Sunday, November 4, 2012

ते आठ दिवस...!
नमस्कार,

इशा टूर्स ने आयोजित केलेली आमची श्रीनगर - कारगिल - लेह - लदाख टुर जेव्हा ठरली तेव्हा पासूनच मी खूप excited होते ... मी हळू हळू तिथली माहिती मिळवायला सुरुवात केली... आणि विशेष म्हणजे ती सारी माहिती मला इशा टूर्स च्या ब्लोग्स मध्येच मिळाली... श्री.नरेंद्र प्रभू यांनी इतक्या सरळ आणि जिवंत रीतीने तिथले वर्णन लिहिले होते कि वाचतानाच मी लेह लदाखला पोहचले होते. .. ऑगस्त कधी येतो आणि आम्ही कधी निघतो अशी काहीशी माझ्या मनाची स्थिती झाली  होती.. आणि अखेर तो दिवस आला... आमचा १२ जणांचा ग्रुप होता...आम्ही सगळे मुंबई विमानतळावर भेटलो आणि आमचा प्रवास सुरु झाला..

श्रीनगरला हाउस बोट मध्ये राहण्याचा अनुभव आणि आनंद काही वेगळाच होता. संध्याकाळी शिकारयातून फिरताना तर मी सुद्धा वल्हवण्याचा खूप आनंद लुटला.. खूप शोप्पिंग केल. श्रीनगर ला हिल करत सोनमर्ग मार्गे कारगिल कडे निघालो...वाह सगळी कडेच इतकं सौंदर्य पूर्ण प्रवास फोटो काढण्यात मग्न होते. आणि त्यातच आम्ही द्रास- कारगिल war  मेमोरिअल ला पोहोचलो.. तिथले दर्शन घेतल्यानंतर एका जवान कडून हे युद्ध कसा झाल व आपण ते कसं जिंकलं.. त्यात आपली कशी व कोणती हानी झाली ह्याची माहिती मिळाली. ते ऐकून कान सुन्न झाले डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या. त्या सगळ्या जवानांना नमन करून आमचे अहोरात्र रक्षण करत असल्याबद्दल मनोमन धन्यवाद दिले आणि पुढच्या प्रवासाला लागलो. 

प्रवासात मजा तर होतीच पण मस्ती हि खूप केली. इतकी छान आखली होती आमची ट्रीप कि प्रत्येक वेळा आत्माराम दादाला आपोआपच धन्यवाद दिले जायचे.. आम्ही बिनधास्त होतो कारण कुठे तरी मनात हे माहिती होतं कि आपली पूर्ण काळजी घेतली जाते आहे ..त्यामुळे आपण या निसर्गाचा मनोसोक्त आनंद लुटू शकतो. 

आम्ही लेह ला जायला सज्ज झालो. सज्जच म्हणावे लागेल कारण इतकं काही एकल होतं कि लेह लदाख मध्ये पोहचल्यावर आपण रोबो बनणार असंच वाटायला लागलं होतं. श्रीनगर ते लेह हा प्रवास माझ्या दृष्टीने तरी अवर्णनीय आहे, त्या सौद्याला शब्दच नाहीत.प्रत्येकाने ते स्वतः अनुभवावे. 

कारगिल हून मुल्बेख, नमिकला पास, फोतुला पास, लामायुरू, मून land पार करत सिंधू व झंस्कार नदीच्या संगमावर पोहोचलो..पुढे माग्नेतिक हिल रेंज पार करत पत्थर साहेब गुरुद्वारा मध्ये गेलो. दर्शन घेतलं आणि लेह मधील हॉटेल अल्पाईन व्हिला ह्या हॉटेल ला थांबलो

लेहचे हे  आमचे हॉटेल पण अप्रतिम होते .. त्या हॉटेलचेच बरेच फोटो काढले. दुसऱ्यादिवशी सकाळी लवकर thikasey monestryla भेट दिली. व लदाख फेस्टिवल ला गेलो. आवर्जून कौतुक कराव ते येथील  रहिवाशांच.. इतकी प्रेमळ व निर्मल मनाची माणसे.. वाह.. 

दुसऱ्या दिवशी निघून आम्ही Hall of fame पहिले ते   पाहून मन आतूनच हललं..  पुढे शांती स्तूप पहिला ध्यान मंदिरात ध्यान  केले . संध्याकाळी आम्ही जेव्हा सिंधू घाटावर गेलो तेव्हा तर तेथील छटा तर निराळीच.. संध्याकाळी घाटावर कोणी नव्हते.. शांत मानाने मनोसोक्त नदीच्या प्रवाहाची मजा लुटली. तिथून पाय निघता निघत नव्हता. छान ध्यान लागल होत. 

सकाळी लवकर उठून आम्ही आमचा मोर्चा दिस्कीत (नुब्रा व्हाल्ली) कडे वळवला. तिथे जाण्यासाठी आज आम्ही जगातील सर्वात उंच moterable रोड म्हणजेच खारदुंगला पास (१८३८० फुट ) पार करणार होतो ..आमचा प्रवास त्या दिशेने सुरु झाला.. प्रवास सुरु झाला कि आमचे फोटो सेशन सुरु होत असे...कुठे हि पहा आणि क्लिक करा..  दिस्कीत ला पोहोचल्यावर थोडा आराम करून  आम्ही मैत्रेय बुद्धाची विशाल मूर्ती पाहायला गेलो..तिथून आजूबाजूचा परिसर  देखील खूप छान दिसत होता. फोटो घेतले. तेथून निघून आम्ही लदाख च्या वाळवंटात गेलो.. खूप मजा मस्ती केली.इथे  तिन्ही गोष्टी एकत्र केल्या सारख्या होत्या वाळू, पाणी आणि बर्फाचे डोंगर ... 

दुसऱ्या दिवशी परतून साबू गावात राहायला आलो.. तेथील वास्तव्य मन शांत करून गेलं. लदाख ची झलक तिथे पाहायला आणि अनुभवायला मिळाली.

दुसऱ्या दिवशी अगदी पहाटे पहाटे बाहेर पडलो ते पंगोंग lake पहायच्या ओढीने. १४५०० फीट उंचीवर हा खाऱ्या पाण्याचा लेक तो हि ४०% भारतात तर ६०% चीन मध्ये आहे. येथे पोहचण्यासाठी आम्हाला करू गावातून पुढे चांगला पास (3rd highest pass  of the world at 17800ft )पार करायचा होता. पास वर बर्फ वृष्टी झाली होती .. आम्ही बर्फात मनोसोक्त बागडलो. बर्फाचा गोळा बनवून त्यावर माझा हे पेय टाकून खाल्लं.. आणि पुढये अधेमध्ये थांबत आम्ही लेक वर पोहोचलो आणि त्या पाण्याचे बदलते रंग पाहून थक्क झालो. बराच वेळ त्याची मजा घेत जेवून पुन्हा परतलो. त्या रात्री लेह हॉटेल ला परतून शोप्पिंग आटपले. 

अशा प्रकारे तेथून निघून परत मुंबईला यायचा दिवस उजाडला ... मनात एकाच प्रश्न होता ... खरंच परत  मुंबईला गेलाच पाहिजे का?...

आणि त्या ८ दिवसाच्या सर्व आठवणी मनात साठवत पुन्हा मुंबई कडे उड्डाण केल.

ऋचा खेडेकर  
No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails