Tuesday, December 16, 2014

आत्मास


आज ईशा टूर्सच्या पुण्याच्या कार्यालयाचं उद्घाटन होत आहे, मी जावू शकलो नाही पण हे शब्द तरी जावूदे.

प्रिय आत्मा...

तुझ्या यशाच्या दिव्य पताका
पुण्य भूमीवर फडकू दे
तुझ्या ‘ईशा’च्या या वळणावर
सकल चांदणे बहरू दे

सह्य-हिमालय करीशी सोपा
सुविधांचा तो पुर्वांचल
दुर्गम नाही उरला आता
अंदमानचा सेल्युलर

कर भ्रमण कर विदेशातही
तुझाच आहे धृव उत्तर
त्रिखंडातही नाव होवूदे
नसेल जागा धरणीवर

तू सहलसाथी हो सर्वांचा अन
दाखव जग हे सकल जना
उदंड होईल ईशकृपेने
‘ईशा’ नाव हे मना मना

तुझ्या यशाच्या दिव्य पताका
या भूमीवर फडकू दे
तुझ्या साथीने देश-विदेशी  
सफर जनांना घडवू दे


नरेंद्र प्रभू
१६ डिसेंबर २०१४ 

Friday, October 17, 2014

सहलीला जाताना...


दक्षता दिवाळी अंकात आत्मारम परब यांचा लेख प्रसिद्ध झाला.


सहलीचा नुसता विचार जरी मनात आला तरी आपल्या चित्तवृत्ती प्रफुल्लीत होतात. रोजच्या जीवनातलं साचलेपण दूर करण्यासाठी, पुन्हा एकदा नव्याने सुरूवात करण्याआधी ताजंतवानं होण्यासाठी आपण सहलीला जातो. सहलीला कुठे जायचं?  कुणासोबत जायचं? काय बघायचं?  अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायला सुरूवात होते. सहलीची मज्जा नेमकी इथेच सुरू होते. सहलीचं ठिकाण जेवढं लवकर नक्की करता येईल तेवढं ते केल्याने ती सहल अधिक सुखकारक होते. आपल्या खंडप्राय देशात हजारो पर्यटन स्थळं विकसीत झाली आहेत, फक्त भारत देश संपुर्ण फिरायचा असं ठरवलं तरी शेवटी काहीतरी शिल्लक राहीलच अशी त्याची व्याप्ती आहे, बाकी जग फिरायच ठरवलं तर पहायलाच हवीत अशी कितीतरी ठिकाणं डोळ्यासमोर येतात.


आत्माराम परब     
संचालक ईशा टूर्स
9892182655






Monday, July 21, 2014

‘कैलास’साठीचं हे दार उघडलं गेलं पाहिजे


कैलास-मानस यात्रा ही तमाम भारतीयांसाठी श्रद्धेचा विषय आहे. निसर्गाचं ते अफाट रूप याची देही याची डोळा पाहण्यासाठी सारी धडपड चालू असते. भारतातून उत्तरांचलाच्या दुर्गम भातून ही यात्रा करताना अनेक अडचणी नेहमीच येत असतात. (भारत सरकारतर्फे नेण्यात येणारी यात्रा याच मार्गे नेण्यात येते.)  तो द्रविडीप्राणायाम टाळण्यासाठी नेपाळच्या काठमांडू इथे जावून पुढे कोडरी- न्यालम-न्यु-डोंगपा-च्यु-गुंफा करत कैलास गाठायचं म्हणजे रस्ते चांगले असले तरी फार लांबचा प्रवास करावा लागतो.या पुर्ण प्रवासाला तेरा दिवस लागतात. शिवाय या भागात एखाद्याची प्रकृती बिघडल्यास त्याला पुन्हा त्याच मार्गे परतावं लागतं.  

या वर्षी चिन सरकारच्या अगम्य करभारामुळे यात्रेकरूंना खुप त्रास सहन करावा लागत आहे. तसा तो नेहमीच होतो असा अनुभव आहे. भरमसाठ फि भरूनही योग्य वेळी तिबेटमध्ये प्रवेश मिळेलच अशी खात्री देता येत नाही. अशा वेळी यात्रेकरू आणि त्यांना सेवा देणार्‍या पर्य़टन संस्थांना बराच मनस्ताप सहन करावा लागतो. यावर उपाय काय? तर कैलासला जायचे असलेले पर्यायी मार्गे खुले करणे.

भारतातील लडाख प्रांतातून तिबेटमध्ये प्रवेश करून मानसरोवर जवळच्या मार्गाने गाठता येईल आणि वेळ आणि पैसा दोन्ही वाचेल.

आणखी एक मार्गे आहे तो असा की तिबेट मधल्या गुन्सा विमानतळ जर भारतीय विमानांसाठी खुला केला तर काठमांडू मार्गे गुन्सा इथे जावून १५० कि.मी. अंतरावर असलेलं मानस गाठता येवू शकतं. सध्या तिथे विमाना जाण्यासाठी पहिल्यांदा ल्हासा इथे जावं लागतं आणि तिथे जावून अन्य विमानने गुन्सा इथे जाता येतं. असा प्रवास कुणी करत नाही.


हे दोन मार्गे खुले झाल्यास चिनला अधिक प्रमाणात  परकियचलन मिळेल, तिथला रोजगार वाढेल आणि मुख्य म्हणजे भारतीय यात्रेकरुंची त्रासातून सुटका होईल. इथे दिलेल्या नाकाशावरूनही मानस केती जवळ आहे आणि सद्ध्या किती फेरा घालावा लागतो याची कल्पना येते.            

Sunday, February 16, 2014

संवेदनाशील “श्रीमंत” मित्र !



“ईशा टूर्स” तर्फे आत्माराम परब यांच्या लेह-लडाख छायाचित्रांचं प्रदर्शन डोंबिवलीच्या बालभवन येथे भरलं होतं. मी आत्मारामना भेटून डोंबिवलीतील नागालँड वसतीगृहातील मुलांची माहिती दिली, त्यावर आत्मारामनी मुलांना प्रदर्शन पहाण्यासाठी आवर्जून बोलावून घेतलं. मी दुरून पहात होतो आत्माराम त्या मुलांतीलच एक झाले होते; त्यांच्या खांद्यावर हात ठेऊन त्यांना प्रदर्शनातील छायाचित्रांची महिती देत होते, मुलांची महिती करून घेत होते.

नंतर माझ्याशी बोलतान ते म्हणाले. “मी दर्ववर्षी हॉर्नबिल फेस्टीव्हलसाठी पर्यटकांना नागालँडमध्ये घेऊन जातो. पण मला आलिशान लॉज मधील सुखवस्तू पर्यटन अपेक्षित नाही. मला व्हिलेज टुरीझम सुरू करायचंय. पर्यटकांनी नागालँडमध्यल्या गावात जावं, तेथील नागरीकांच्या घरातच रहावं, त्यांच्याशी संवाद साधावा ज्यातून खुप काही साध्य होईल. ही दुर्लक्षीत राज्यं आणि माणसं आपल्याजवळ येतील तेव्हाच दुराव्यातली दरी सांधली जाईल.” हे त्यांचे प्रगल्भ विचार ऎकून मी थक्क झालो. आत्माराममधील ट्रेकर, मित्र, कार्यकर्ता, संवेदनशील माणूस या सर्वांची ओळख त्या एका प्रसंगाने मला झाली.

पुरूषोत्तम रानडे
संपादक
ईशान्य वार्ता                   

Monday, February 10, 2014

Exclusively for Isha’s Pune Travellers.


Dear Isha’s Traveller,
Participate in Photo-Exhibition at Pune.
Exclusively for Isha’s Pune Travellers.
It has been our privilege to associate with you for various pleasure tours conducted by Isha Tours. You must have had wonderful experiences that you may have made it truly memorable with your clicks.
We proprose to organise 3rd Annual Photo Exhibition - “Travel Shots” on the road less travelled,specially for our Travellers from Pune to show case such wonderful, memorable moments, destinations captured with your camera.
Such initiatives help to introduce certain off-beat travel destinations, which are not widely covered by tourist operators and thus not visited by the tourists. Keeping in tune with our policy to promote these unique destinations, to help the common travelers to explore the beauty of such locations, we are organizing this Photo Exhibition. We consciously create this platform to demonstrate the talent and skills of Isha’s Travellers.
We request you to participate in this Photo Exhibition to be held in Pune at Yashvantrao Chavan Art Gallery, Kothrud from 6th to 9th March, 2014, open for visit between 11am to 9pm.   
This is how you can participate by sending your the Best Photographs …
·         Entry open for Isha’s Travellers from Pune only.
·         No Entry Fees.
·         Please state your name, address with contact details of email, mobile etc.
·         Indicate the Tour Name and the period of Travel or your own travel.
·         Entry for photographs of off-beat & less-travelled Destinations only.
·         No restrictions like Age or Techincal specifications etc.
·         Send up to maximum Ten photos, per entry.
·         Photo-size not to exceed 700 KB, with the Photo’s Description.
·         Final Date of Submission is 20th February 2014.
·         Please submit to email id : info@ishatours.net  
·         You may contact for any clarification - Mobile Ph. : 93245 31910
Our expert panel will select the photographs for display. You will be informed by our office of your selected photographs with a request you to send us high resolution photos by 25th February, 2014, to enable us to organize professional display in the exhibition.
With Best Wishes
TEAM ISHA

