Monday, March 19, 2018

हे प्रवासी गीत माझे

लवकरच येत आहे....

नरेंद्र प्रभू  लिखित ग्रंथाली प्रकाशनाचं नवं पुस्तक
‘हे प्रवासी गीत माझे.... आत्माराम परब यांचा रंजक प्रवास’ 

त्या कथनाचं शीर्षक गीत
पर्यटकांस....

हे प्रवासी गीत माझे
गात आहे रोज मी
गुंफूनी हातात तुझिया
हात आहे आज मी

चाललेल्या विरळ वाटा
ज्या मलाही भावल्या
त्या तुम्हाला दावल्या अन
पायवाटा जाहल्या

शोधीत असतो रोज वाटा
मार्गस्थ असतो सतत मी
त्या तिथे क्षितिजापुढेही
पाहतो ना मार्ग मी

घेऊनी आकाश सारे
चालतो रे हे तुझे
घेऊनी अवकाश ये रे
रंग उधळू त्यात रे


नरेंद्र प्रभू


No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails