वन्यजीव, प्राणी आणि पक्षी बघण्यासाठी कॉंक्रीटच्या जंगलातून खर्या खुर्या जंगलातच जावं लागतं. आफ्रिकेतील विशेषत: केनियातील जंगल हे पृथ्वीतलावरचं सध्याचं सर्वात समृद्ध जंगल आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते ज्या जंगलात सिंह, वाघ, गेंडा, हत्ती व रानरेडे (गवे) असतात ते जंगल अन्न साखळीच्या दृष्टीने उत्तम असतं. स्थलांतर करताना झेब्रा, जिराफ अशा प्राण्यांच्या झुंडीच्या झुंडी केनियात पहायला मिळतात. इतर ठिकाणी जे प्राणी-पक्षी पाहाण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतात ते केनियाच्या जंगलात सहजपणे पाहायला मिळतात. स्वप्नवत जंगल सफारी , नेत्र दीपक वन्य जीवन , सुंदर समुद्रकिनारा व वर्षभर आल्हाददायक हवामान ह्या साठी केनिया प्रसिद्ध आहे. स्थलांतर करणारे असंख्य पक्षांचे थवे आणि प्राण्यांचे कळप पाहून मन हरकून जात. वन्य जीवनाचा निखळ आनंद घेण्यासाठी, तीथल्या उत्साहाचा आणि भारावलेल्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी आयुष्यात एकदातरी केनियाची सफर केलीच पाहिजे.
‘वॉन्डररर्स’ या हौशी छायाचित्रकारांपैकी काही जण आत्माराम परब यांच्या नेतृत्वाखाली केनियाची सफर करून आले. अशाच 'वॉन्डररर्स' पैकी रेखा भिवंडीकर, तुषार निदांबूर, सुधिर धर्माधिकारी, प्रमोद पाटील, निर्भय पाटील आणि आत्माराम परब यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन पु.ल. देशपांडे कला दालन, रविंद्र नाटयमंदिर आवार, प्रभादेवी, मुंबई येथे २८ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०१२, सकाळी १२ ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन सर्वाना विना मूल्य खुले आहे.
No comments:
Post a Comment