Saturday, February 8, 2014

चला लडाखला


विनामुल्य पर्यटन मार्गदर्शन
दि.  ८  फेब्रुवारी संध्याकाळी ६ ते ७ 
दि. ९ फेब्रुवारी सकाळी ११ ते १२  संध्याकाळी ६ ते ७
स्थळ: पु.ल.देशपांडे कलादालन, रविंद्र नाट्यमंदिर प्रभादेवी, मुंबई  ४०० ०२५.
अधिक माहितीसाठी संपर्क ९३२००३१९१० / ९८९२१८२६५५


Friday, January 24, 2014

टोपीवाला व्याख्यानमाला


श्री. आत्माराम परब
महाराष्ट्राच्या सांकृतीक जीवनात सण-उत्सवांना आणि दिवाळी अंकाना जेवढं महत्व आहे तेवढच महत्व व्याख्यानमालानांही आहे. गेली ४१ वर्ष गिरगाव, मुंबई येथे आयोजित करण्यात येणारी ‘टोपीवाला व्याख्यानमाला’ गिरवावचं सांकृतीक वैभव मानली जाते. टोपीवाला ज्ञानमंडळाचा एक उपक्रम असलेल्या या व्याख्यानमालेत आजपर्यंत स.का. पाटील,  बाळासाहेब ठाकरे ते राज ठाकरे असे राजकारणी, बापू नाडकर्णी, पद्माकर शिवलकर, असे खेळाडू, माधव मंत्री, व्दारकानाथ संझगीरी सारखे क्रिडा समिक्षक,  अनिरुद्ध पुनर्वसू, व.पु. काळे ते गंगाराम गवाणकर सारखे साहित्तिक, माधव गडकरी ते विजय कुवळेकर यां सारखे पत्रकार अशा अनेक क्षेत्रातील गणमान्य व्यक्ती टोपीवाला व्याख्यानमालेत व्याख्यानं मुलाखती देवून गेल्या.              


दि. २५  ते २९ जानेवारी २०१४ या काळात या वर्षीची व्याख्यानमाला होत असून २८ जानेवारी रोजी  आत्माराम परब यांची मुलाखत होणार आहे. नुकत्याच प्रकाशीत झालेल्या आणि अल्पावधीत दुसरी आवृत्ती निघालेल्या ‘लाडाख,  ...प्रवास अजून सुरू आहे’ या पुस्तकाच्या अनुशंगाने ही मुलाखत होणार असून आत्माराम परब यांनी मुंबई ते लाडाख अशा दुचाकीवरून केलेल्या प्रावासातील थरारक अनुभव त्यांच्या तोडून श्रोत्यांना ऎकायला मिळणार असून श्री. नरेंद्र प्रभू  ही मुलाखत घेणार आहेत. १९९५ साली आत्माराम परब यांनी हा थरारक अनुभव घेतला आणि ते लडाख प्रांताच्या प्रेमातच पडले. नुकतीच आत्माराम परब यांनी स्वत:ची एकशे एकवी लडाख सफर पुर्ण केली. लडाख भेटींचं शतक हा सुद्धा एक विक्रमच असून एवढ्यावेळा लडाखला जाण्यासारखं तिथं काय दडलंय हे त्यांच्याच तोंडून ऎकण्यासारखं आहे. कुडाळदेशकर गौड ब्राम्हण निवास, मॅजेस्टीक मॅल समोर, गिरागाव, मुंबई ४०० ००४  येथे रात्री ठिक ८.३० वाजता ही मुलाखत होणार असून सर्वांना विनामुल्य प्रवेश राहील. 
                         

LinkWithin

Related Posts with Thumbnails