात. कारण तो परिसर एवढा सुंदर आहे की फोटोकरिता इथे जीप थांबवू की तिथे असे होते. साधारण पाच ते सहा जण एका जीपमध्ये असतात. आम्ही विविध ठिकाणी जीप थांबवून फोटो काढले असल्यामुळे लडाखच्या फोटोग्राफ्समध्ये प्रचंड विविधता दिसते. या तीन दिवसांत साधारण 18,300 फूट उंच जात असताना सार्चू हे ठिकाण लागते. हे ठिकाण अतिशय सुंदर असून याच प्रवासादरम्यान आपल्याला झंस्कार आणि सिंधू नदीचा संगम बघायला मिळतो.'' या संगमाचा एक अप्रतिम फोटोग्राफ तेथील प्रदर्शनात लावलेला दिसतो.आत्माराम परब सांगतात, ''तेथील नदीत राफ्टिंग करता येते. साधारण साडेतीन तासांचा सुंदर आणि अतिशय शांत असा हा प्रवास असून या दोन्ही नद्यांच्या तापमानामध्ये साधारण 10 ते 12 डिग्री सेंटीग्रेडचा फरक असतो.''
लडाखच्या प्रवासादरम्यान 'चांग ला पास' हे 17600 फुटांवरील अतिशय सुंदर ठिकाण लागत असून त्या ठिकाणी अनाघ्रात निसर्ग दिसून येतो. बौध्द धर्माच्या खुणा बाळगणारे बौध्द मठ, त्यांचे पारंपरिक उत्सव, जगातील एकमेव मूनलॅण्ड (चंद्राच्या पृष्ठभागाप्रमाणे असलेली भूमी), वैराण वाळवंट आणि त्याचबरोबर उत्तुंग पर्वतराजींवर दिसणारी बर्फाच्छादित हिमशिखरे, प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आपले जीवन जगणारी कणखर मनोवृत्तीची उत्सव प्रिय लडाखी माणसे, त्यांचे रक्षण करणारे भारतीय सैनिक, अशी अनेक वैशिष्टये लडाखच्या सहलीदरम्यान अनुभवायला मिळतात.लडाखमधील पर्यटन आणि प्रदर्शनाबद्दल सांगताना आत्माराम परब सांगतात, ''खडतर प्रवास आणि ऑक्सिजनचे प्रमाण 35 टक्क्यांनी कमी असल्यामुळे तेथील पर्यटन अगदी टिचभरच आहे. तेथील पर्यटन वाढावे, आमच्या दर्जेदार फोटोंच्यामाध्यमातून लडाखमधील दुर्लक्षित पर्यटनस्थळे, विविध संस्कृती, उत्सव, स्थापत्यकला आणि ऐतिहासिक वस्तूंची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी आणि त्याचबरोबर हौशी फोटोग्राफर्सना या प्रदर्शनामधून व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी हे प्रदर्शन आयोजित केले होते.''
200 किंवा 400 आयएसओची फिल्म वापरून काढलेल्या काही फोटोग्राफ्समध्ये आलेले ग्रेन्स चाक्षण फोटोग्राफर्सच्या नजरेतून सुटत नाहीत. फोटोग्राफीबाबत सांगताना आत्माराम परब म्हणतात, ''लडाखला डिजीटल कॅमेरा नेणे केव्हाही चांगले. त्यामुळे किती फोटो काढावे यावर बंधन राहात नाही. पण तरीही एसएलआर कॅमेऱ्याने क्लिक केलेल्या फोटोंची गंमतच काही वेगळी असते. एसएलआर नेल्यास कमीत कमी 20 ते 25 रोल नेणे गरजेचे आहे. कारण तेथे फोटोग्राफीकरिता खूप स्कोप असून तेथे 100 आयएसओची फिल्म वापरणे अतिशय चांगले.''
त्या प्रदर्शनातील सगळेच फोटोग्राफ्स एकापेक्षा एक सुंदर असले तरीही त्यातील काही फोटोंसमोर आपले पाय जरा जास्तीच रेंगाळतात. ते फोटो बघत मनातल्या मनात आपण फोटोग्राफरला दाद देऊन जातो. यामध्ये खास आवर्जून दखल घेण्याजोगे काही फोटोग्राफ्स म्हणजे, आत्माराम परब यांनी 'विथआऊट वरी इन द वर्ल्ड' हा बर्डस् आय व्ह्यूने शेतांच्या तुकडयांचा टिपलेला हिरवेपणा. तसेच अजय कुळकर्णी यांचा शिखरांवर पडलेल्या उगवत्या सूर्याच्या किरणांचा फोटो; 'पेंटिंग इन प्रोग्रेस'. हा फोटोग्राफ अप्रतिम आहे. पांढऱ्या बर्फाच्छादित डोंगरातून वाट काढत गेलेला काळाकूट्ट रस्त्याचा 'व्हाईट मॅजीक' नावाचा राजेश पितळे यांचा फोटोग्राफही खिळवून ठेवतो. अपर्णा भट्टे यांचा 'वाँट टू एक्स्चेंज माय बॅगपॅक?', हितेंद्र सिनकर यांचे 'स्ट्रेच टू लिमिट', 'अलोन बट नॉट लोनली' याबरोबरच फत्तच् एका प्रेच्ममध्ये पकडलेली एक अतिशय सुंदर संध्याकाळ 'ऍन इव्हेनिंग टू रिमेंबर' हे फोटो आपल्याला दंग करून जातात. मेघन पाटणकर यांचा 'फेथ टचेस न्यू लाईटस', शेहजाद आरसीवाला यांचा पॅनगाँग लेकचे प्रतिबिंब असलेला फोटो, हे एकपेक्षाएक उत्कृष्ट फोटोग्राफ्स या प्रदर्शनात बघायला मिळतात. या प्रदर्शनामध्ये असलेला मूनलॅण्डचा फोटो लोकांना मूनलॅण्डची भव्यता समजावी म्हणून सहा प्रेच्म एकत्र करून बनवलेला आहे. या प्रदर्शनाचे वैशिष्टय म्हणजे, त्या प्रदर्शनातील फोटोंना दिलेल्या ओळी नंतरही बऱ्याच वेळ आपल्या मनात रेंगाळत राहतात. लडाखमध्ये फोटोग्राफ्स काढताना फोटोग्राफर्सना सूर्यप्रकाश आणि ढगांच्या सावलीचा (लाईट ऍण्ड शॅडो) अद्भुत खेळ अनुभवायला मिळतो. लडाखमधील 98 टक्के जनता बौध्द असून तेथील लोक शांतताप्रिय आहेत. तेथे अतिरेकी आणि दहशदवाद नाही. लडाखमध्ये 5.30 वाजता उजाडत असून तेथे सूर्यास्तही उशिरा होतो. थंडीत तेथील तापमान वजा चाळीस डिग्रीपर्यंत जात असल्यामुळे घरावर छ)पर लावण्याआधी साधारण पाच ते सहा फुटांचा लाकडांचा थर रचून मग छ)पर लावले जाते. हा फोटोग्राफही त्या प्रदर्शनात बघायला मिळतो.'या प्रदर्शनामधील आत्माराम परब यांचा स्वत:चा आवडता फोटो कोणता?' असे त्यांना विचारले असता ते लगेच 'लाईट प्रचॅम हेवन' या फोटोकडे कटाक्ष टाकतात आणि गालातल्या गालात हसत सांगतात, ''एकदा बेस कॅम्पला जाण्याकरिता 18 कि. मी. चालत जावे लागले. 13 हजार फुटांवरील सात तासांचा सलग चालत केलेला तो प्रवास प्रचंड थकवून गेला आणि बेस कॅम्पला पोहोचल्यावर तंबूत आराम करत पडलेलो असताना मला डोंगरावर पडलेले अप्रतिम उन्हाचे कवडसे दिसले. पण तंबूच्या बाहेर येऊन फोटो काढण्याइतकेही त्राण माझ्यात नव्हते. अशा वेळी मी त्याच अवस्थेत झोपून तो फोटो काढला आहे.''
