Monday, March 19, 2018

हे प्रवासी गीत माझे

लवकरच येत आहे....

नरेंद्र प्रभू  लिखित ग्रंथाली प्रकाशनाचं नवं पुस्तक
‘हे प्रवासी गीत माझे.... आत्माराम परब यांचा रंजक प्रवास’ 

त्या कथनाचं शीर्षक गीत
पर्यटकांस....

हे प्रवासी गीत माझे
गात आहे रोज मी
गुंफूनी हातात तुझिया
हात आहे आज मी

चाललेल्या विरळ वाटा
ज्या मलाही भावल्या
त्या तुम्हाला दावल्या अन
पायवाटा जाहल्या

शोधीत असतो रोज वाटा
मार्गस्थ असतो सतत मी
त्या तिथे क्षितिजापुढेही
पाहतो ना मार्ग मी

घेऊनी आकाश सारे
चालतो रे हे तुझे
घेऊनी अवकाश ये रे
रंग उधळू त्यात रे


नरेंद्र प्रभू


Monday, March 12, 2018

हे प्रवासी गीत माझे....!


लवकरच आपल्या भीटीला येत आहे ग्रंथाली प्रकाशनाचं नवं पुस्तक









हे प्रवासी गीत माझे.... आत्माराम परब यांचा रंजक प्रवास
हे   श्री. आत्माराम परब यांच्या अखंड प्रवास  यात्रेचे श्री. नरेंद्र प्रभू यांनी शब्दबद्ध  केलेले वर्णन वाचताना प्रभूंनीच उदधृत केलेल्या ओळी आठवतात....

कितीक चढते घाट पाहिले
अनेक वळत्या वाटा
हरेक वळणावरती वाटे

पुढे काय रे आता  
 

पुढे काय....पुढे काय....पुढे काय....? अशी तीव्र उत्कंठा वाचकाच्या मनात निर्माण करून त्याला पानांमागून पानांचा फडशा पाडायला प्रवृत्त करणारं हे पुस्तक आहे ! पुस्तकाचं हस्तलिखित मला मिळालं आणि वाचताना मी अक्षरश: तल्लीन झाले. खरंच हे पुस्तक वाचताना वाचक रममाण होतील अशी माझी खात्री आहे.
जेष्ठ समाजसेविका आणि लेखिका

 रेणू गावस्कर 






LinkWithin

Related Posts with Thumbnails