Friday, January 24, 2014

टोपीवाला व्याख्यानमाला


श्री. आत्माराम परब
महाराष्ट्राच्या सांकृतीक जीवनात सण-उत्सवांना आणि दिवाळी अंकाना जेवढं महत्व आहे तेवढच महत्व व्याख्यानमालानांही आहे. गेली ४१ वर्ष गिरगाव, मुंबई येथे आयोजित करण्यात येणारी ‘टोपीवाला व्याख्यानमाला’ गिरवावचं सांकृतीक वैभव मानली जाते. टोपीवाला ज्ञानमंडळाचा एक उपक्रम असलेल्या या व्याख्यानमालेत आजपर्यंत स.का. पाटील,  बाळासाहेब ठाकरे ते राज ठाकरे असे राजकारणी, बापू नाडकर्णी, पद्माकर शिवलकर, असे खेळाडू, माधव मंत्री, व्दारकानाथ संझगीरी सारखे क्रिडा समिक्षक,  अनिरुद्ध पुनर्वसू, व.पु. काळे ते गंगाराम गवाणकर सारखे साहित्तिक, माधव गडकरी ते विजय कुवळेकर यां सारखे पत्रकार अशा अनेक क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती टोपीवाला व्याख्यानमालेत व्याख्यानं मुलाखती देवून गेल्या.              


दि. २५  ते २९ जानेवारी २०१४ या काळात या वर्षीची व्याख्यानमाला होत असून २८ जानेवारी रोजी  आत्माराम परब यांची मुलाखत होणार आहे. नुकत्याच प्रकाशीत झालेल्या आणि अल्पावधीत दुसरी आवृत्ती निघालेल्या ‘लाडाख,  ...प्रवास अजून सुरू आहे’ या पुस्तकाच्या अनुशंगाने ही मुलाखत होणार असून आत्माराम परब यांनी मुंबई ते लाडाख अशा दुचाकीवरून केलेल्या प्रावासातील थरारक अनुभव त्यांच्या तोडून श्रोत्यांना ऎकायला मिळणार असून श्री. नरेंद्र प्रभू  ही मुलाखत घेणार आहेत. १९९५ साली आत्माराम परब यांनी हा थरारक अनुभव घेतला आणि ते लडाख प्रांताच्या प्रेमातच पडले. नुकतीच आत्माराम परब यांनी स्वत:ची एकशे एकवी लडाख सफर पुर्ण केली. लडाख भेटींचं शतक हा सुद्धा एक विक्रमच असून एवढ्यावेळा लडाखला जाण्यासारखं तिथं काय दडलंय हे त्यांच्याच तोंडून ऎकण्यासारखं आहे. कुडाळदेशकर गौड ब्राम्हण निवास, मॅजेस्टीक मॅल समोर, गिरागाव, मुंबई ४०० ००४  येथे रात्री ठिक ८.३० वाजता ही मुलाखत होणार असून सर्वांना विनामुल्य प्रवेश राहील. 
                         

LinkWithin

Related Posts with Thumbnails