Wednesday, June 20, 2012

लडाख - नुब्रा व्हॉली



सिंधू व्हाली, पँगगॉंग लेक नंतरचं प्रमूख आकर्षण होतंनुब्रा व्हॉली. पण या आधी वाटेत आम्हाला खार्दुंगला पास लागणार होता. 18360 फुट उंचीवर असलेला हा पास म्हणजे जगातला सर्वात उंच मोटरेबल रोड आहे. एवढे दिवस खार्दुंगलावर जायची उत्सुकता ताणली गेली होती.नुब्रा व्हॉलीमध्ये एक रात्र रहायचं असल्याने आम्ही त्या तयारीनेच निघालो होतो. लेह शहर सोडलं आणि आमच्या गाड्या खारदुंगलाच्या दिशेनी निघाल्या. खारदुंगलाच्या पायथ्याशी असलेल्या आर्मी चेक पोस्ट वर आमच्या जवळची  IPL Inner line Permit  
दाखवून, गाव सोडून आम्ही जसजसे वरवर जात होतो तसतसा अगदी दूरवरचा प्रदेश आम्हाला नजरेने दिसत होता. एवढ्या लांबवर पहाण्याचा योग या आधी कधी आला नव्हता. हिमालयात अनेक ठिकाणी मी फिरलो असलो तरी तिकडे सगळीकडे झाडं असल्याने मध्ये अडथळा यायचा आणि हवा स्वच्छ नसेल तर पुढचं दृष्य धुसर होत जायचं. इथे तो अडथळाही नव्हता आणि हवाही स्वच्छ होती. आम्ही आणखी वर पोहोचलो. आता संपूर्ण लेह नजरेच्या एका टप्प्यात दिसायला लागलं. त्याही पलिकडे असणारं सिंधू नदीचं पात्र, त्याच्या पुढचं लडाख मधलं उंच शिखर स्तोक कांगरी  हे ही समोर दिसत होतं. एवढं विहंगम दृष्य पाहून सगळेच जण हर्षभरीत झाले होते. मध्येच दिसणारा एक हिरवा पट्टा आणि बाकीचा रुक्ष प्रदेश. आजपर्यंत डोळ्यानी न बघितलेलं असं चित्र डोळ्यात साठवत, जमतील तिथे त्याचे फोटो काढत आम्ही चाललो होतो. थोड्याच वेळात साऊथ पुल्लू हे ठिकाण आलं, केवळ १६ कि.मी. वर असलेल्या खारदुंगला पासवर आता काही मिनीटातच आम्ही पोहोचणार होतो. वळणावळणाचे खराब रस्ते आणि उभा चढ असल्याने ड्रायव्हरचं ड्रायव्हींगचं कसब पणाला लागत होतं. आम्ही हाळूहळू जगातल्या सर्वात उंच मोटर वाहतूकीच्या रस्त्याजवळ पोहोचत होतो. आता रस्त्याच्या दुतर्फा बर्फ होतं.    अचानक एका वळणानंतर रस्ता थोडा सरळ झाला आणि तो आनंदाचा क्षण आला आम्ही १८,३६० फुट उंच अशा खारदुंगला पासवर पोहोचलो होती. हातात तिरंगा घेवून आमचे ग्रुप फोटो काढले. उत्साहाला उधाण आलं होतं. पण अतीशीत आणि जोरदार वाहणारे वारे थंडीचा कडाका वाढवत होते. खारदुंगला पासच्या रस्ता सोडून सगळं बर्फाचच साम्राज्य होतं. विरळ हवा आता आम्हाला त्रासदायक वाटायला लागली. डोकं जड झालं होतं, ठणकायला लागलं होतं. डोळ्यात न सामावणारा निसर्ग मला कॅमेर्‍यात बंद करायचा होता. मी बरेच फोटो काढले. सोविनीअर शॉपमध्ये काही भेटवस्तू विकत घेतल्या आणि  
पुढच्या प्रवासाला निघालो एवढ्यात ड्युटी संपवून परतणारे दोन जवान आमच्या जीपजवळ आले आणि पलिकडे नुब्रा व्हालीत जाण्यासाठी लिप्ट मागायला लागले. त्याना आमच्या जिपमध्ये घेतलं. जिप निघाली. दोन्ही बाजूला बर्फाची तटबंदी आणि मधून जाणारं एखाद दुसरं वाहन. समोर अथांग पसरलेल्या नुब्रा व्ह्यालीचं दर्शन झालं. दूरवर पसरलेल्या बर्फाच्छादीत पर्वत रांगा आम्हाला खुणावत होत्या. समोरच असलेल्या सियाचीन ग्लेशीयर च्या पर्वत रांगा पाहून लाहानपणी शिकलेला भुगोल आठवला. बर्फामुळे निर्माण झालेले वेगवेगळे आकार पाहत असताना सगळ्याचेच फोटो पाहीजेत असं वाटायला लागलं. गाडी आता 16000 फुटांवर आली आणि नॉर्थपुल्लू हे ठिकाण आलं. साउथ पुल्लू ते नॉर्थ पुल्लू हा पुर्ण भाग लष्कराच्या नियंत्रणात असतो. याठिकाणी वाहनांची,माणसांची नोंद करावी लागते आणि पुन्हा परतायचा दिवसही सांगावा लागतो. याच वेळी दुसर्‍या दिवशी कोणत्यावेळी प्रवास करता येईल याची माहिती दिली जाते. त्याच वेळात तिथून प्रवास करावा लागतो. 13 किलोमीटरमध्ये अडीच हजार फुट एवढं खाली आल्याने मागे बसलेल्या त्या जवानाना त्रास व्हायला लागला, मळमळायला लागलं. गाडी थांबवून त्याना पाणी दिलं. पुन्हा पुढचा प्रवास सुरू झाला.  
आता पुन्हा पुढच्या प्रदेशाचं चित्र बदलत गेल. मध्येच खोलगट भागात एखादा हिरवा टापू दिसायला लागला. खार्दुंग, खालसर, डिस्कीट अशी गावं लागली. आम्हाला हुंडर या गावा जवळ पोहोचायचं होतं. एवढ्यात मिलिटरीचं क़ॉंव्हाय आलं. ही आर्मीची वाहन आली की सिव्हिलीयनची वाहनं एकाबाजूला उभीकरून ठेवावी लागतात. शेवटच्या वाहनाने हिरवा झेंडा दाखवला की नंतर आपण जायला हरकत नाही. आमच्या नशीबाने त्यावेळी पन्नस साठच वाहन होती. ती निघून गेली. आम्ही त्या वाहनातल्या जवानांना हात हालवून टाटा करत होतो. ते सुद्धा आनंदाने प्रतिसाद देत होते. खालसर नंतर रस्त्याच्या एका बाजूला शोक नदी आम्हाला साथ करत होती आणि पलिकडे काराकोरम रेंजीस दिसत होत्या. हुंडर जवळ आलं आणि एका ठिकाणी सियाचीन 52 किलोमीटर असा      
बोर्ड दिसला. तो सियाचीन ग्लेशर्सला जाणारा रस्ता होता. आता आम्ही पाकव्याप्त काश्मीरच्या अगदी जवळ जावून पोहोचलो होतो. दुपारचे दोन वाजत आले तेव्हा आम्ही हॉटेल ओलथांगला पोहोचलो आणि नोरबू हा त्या हॉटेलचा मालक सामोरा आला. लडाखच आतिथ्य वाखाणण्याजोग आहे. अतिशय प्रेमाने हे लोक आपलं स्वागत करतात. इथे आणखी एक धक्का बसला. नरेंद्रदत्त हा सातार्‍याचा तरूण तिथला मुख्य आचारी होता. त्याला ते मास्टर म्हणत होते. आज मराठी मंडळी येणार म्हणून तो भलत्याच उत्साहात होता. आपल्या मराठमोळ्या पद्धतीच रुचकर जेवण  त्याने तयार केलं होतं. नुब्रा व्हाली लडाखच्या सखल भागात आहे. 9900 फुट उंची असल्याने इथे हाय ऍल्टीट्यडचा त्रास जाणवत नव्हता. त्यामुळे सगळेच उत्साहात होते. दुपारची जेवणं आटोपली आणि तिथल्या हुंडर इथल्या वाळवंटात आम्ही जायला निघालो. वाळवंटाकडे जिथून आम्ही वळलो तिथे एक पुल लागला. तिथे एक बोर्ड होता. त्यावर लिहीलं होतं NoNo visitors allowed beyond this point तिकडे सैनिक पहारा देत होते. चौकशी केली तेव्हा समजलं की त्या पुला पलिकडे एक खेडं आहे आणि नंतर पाकव्याप्त काश्मीरचा भाग. त्या गावातल्या लोकाना लष्कराने पास दिलेले आहेत.
वाळूच्याटेकड्या तर्‍हेतर्‍हेचे आकार, सॅंड्युंस आणि आकाशात ढगांची गर्दीचारही बाजूला निसर्गाचच वर्चस्वमाणूस इथेशून्य आहे असं वाटत आसतानाच तिथलं आकाशवाणी केंद्र बघून धक्काच बसलादोन बैठ्या इमारती,त्यातूनच कारभार चाललेलाछप्परही नसलेला पेट्रोलपंप सगळच आश्चर्यकारकहुंडरमध्ये डबल हॅम्प कॅमल हे आणखी एक आकर्षण होतं. त्यावरून फेरफटका मारण्यासाठी आमच्या पैकी काही मंडळीनी मोर्चा वळवला. बाकीचे वाळूत खेळण्यात मग्न झाले. नजरेच्या एकाच टप्प्यात बर्फाच्छादीत शिखरं, वाळवंट, पाण्याचा प्रवाह आणि त्याच्याकाठी झुडूपं असं दुर्मिळ दृष्य पाहून डोळ्याचं पारणं फिटलं. काळोख पडे पर्यंत आम्ही हुंडरमध्ये अक्षरशः हुंदडत होतो. त्याच रात्री कॅम्प फायर झालं तेव्हा खास आवाज नसलेल्यांना देखील कंठ फुटला होता.









दुसर्‍या दिवशी डिस्कीट मॉनेस्ट्री पाहीली ती सुंदर आहेच पण उंचावर असल्याने संपुर्ण नुब्रा व्हालीचं तिथून विहंगम दृष्य दिसतं. इकडे जाव तिथे काहीतरी वेगळं बघायला मिळतच. अगदी ते हिमालयीन कावळे सुद्धा काळेकुट्ट, पिवळी चोच आणि भगवे तांबडे पाय. काल आलेल्याच वाटेने आम्ही मागे फिरलो. वाटेत एक मिनिबस बंद पडली होती. त्या बस मधले प्रवासी तिथेच बसले होते. ती आड वाटच होती पणॅ त्याहूनही आड वाटेला असलेल्या दुर्गम खेड्यातले ते प्रवासी असावेत. अगदी  टिपिकल खेड्यातल्या लडाखी वेषात ते असल्याने आम्ही गाड्या थांबऊन त्यांची फोटो काढण्यासाठी उतरलो. आणि आम्हाला दहा मिनीटे थंबून रहावं लागलं. आम्हाला पाहून एखाद्या परग्रहावरच्या 


प्राण्याला पहावं तसे ते पहिल्यांदा बघत राहीले आणि नंतर हसत सुटले, अगदी पोट दुखे पर्यंत. त्यांची लडखी बोली भाषा आमच्या ड्रायव्हरला येत होती. त्याला विचारायला संगितलं कि त्याना का हसू येतय? ऎसाही हे उत्तर आलं. त्यांचं हसून झाल्यावर आम्ही त्यांचे फोटो घेतले आणि आता हसण्याची आमची पाळी होती. हसत हसतच आम्ही गाडीत बसलो. वाटेत खालसरला थांबून आम्ही लडाखी पक्वान्न  मोमो खाल्ले. ते आपल्या उकडीच्या मोदका सारखे असतात आत सारण मात्र वेगळं. व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचे मोमो मिळतात. व्हेज मध्ये भाज्या आणि नॉनव्हेज मध्ये मटन चिकन असं काहीतरी असावं. पुन्हा खारदुंगला च्या दिशेने आमचा प्रवास सुरू झाला. आजखारडुंगलाचं रुप पालटलं होतंबर्फवृष्टी होत होतीआता मात्र आम्हाला रहावलं नाहीकसल्याही संभाव्य त्रासाची पर्वा नकरता आम्ही तासभर बर्फवृष्टीचा आनंद घेतलाखुप मजा केली.  काल राहिलेले फोटो घेवून आम्ही लेहच्या दिशेने निघालो. लेह जवळ आलं तसं वातावरण बदललं स्वछ उन्हाने लेह न्हाऊन निघालं होतं.


  - नरेंद्र प्रभू 


Monday, June 11, 2012

लडाख - पँगगॉंग त्सो




उतुंग अमुची उत्तर सीमा

पँगगॉंग त्सो हे लडाखमधलं आणखी एक आच्छर्य. 'त्सोम्हणजे तलाव. आणि त्से म्हणजे गाव. भारत चिन सिमेवर असलेलं हे तलाव पहायला जायचं म्हणजे IPL (Inner Line Permit) काढावं लागतं. लडाख मधून कुठेही सिमावर्ती भागात जायचं म्हणजे IPL काढणं जरूरीचं आहेच. आदल्याच दिवशी सगळी तयारी करून ठेवली होती. पहाटे पाच वाजता गाड्या निघतील असं जेव्हा सांगण्यात आलं तेव्हा मंडळी नाराज झाली. एवढ्या पहाटे निघायला कुणीच तयार नव्हतं. अशा दुर्गम भागात आपण जेव्हा जातो ना तेव्हा थोडी अडचण  झाली तरी तक्रार असू नये. अशा साहसी सहलीत किंवा मोहीमेत काही अचानक झालेले बदल. निसर्गाची प्रतिकुलता या गोष्टी कुणाच्याच हातात नसतात. पहाटे पाच वाजता आम्ही निघालो आणि कारू या गावाजवळ आम्हाला आम्हाला पहिलं आर्मी पोस्ट लागलं. त्या ठिकाणी IPL तपासली गेली. जाणार्‍या सर्व व्यक्तींची नावं, वाहन क्रमांक याची नोंद केल्यावर आमचा पुढचा प्रवास सुरू झाला.
तीन महिने होणारी शेती
कारु, शक्ती अशा गावांमधून प्रवास करत आपल्याला पुढे जावं लागतं. एकाबाजूला दरी मध्ये हिरवीगार शेती आणि दुसर्‍या बाजूला नागमोडी वळणं घेत जाणारा रस्ता. आमची जीप एका वळणापाशी आली तशी तीची गती आपसूकच मंद झाली. पुढे जाण्या ऎवजी ड्रायव्हर ने ती थांबवली.  वरच्या बाजूला एक स्नो लेपर्ड रस्ता ओलांडायच्या पोज मध्ये उभा होता. कॅमेरे सावरून फोटो काढणार तोपर्यत तो डिस्टर्ब झाला आणि मागे वळला. 
झटकन खाली उतरून मागे जाताना मी त्याचा एक पाठमोरा फोटो घेतला. लडाखमध्ये जंगलं नसली तरी असे प्राणी आहेत. पुढे तर मरमॅट हा दुर्मिळ प्राणी दिसला. जमिनीच्या पृष्ठभागावर जेव्हा बर्फ असतं तेव्हा जमिनीला गुहेसारखा खड्डा पाडून हा प्राणी सहा-सात महीने आतमध्ये पडून राहतो आणि बर्फ वितळल्यावर पुन्हा वर येतो. त्या सहा-सात महीन्यात अंगात साठवलेल्या चरबीवर त्याचा निर्वाह होतो. लहानपणी भुगोलाच्या पुस्तकात वाचलेल्या या गोष्टी प्रत्यक्ष पाहताना खुपच मजा वाटत होती. त्या प्राण्याचे फोटो काढणं म्हणजे एक कसतर असतो. तसं सगळ्याच वन्यप्राण्याचे फोटो काढताना काही पथ्य पाळावीच लागतात. ती पाळली तरच आपल्याला चंगली फोटो मिळतात. ते प्राणी कोवळ्या उन्हात   
मरमॅट
बाहेर येतात. त्यांची चाहूल लागल्यावर आम्ही आमची जीप बंद करून शांतपणे थांबलो. जीपच्या आवाजाने हा लाजरा-बुजरा  सशासारखा आणि सशाच्याच काळजाचा प्राणी झटकन बिळात दिसेनासा झाला. थोडी वाट पाहिल्यावर पुन्हा बिळाच्या बाहेर आला. चाहूल घेतली आणि उन्हात खाणं शोधायला लागला. आवाज नकरता दबकत दबकत पुढे जावून त्याचा फोटो घेता आला. असे काही दुर्मिळ फोटो मिळाले की खुप समाधान होतं. जसे हे मरमॅट दिसले तसे याक सुद्धा दिसले. एक लडाखी म्हातारी बाई त्यांचं दुध काढतानाही पाहता आली. त्या याकच्या कानात हिरवे बिल्ले टोचलेले होते. हे काय म्हणून विचारलं तेव्हा समजलं की काही वेळा आपल्या देशातले याक सीमा ओलांडून पलिकडे चीनच्या हद्दीत जातात किंवा चीन मधले लाल बिल्ला असलेले याक आपल्या हद्दीत येतात अशा वेळी त्या बिल्ल्यांवरून ते लगेच ओळखता येतात आणि बहुतांश वेळा ते पुन्हा त्या त्या देशाच्या हद्दीत आपल्या सैनिकाद्वारे पोहोचवले जातात.

पण हे मरमॅट, याक आम्हाला छांगला हा जगातला दोन नंबरचा पास ओलांडल्यावर दिसले. छांगला पास जसा जवळ यायला लागला तसा पुन्हा दोन्ही बाजूला बर्फ सुरू झाला. काही ठिकाणी रस्त्यावरही बर्फ होतं.भारत-चीन सीमेवरील या ठिकाणी जातानानयनरम्य अशा प्रदेशातून आपली भ्रमंती होते वाटेतलं बर्फ आतारोजचं झालं होतंपण पासवर पोहोचल्यावर सैनिकांचं भेटणं आणि चहापान याने उबदार वाटायचंवाटसरुच्याजीविताची काळजी आणि काही वैद्यकीय मदत लागली तर ती पुरवण्यासाठी हे सैनिक सदैव तयार असतातत्यानापाहून त्यांच्या बाबतचा आदर आधिकच दुणावलातिथे असलेल्या चांगला बाबाच्या छोट्याशा मंदीरात जावून आम्ही दर्शन घेतलं. जवानांबरोबर फोटो काढले. सगळ्याच पासवर अशी मंदीरं असतात. एवढ्या उंचीवर सामान्य व्यवहार करायलासुद्धा खुप कष्ट पडतात. दोन दोन वर्षं तिथे राहून सिमेचं रक्षण करणं म्हणजे खरच तपस्याच असते. कितीही घाई असली तरी थोडावेळ थांबून त्या जवानांशी गप्पा केल्यावर त्याना अंत्यानंद होतो. मराठी बोलणारा एखादा जवान असला तर तो लगेच पुढे येतो. आपली चौकशी करतो, आलिंगन देतो. त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू ओघळतात आपले डोळेही पाणावतात. हिवाळ्यात तर त्यांचे हाल कुत्रा खात नाही.
पँगगॉंगचं पहिलं दर्शन
आता पासेसना सरावलेले आम्ही कारु,शक्ती अशी गावं पार करुन टांगसे या गावीपोहोचलो तेव्हा उंचावरून सखल भागात आल्यावर जरा बरं वाटलं. जास्त वेळ न थांबता पुढे निघालो. ब्रो (Border Road Organization) ने एअवढे चागले रस्ते बनवेले आहेत की त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच. गुळगुळीत रस्त्यावरून वेगाने आमचा प्रवास सुरू होता. गाडी वेडीवाकडी वळणं पार करत एका ठिकाणाहून पुढे चार किलोमीटवर असलेलंपँगगॉंग लेक दिसायला लागलं आणि सगळा थकवा क्षणात निघून गेला. वर्णनातीत असे सौंदर्य. 
पँगगॉंग लेक
जिथपर्यंत आपली नजर जाईल तितक्या दूर-दूर पर्यंत केवळ निळेशार पाणी. त्या पाण्याला सिमा घालायची हिम्मत फक्त त्या उत्तुंग पर्वतरांगांमध्ये. वर निळं निळं आकाश आणि मध्येच एखादा पांढराशुभ्र ढग आणि त्या आकाशाचे पाण्यात दिसणारे प्रतिबिंब.ज्याना शक्य असेल त्यानी एकदा तरी हे सौंदर्य पहावंच. पँगगॉंगलेकचे फोटो पाहून कित्येक जण हे ठिकाण परदेशातलच असणार म्हणतात. पँगगॉंग लेक१४५ कि.मीलांबीचं हे तळं (?) खार्‍या पाण्याचं आहे  पेंगॉँग-त्सो हा भारत चीन सीमेवर आहे. ६० टक्के चीनमध्ये तर ४० टक्के भारतात आहे.पँगगॉंगच्या काचेसारख्या स्वछ पाण्यात पाय देण्याची हिंमत होत नव्हतीएवढं ते थंड होतंआत जाऊन लगेचच बाहेर आलोपण सभोवताली जे सौंदर्य होतं त्याला तोड नाहीएवढ्या शांत धीरगंभीर वातावरणात आपण निसर्गाशी एकरुप होऊन जातोनिसर्गाशी तादात्म्य पावण्याचे असे क्षण आपल्या आयुष्यात फार कमीच येतातनाही का ? सभोववार बर्फाच्छादीत शिखरं आणि मध्ये हे तलाव.  सगळं वातावरणच भारून टाकणारं. एक वेगळीच शांती मनाला लाभते. निसर्गाच्या एवढासमीप मी कधीच नव्हतो. मन शांत झालं. बहुतेक सहलसाथी उत्स्फुर्त प्रतिक्रीया देत होते. एकमेकाना मिठ्या मारत होते. सगळेच भारावून गेले होते. इथे कितीही वेळ थांबलं तरी ते कमीच असतं.
     
