Monday, March 11, 2013

तृप्त भावनाआज आपला अंदमान ट्रीपचा शेवटचा दिवस, उद्यापासून आपण सारे आपापल्या व्यापात मग्न होऊ आणि त्यासाठीच हे थोडेसे मनोगत आणि थोडीशी कृतकृत्यता.

मी आणि माझी मोठी बहीण आक्का, म्हणजे तुमच्या आवडत्या शरद पोंक्षेंची आई, आम्हा दोघींच्याही बाबतीत अंदमान ट्रीप म्हणजे एक आगळावेगळा अनुभव ठरला आहे. आम्ही दोघींनी विमानप्रवासही प्रथमच केला. एवढी लांबची ट्रीपही प्रथमच केली. त्यामुळे ट्रीपच्या दरम्यान आलेले सगळे अनुभवही प्रथमच आले. पण हे सारे प्रथम प्रथम असूनही आम्हाला नव्याची नव्हाळी जाणवू न देण्याचं सारं श्रेय आर्थातच ईशा ग्रुपला म्हणजेच श्रीयुत आत्माराम परब आणि श्री. प्रभू यांना व काही अंशी सर्व सहभागी पर्यटकांनाही जातं.

आम्हाला कुठे परकेपणा किंवा अलिप्तपणा जाणवत नव्हता. श्री. परब यांच्या नावाप्रमाणेच त्यांच्या या ट्रीप आयोजनात आत्मा ओतत असल्याने ट्रीप राममय होऊन जाते. त्यातील रामाच्या जोडीला प्रत्येक वेळी लक्ष्मणाच्या रुपाने प्रभूंची साथ असते, त्यामुळे संपूर्ण ट्रीपचं वातावरण आनंददायी होतं व लोक ज्या उद्देशाने ट्रीपला येतात तो उद्देशही सफल होतो.

या राम लक्ष्मणाला आणखी एक शाब्बासकी दिली पाहिजे. तुमच्या जवळ ट्रीपला येण्याची फक्त इच्छा पाहिजे. मग तुम्ही कोणात्या वयाच्या आहात? किंवा तुम्ही शारीरीक दृष्ट्या सक्षम आहात का? किंवा आणखी काही, या कोणत्याही गोष्टी ईशाला नडत नाहीत. तुमची येण्याची ईच्छा आहेना मग झालं तर, आम्ही तुम्हाला सांभाळून नेऊ.

ईशामध्ये ट्रीपला येताना ४४ लोक असले तरी जाताना ती एकच व्यक्ती बनुब जाते, तेव्हा ईशाला म्हणजेच श्री. परब आणि श्री. प्रभू यांना या ट्रीपसाठी धन्यवाद देतानाच त्यांना त्यांच्या पुढील कारकीर्दीसाठी आमच्या कडून खूप खूप शुभेच्छा!
या वेळी असं म्हणावसं वाटतं.

जो जे वांच्छिल तेथे नेईल ईशा
जो जे मागेल ते ते देईल ईशा

सौ. मनिषा करमरकर
            

2 comments:

  1. छान वर्णन . आवडले.
    Sonali
    www.sahityasanskruti.com

    ReplyDelete

LinkWithin

Related Posts with Thumbnails