आत्माराम परब हे कस्टममध्ये काम करत असून त्यांना नेचर आणि वाईल्डलाईफ फोटोग्राफीची प्रचंड आवड आहे. गेली वीस वर्षे ते या क्षेत्रात असून हे त्यांचे तिसरे प्रदर्शन आहे. आत्तापर्यंत लडाखला ते अनेक वेळा जाऊन आले असले तरीही दर भेटीत त्यांना लडाखचे नवे सौंदर्य दिसत असल्यामुळे लडाख त्यांना सतत खुणावत राहतो.
Thursday, March 11, 2010
Motorcycle diaries of riding to heaven
Smita Nair
Mulundkar Shoots to New Heights
Thursday, March 4, 2010
'लडाख' छायाचित्र प्रदर्शन
अंदमानमध्ये वीर सावरकर पुण्यतिथी साजरी.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या दोन काळ्यापाण्याच्या शिक्षेला नुकतीच शंभर वर्ष पुर्ण झाली. वीर सावरकरांनी त्यांच्या आयुष्यातील उमेदिची दहा वर्ष सश्रम कारावासात व्यतीत केली. अंदमान मधील पोर्टब्लेअर तेथील सेल्युलर जेलमध्ये सावरकरांना ठेवण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पणदिनी इशा टुर्स आणि परिवारातर्फे त्यांना ठेवण्यात आलेल्या कोठडीत जावून आदरांजली वाहण्यात आली. गेल्या २६ फेब्रुवारी २०१० रोजी सेल्युलर जेलमध्ये सावरकर प्रेमींचा जनसागरच लोटला होता, त्याचा एक भाग होता आलं हे आम्ही इशा टुर्स परिवार आपलं भाग्य समजतो. वीर सावरकरांना लाख लाख प्रणाम.
Tuesday, March 2, 2010
Drive Through The Himalayas
The group of amateur photographers who call ourselves “Wanderers“. The group was formed in 2003 by Atmaram Parab to promote amateur creative photography.
Who have carried out photography expeditions to different regions of the Himalayan range and attempted to capture the beauty of the place. The unique combination of nature, human life, culture, tradition, Monasteries, rituals of worship, lakes, rivers and high altitude passes found in the region of Leh- Ladakh have been captured beautifully by our team of photographers.
An exhibition of our photographs will be held at:
The Art Gallery,
Prabodhankar Thackeray Natya Mandir
Borivali west
From 4th to 7th March, 2010
(11.00 am - 8.00 pm)
The participating photographers are Atmaram Parab, Tushar Nidambur, Narendra Prabhu, Vinayak Parab, Dr Ghanshyam Borkar, Deepankar Banerjee ,Kedar Malegaonkar, Manoj Naik and Sagar Karnik,
Groups objective is to popularize the Himalayan regions amongst the layman and to attract them to get away from the beaten track to explore this beautiful landscape. At the same time we also aim to make available a platform to showcase the talent and skill of the photographers.
A travel film as well as a Slideshow on Ladakh will also be organized during the Exhibition.
सिंधुदुर्ग - बॅकवॉटर्स
चमकलात ना ? कारण सिंधुदुर्गात बॅकवॉटर्स आहेत याची कल्पना खुद्द सिंधुदुर्गवासियांनाच नाही. असं असलं तरी सिंधुदुर्गात ४२ बॅकवॉटर्स उपल्ब्ध आहेत. अहो असणारच कारण मुळतच हा प्रदेश सागराने श्री. परशुरामासाठी सोडलेला आणि त्यामुळे ' परशुराम भुमी ' म्हणून ओळखला जातो. परशुराम भुमी कशी ? तर त्याने जिंकलेली सर्व भुमी कश्यप ऋषीना दान केली. दान दिलेल्या भुमित राहणे योग्य नाही म्हणून बाण मारून समुद्र मागे हटवला आणि जी भुमी तयार झाली ती कोकणची भुमी. तिला " अपरांत" असेही म्हणतात. ( अपर म्हणजे पश्चिम आणि अंत म्हणजे शेवट ) .सागराने ही जमिन स्वतःहुन परशुरामासाठी सोडली तरीसुध्दा आपल्या जवळ येण्यासाठी अनेक वाटा निर्माण केल्या. अशा या नितांत सुंदर सिंधुदुर्गात नौकानयन करण्यासारखे दुसरे सुख नाही. पण आपली परिस्थिती कस्तुरी मृगासारखीच आहे. या अमुल्य ठेव्याची आपल्याला कल्पनाच नाही.
कर्ली नदीच्या विस्तिर्ण पात्रातुन संथ वहणारे पाणी कापत आपली नौका निघाली कि आपण सारेच देहभान विसरून जातो. दोन्ही बाजुला असलेली गर्द झाडी, माड पोफळींच्या बागा, त्यांच्या छायेत विसावलेली छोटी-छोटी घरकुलं,मंदिरं , मधुनच डोकावणारं एखादं तुळशीवृंदावन, पक्षाची शीळ, खाली हिरवीगार वनराई आणि वर आकाशाची निळाई, वार्याची झुळुक आणि खाली वाहणारं शांत, थंड पाणी. भुलोकीचा स्वर्गच जणु.खरतर ही देवभुमीच. परमेश्वरने एकाच ठिकाणी एवढं निसर्गसौंदर्य ओतलय याचा इतरेजनांना हेवा वाटावा असा हा दृष्टीदुर्लभ देखावा याचीदेही याचीडोळा आपण पहातोय हे खरंच वाटत नाही. खरंखुरं स्वप्नातलं गाव.
हळुहळु अपली नौका नेरुरपार जवळ येते. वाटेत नदीच्या तळाशी बुडी मारून रेती काढणारे मजुर त्यांच्या पडावासहीत दिसतात. मधुनच एखादा माड आपल्याशी हस्तांदोलन करून जवळीक साधण्यासाठी पुढे आलेला असतो. दिड-पावणेदोन तासांच्या फेरफटक्यानंतर वालावल हे आणखी एक अप्रतिम गाव लागतं.हेमाडपंथी वास्तुकलेचा नमुन असलेलं श्रीदेव लक्ष्मीनारायण मंदिर तर बघत राहण्या सारखं. मंदिरा लगतचा सुंदर तलाव आणि वनराईने नटलेल्या या गावात विवीध पक्षांचं दर्शनही घडतं. इतर पक्षांबरोबरच धनेश (Horn-bill) हा हमखास दिसणारा पक्षी. पुढे आपली नाव भोगवे या गावी जाते तेव्हा तो या नौकानयनातला परमोच्य बिंदु ठरतो. इथेच सागर-सरितेचं मिलन होतं. समुद्रपक्षांचे थवेच्या थवे इथे पाहायला मिळतात. एवढा वेळ फिरून क्षुधाशांतीसाठी जर आपल्याला थांबायचे असेल तर येथील गावकरी आपले तशी सोयही करतात.
समुद्र आणि सह्याद्रीचे कडे यांचं सख्य इथे पहायला मिळतं. किनार्याने चार किलोमिटर चालत गेल्यास निवतीचा किल्ला लागतो. पुढे डुंगोबा ही देवराई. फार पुर्वीपासून इथल्या वनसंपदेला कुणी हात लावलेला नसल्याने नेहमीपेक्षा वेगळी झाडं इथे पहायला मिळतात. समोरच्या दर्यात आपल्याला डॉल्फीनचं दर्शनही होतं. समुद्रात बुडणारा सोन्याचा गोळा पहाताना एका स्वप्नाची पुर्ती झालेली असते.