परतीच्या प्रवासाला लागलो. मिनिटा-मिनिटाला रंग बदलणाऱ्या उंच डोंगरसरी आणि समोर दिसणारे निरभ्र मोकळे आकाश. क्षणाक्षणाला वाटायचे की येथेच थांबावे. थोडावेळ येथील निसर्गाचा आस्वाद घ्यावा. छांग-ला नंतरच्या संपूर्ण भागाला 'चुशूल घाटीम्हणतात. येथे असणाऱ्या रेजिमेंटला 'चुशूल वॉर्रीअर्सअसे म्हणतात. चांग-लापासून चीन सीमेपर्यंतची सर्व जबाबदारी चुशूल वॉर्रीअर्स कडे आहे. परतीच्या प्रवासात लेहला परतताना आमच्या हाती बराच वेळ होता. ज्यावेळी मी ह्या ठिकाणावरुन पास झालो तेंव्हा 'मेजर शैतानसिंह' (PVC) फायरिंग रेंज दिसली. आणि माझ्या मनात लोकसत्ता मध्ये वाचलेली एक बातमी आठवली. सैतानसिंह.. आपला आणि त्यांचा! ) जी जागा मला आयुष्यात एकदा तरी बघायची होती आज त्या ठिकाणी मी आलो होतो.


- नरेंद्र प्रभू  


Friday, June 8, 2012

लडाख - सिंधू व्हाली



सिंधू घाट
आज सर्वात प्रथम आम्ही सिंधु नदीच्या घाटावर जाणार होतो. लेह शहर मागे पडलं तसं हमरस्त्याच्या दुतर्फा छोट्या छोट्या डोंगरांच्या राशी ओतून ठेवाव्यात तसं दिसत होतं. वाटेतच बौद्ध धर्माचे गुरू दलाई लामांचं निवासस्थान लागलं. मध्येच प्रेयींग व्हील्स दिसत होती. थोड्याच वेळात आम्ही सिंधू नदी जवळ पोहोचलो. सिंधू नदिचा बहूतांश भाग फाळणीनंतर आता पाकिस्तानात असला तरी सुमारे तीनशे किलोमीटर एवढा नदीचा भाग हा आजही भारताच्या जाम्मू-काश्मीर राज्यातून वाहत जावून पुढे तो पाकिस्तानात जातो हे फार थोड्यानाच माहीत असेल. जिच्या केवळ नामोच्चाराने कोट्यावधी भारतीयांच्या मनात पवित्र भाव निर्माण होतात. हिंदू संस्कृती जिच्या काठी रुजली, फोफावली ती वेदांची जननी म्हणजे सिंधू. तीच्या काठावर उभा असताना माझ्या मनात भावनांचा कल्लोळ उठतो. सिंधूवरून हिंदू आणि म्हणून हिंदूस्थान, तसच इंडस वरून इंडीया अशी आपल्या देशाला नावं पडली.  तिबेटमध्ये मानसरोवरनजीकसिन-का-बाव इथे उगम पावून पुढे सिंधू नदी आपल्या भारतात लडाख प्रांतात प्रवेश करते. ऋग्वेदापासून महत्वाच स्थान असलेल्या या नदीच्या काठी कधी काळी आर्यानी वस्ती केली होती. तिच्या काठी आम्ही उभे होतो. खळाळणारं स्वछ, शीतल जल घेवून वहात जाणार्‍या या नदीला पुढे झंस्कार व्हाली मधून वाहत येणारी झंस्कार नदी मिळते आणि नंतर पाकिस्तानात जाते. लडाखमध्ये जी शेती होते ती बहुतांश या नदीच्या पाण्यावर. इतर ठिकाणी गवताची पातीही दिसणार नाही पण या नदीच्याकाठी मात्र हिरवळ दिसते. दरवर्षी जून महीन्यात सिंधू घाटावर सिंधूमहोत्सव साजरा केला जातो. या घाटावरून लडाखच्या सर्वात उंच अशा स्तोक कांगरी शिखराच सुरेख दर्शन होतं. 
मैत्र्येय बुद्धाची मुर्ती

लडाखमध्ये मॉनेस्टीज खुप आहेत आणि त्या पहाण्या सारख्याही आहेत. मॉनेस्टीम्हणजे गुंफा किंवा आपण त्याना बौध विहार सुद्धा म्हणतो.1430 साली बांधून पुर्ण झालेली थिकसेमॉनेस्टी ही सर्वात उत्तम अशी मॉनेस्टी आहे. त्याची सुरवात अगदी प्रवेशद्वारापासून होते. अत्यंत आकर्षक अशी रंगसंगती आणि कलाकुसर असलेलं हे प्रवेशद्वार आहे. सर्वच मॉनेस्टींची उत्तम व्यवस्था ठेवलेली आहे. मी त्या ठिकाणी तीन वेळा गेलो पण प्रत्येकवेळी ती तेवढीच साफ होती. रंगही अगदी काल काढल्या सारखा. ही मॉनेस्टी म्हणजे अख्ख गावच आहे. शाळा, बॅंक, निवासस्थानं प्रार्थनामंदीर सगळ एकाच ठिकाणी, 


चार महीन्याचा उन्हाळा सोडल्यास अतीशित असलेल्या या ठिकाणी सगळी  व्यवस्थाजागच्या जागीच व्हावी अशीच त्या मॉनेस्टीची रचना आहे. शंभरेक पायर्‍या चढताना वाटेत एक भलं मोठ प्रेयींग व्हील आहे. त्या नंतर   सुबक अशी मैत्र्येय बुद्धाची मुर्ती पाहून थक्क व्हायला होतं. पंधरा फुट उंच असलेली ही मुर्ती मात्र अलिकडेच म्हणजे 1980 साली उभारण्यात आली. एकदा पेटवल्यावर वर्षभर पेटतील  अशा समया तिथे तेवत होत्या. समोरच्या इमारतीत प्रार्थना चालू होती. आणि बाजूलाच सुंदर रांगोळी काढलेली होती.
 हे सगळं पहात आम्ही त्याइमारतीच्या गच्चीत   गेलो. तेव्हा सिंधू नदीचं पात्र दूर पर्यंत दिसत होतं. लेह कडून येणार्‍या रस्त्याच्या एका बाजूला हिरवीगार शेती आणि दुसर्‍या बाजूला वैराण जमीन हे दृष्य पहाण्या सारख आहे. एवढा भिन्न किंवा विरोधी चित्र क्वचीतच कुठे पहायला मिळेल.थिकसे गुंफेत आम्ही पोहोचलो तेव्हाअर्ध्यातासात परत फिरु असं वाटलं पण दोन तास कसे संपले ते समजलच नाहीही प्राचीन गुंफा नेत्रसुखद तर आहेच पण कोणतही औडंबर न माजवता धार्मिक स्थान कसं असावं त्याचं प्रतिकही आहे.उत्तम मूर्तीकामनक्षीकामकमानीरंगसंगती यांचं मिश्रण आणि त्याचाच एक भाग बनलेले लामा,
थिकसे मॉनेस्टी
 जेमतेम चार महिने सोडले तर निसर्गाशीदोन हात करत जगणारी ही माणसंपण त्याची कसलीही खूण चेहरर्‍यावर न बाळगणारीअगदीशांतपणे सगळं चाललेलंसगळेहसतमुखप्रार्थनासुध्दा देवासाठी,दिखाव्यासाठी नाही.बुध्दाची भव्य मुर्ती तर बघत रहाण्यासारखी फोटो काढण्यातच सगळा वेळ जातो खरं तर शांतपणे बसायला हवं होतंलडाखी स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणूनसुध्दा थिकसे गुंफेकडे पाहिलं जातं 


हेमिस मॉनेस्टी 
त्यानंतर हेमिस हीलडखमधली सर्वात मोठी गुंफा पाहिली.१६३० मध्ये बांधलेली ही गुंफा इतर गुंफांहून वेगळी आहे.इथे त्या मॉनेस्टींच्या आतापर्यंत होवून गेलेल्या सर्व मुख्य लामांचे पुतळे आहेत. इथे असलेला गौतमबुध्दांच्या शिष्याचा पद्मसंभवाचा मोठा पुतळा आहे. या मॉनेस्टींमध्ये भिंतींवर अप्रतिम अशी पेंटींगज् आहेत. 
शे पॅलेस
नंतर पाहीलेला शे पॅलेस ही मुळात मुळात गोम्पाहोती.  १६५०मध्ये देलडॉननामग्याल (King Deldon Namgyal) या राजाने या ठिकाणी स्वतःच्या वडिलांच्या म्हणजे'सिंगायनामग्याल' (Singay Namgyal) यांच्या आठवण म्हणून राजवाडा बांधलाया ठिकाणी १८३४ पर्यंत राजनिवासस्थान होतेआता सध्या येथे फार कोणी रहत नाहीगोम्पाची काळजी घेणारे काही लामाआहेत.  राजवाडा म्हणण्यासारखे सुद्धा काही राहिलेले नाही येथे. बर्‍याचशा  खोल्या बंदच आहेत. तिथल्या  'शे' चे आकर्षण असलेल्या बुद्ध मूर्तीला भेट द्यायला गेलोठिकसेप्रमाणे येथे सुद्धा भली मेठीबुद्ध मूर्ती आहेतितकी रेखीव नाही पण भव्य निश्चित आहे.  लेह-लडाखमध्ये जिथे पाहाल तिथेतुम्हाला स्तुप दिसत राहातात


- नरेंद्र प्रभू 






थिकसे मॉनेस्ट्रीवरून दिसणारं एक विहंगम दृष्य









LinkWithin

Related Posts with Thumbnails