Wednesday, February 17, 2010

सुस्वागतम्

मित्रहो नमस्कार, इशा टुर्सच्या या नवीन ब्लॉगवर आपलं स्वागत आहे. पर्यटनप्रेमी मित्र मैत्रिणींनो गेली आठ-दहा वर्ष आपल्या सोबत भारतातल्या विविध भागात फिरताना मला जो आनंद मिळाला त्याला तोड नाही. असे अनंत अनुभव, प्रसंग ज्यांनी माझं आयुष्य समृद्ध केलं, नवी दृष्टी दिली आणि मुख्य म्हणजे सतत उत्साही, आनंदी ठेवलं. आयुष्य हा एक प्रवासच आहे आणि प्रवाही आयुष्य जगण्यासाठी पर्यटनासारखं दुसरं साधन नाही. अशाच अनेक सफरीत काही अनुभव येतात, किस्से घडतात की जे इतरांना सागितल्या शिवाय आपल्याला चैन पडत नाही. इशा टुर्स च्या हजारो संतूष्ट पर्यटकांना आपली मतं मांडण्यासाठीचं हक्काचं स्थान म्हणून आम्ही इशा टुर्स परिवार ishatours.blogspot.com हा नवीन ब्लॉग सुरू करत आहोत. आपण आपले पर्यटन विषयक लेख, विचार, लिखाण आम्हाला ishatour@gmail.com किंवा smita.ishatour@gmail.com या इ-मेल पाठवावेत. आपलं लिखाण संपादित केल्यानंतर प्रसिद्ध केलं जाईल. तसेच पर्यटन क्षेत्रातील विविध घडामोडी आणि माहिती या बब्लॉगवरून आपणाला वेळोवेळी देण्यात येईल. आपल्या प्रतिसादाच्या अपेक्षेत आहे.


आत्माराम परब आणि इशा टुर्स परिवार


1 comment:

  1. Wonderful blog, very much excited to visit Ladakh this summer & on & on.....Thanks

    Sandesh Samant

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails