‘वॉन्डररर्स’ या हौशी छायाचित्रकारांपैकी काही जण श्री. आत्माराम परब यांच्या नतृत्वाखाली याच ठिकाणी जाऊन आले. गेल्या वर्षभरात यांनी काढलेल्या चायाचित्रांचं प्रदर्शन येथे मांडण्यात आलं आहे. अशाच 'वॉन्डररर्स' पैकी मानव दवे, नरेंद्र प्रभु, गिरीश गाडे, विराज नाईक, वसूधा माधवन, गिरीश केतकर, सतिश जोशी, आणि आत्माराम परब यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन पु.ल. देशपांडे कला दालन, रविंद्र नाटयमंदिर आवार, प्रभादेवी, मुंबई येथे दिनांक १६ जानेवारी ते २३ जानेवारी, २०११, सकाळी ११ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य आयोजित करण्यात आले आहे.
या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्धाटन दिनांक १५ जानेचारी २०११ रोजी सूप्रसिध्द छायाचित्रकार श्री. अधिक शिरोडकर यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्यानी सर्वच छायाचित्रकारांच्या कलेचं कौतूक केलं आणि लडाखला या वयातही जावसं वाटतं असं मनोगत प्रकट केलं. या प्रदर्शनाला रसिक पर्यटन प्रेमीं बरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरानी आत्तापर्यंत भेट दिली आहे आपणही या संधीचा लाभ उठवावा.
सदर प्रदर्शन 'इशा टुर्स्
' ने प्रायोजित केलं असून इशा टुर्स् तर्फे याप्रदर्शनादरम्यानहिमालयातील, भ्रमंती, लडाख, स्पिती व्हॅली, भूतान, सिक्किम, असाम अरूणाचल प्रदेश, मेघालय, नागालॅन्ड, विदेशातील केनीया, दुबई तसेच अन्य ठिकाणांची महिती, स्लाईड शो चित्रफित आणि मार्गदर्शन विनामुल्य उपलब्ध करून दिले जाईल. संपर्क : 9892182655, 9320031910.
.