अग्रगण्य अशा लोकप्रभा साप्ताहिकात इशा टुर्सचे संचालक आत्माराम परब यांचा केनिया आणि टांझानिया या प्राणी आणि पक्षांच्या नंदनवनाबद्दलचा माहितीपर लेख प्रसिद्ध झाला आहे. सदर लेख खास आपल्यासाठी खाली देत आहे.
एखाद्या सिंहाच्या कळपाने केलेली थरारक शिकार, एखाद्या चित्त्याने हरणांच्या कळपाचा केलेला जीवघेणा पाठलाग, शिकार झाडावर खेचून नेणारा बिबळ्या, मेलेल्या जनावराभोवती जमलेली गिधाडे.. केनिया- टांझानियाच्या जंगलांमध्ये घडणारं हे निसर्गाचं दर्शन भुरळ घालणारं असतं...
ज्या व्यक्तींना निसर्गाची ओढ आहे, त्यांनी आयुष्यात एकदा तरी भेट द्यायला हवीत अशी स्थळे आहेत केनिया आणि टांझानिया. आर्थिकदृष्टय़ा अतिशय मागासलेली आणि गरीब असणारी ही दोन शेजारील राष्ट्रे जैवविविधतेच्या बाबतीत मात्र गर्भश्रीमंत आहेत. लाखोंच्या संख्येत प्राणी आणि पक्षी पाहायचे असतील तर या दोन देशांशिवाय पर्याय नाही. आफ्रिकन सिंह,
चित्ते,
बिबळे,
कोल्हे,
तरस असे हिंस्र प्राणी तसेच गेंडे, गवे, हत्ती,
हिप्पो यांच्यासारखे अजस्र प्राणी त्याचबरोबर केवळ आफ्रिकेत मिळणारे जिराफ,
झेब्रा यांच्यासारखे प्राणी इथे पाहायला मिळतात. हरणांच्या अनेक जाती हजारोंच्या संख्येने पाहाण्याचे भाग्य ‘डिस्कव्हरी’ किंवा ‘अॅनिमल प्लॅनेट’
यांच्याव्यतिरिक्त इथे आल्याशिवाय मिळणार नाही. निसर्गाचा हा अद्भुत नजारा ‘याची देही याची डोळा’
बघण्याची मजा काही औरच आहे.
केनिया आणि टांझानिया या दोन देशांमध्ये अनेक सरकारी राष्ट्रीय उद्याने आहेत. त्यांची प्रत्येकाची अशी खास वैशिष्टय़े आहेत. या सरकारी उद्यानांबरोबरच काही खासगी उद्यानेदेखील आहेत. त्याला ‘प्रायव्हेट कॉन्झरवरी’ असे म्हणतात. सर्व प्रथम पाहूया केनियाच्या वैशिष्टय़ांबद्दल. केनिया हा आफ्रिकेच्या किनारपट्टीवर वसलेला पाच लाख छप्पन्न हजार सहाशे चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये पसरलेला आणि विशेष म्हणजे विषुववृत्तावर पसरलेला आहे. तसेच देशाचा ४० टक्के भाग हा राष्ट्रीय आणि खासगी उद्यानांनी व्यापलेला आहे.
केनिया आणि टांझानिया या दोन देशांमध्ये अनेक सरकारी राष्ट्रीय उद्याने आहेत. त्यांची प्रत्येकाची अशी खास वैशिष्टय़े आहेत. या सरकारी उद्यानांबरोबरच काही खासगी उद्यानेदेखील आहेत. त्याला ‘प्रायव्हेट कॉन्झरवरी’ असे म्हणतात. सर्व प्रथम पाहूया केनियाच्या वैशिष्टय़ांबद्दल. केनिया हा आफ्रिकेच्या किनारपट्टीवर वसलेला पाच लाख छप्पन्न हजार सहाशे चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये पसरलेला आणि विशेष म्हणजे विषुववृत्तावर पसरलेला आहे. तसेच देशाचा ४० टक्के भाग हा राष्ट्रीय आणि खासगी उद्यानांनी व्यापलेला आहे.
अंबोसेली
नॅशनल पार्क
केनियामधील अंबोसेली नॅशनल पार्क हे प्रसिद्ध आहे आफ्रिकन हत्तींसाठी. या हत्तींचे वैशिष्टय़ म्हणजे प्रत्येक नर आणि मादीला असणारे अजस्र हस्तिदंत आणि सुपासारखे मोठे कान. अंबोसेली हे पार्क केनिया आणि टांझानिया या देशांच्या सीमेवर आहे. या पार्कमधील सफारीदरम्यान प्रत्येक वेळी शेकडे हत्ती आणि त्यामागे दिसणारा माऊंट किलिमंजारो डोळ्यांचं पारणं फेडतो. माऊंट किलिमंजारो हा पर्वत आफ्रिकेमधील सर्वात उंच म्हणजे २९००० फूट उंचीचा पर्वत आहे ज्यावर कायम बर्फ असतो. अंबोसेली हत्तींसाठी प्रसिद्ध असलं तरीही इथे सर्वच प्राणी मुबलक प्रमाणात पाहायला मिळतात.
अँबरडेअर नॅशनल पार्क हे केनियामधील समृद्ध वाइल्डलाइफचं एक प्रतीक आहे. या पार्कचं वैशिष्टय़ म्हणजे इथे कोणत्याही प्रकारची जीवसफारी करता येत नाही. इथे असलेल्या केवळ तीन आलिशान लॉँजेसमध्ये राहून,
त्या त्या लॉँजेसच्या गॅलरीमधूनच वाइल्डलाइफचा आनंद घेता येतो.
ओल पजेय
ओल पजेय ही एक Private Conservancy आहे. या Conservancy चे वैशिष्टय़ म्हणजे या १०००० एकर क्षेत्रफळ असलेल्या पार्कमध्येच स्वीटवॉटर टेन्टेड कॅम्प नावाचे रीसॉर्ट आहे आणि त्यात दोन पाण्याचे साठे (Waterholes) आहे. तिथे सर्व प्राणी आळीपाळीने पाणी पिण्यासाठी येतात आणि त्याचा आनंद तुम्हाला रिसॉर्टमध्ये बसल्याबसल्या घेता येतो. ओल पजेय हे चिंपाझी कनझव्र्हेशनसाठीही प्रसिद्ध आहे.
लेक नकुक
लेक नकुक हा खाऱ्या पाण्याचा तलाव विशेष करून फ्लेमिंगो आणि पेलिकन यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. लाखोंच्या संख्येने हे पक्षी पाहताना डोळ्यांचं पारणं फिटतं. या पक्ष्यांबरोबरच इतरही अनेक पाणपक्षी या सरोवरामध्ये सहजपणे पाहावयास मिळतात आणि अर्थातच सर्व प्रकारचे प्राणीसुद्धा. लेक नकुकमध्ये जिराफाची वेगळी जात पाहता येते ती म्हणजे Rothschild Giraffe आणि त्याचबरोबर Eland नावाचा सर्वात मोठा Antelope ही इथे पाहावयास मिळतो.
मसाई मारा


सर्व छायाचित्रे : आत्माराम परब
Atmparab2004@yahoo.com