Sunday, April 1, 2012

भारलेले क्षण


सहलीतले भारलेले क्षण नेहमीच लक्षात राहातात. सुरुवातीला सावध, हळूहळू सुरु होणारी सहल उत्तरोत्तर रंगत जाते आणि बघता बघता तिची मैफिल केव्हा होते ते कुणालाच कळत नाही. सहलीतल्या अशाच एका परमोच्य क्षणी इशा टुर्सच्या पर्यटक सौ. सुजाता शशांक फडके यांनी आमचे संचालक आत्माराम परब आणि इशा टुर्स यांच्या विषयी ज्या भावना प्रकट केल्या त्या त्यांच्याच शब्दात :

 एक दिवसाची ओळख, मनाला वेड लावून गेली, ऋणानुबंधाची गाठ अंतरंगाला कळली.
आत्मारामांकडे बघीतले की मला माझे जीवन गाणे... गाणे.. व्यथा असो आनंद असु दे, प्रकाश किंवा तिमीर असु दे, वाट दिसो अथवा न दिसु दे... हे गाणं आठवतं.

इतक्या प्रतिकुल परिस्थितींना तोंड देत आजपर्यंतची वाटचाल करत ते इथपर्यंत पोहोचले आहेत. त्यांच्यातील रामाने समोरील प्रत्येक व्यक्तितील आत्मारामाला साद घातलीय.

सौ. सुजाता शशांक फडके    
सस्मित तरीपण करारी अन घाडसी मुद्रा समोरच्या व्यक्तीच्या अंत:करणाचा ठाव घेते. हसतमुखाने त्यांनी लहानापासुन थोरा पर्यंत आपुलकीचा बंध बाधलाय. इवलीशी पणती इशा टुर्सच्या नावाने २००३ मध्ये जी तेववीली आहे त्या मिणमिणत्या पणतीचा आता तेजाने तळपणारा सुर्य होवो आणि त्याचा प्रकाश जगातील ज्ञात अज्ञात कानाकोपर्‍यात असलेल्या भागात पोहोचो व इशाच्या हातून इशा टुर्सच्या नावाचा ध्वज अगदी अंटार्टिका पर्यंत रोवला जावो. जगाच्या नकाशावर इशा टुर्सची मोहोर शाश्वत स्वरुपात उमटावी, ही आम्हा सर्वांची सदिच्छा.
हे सर्व साध्य करण्यासाठी त्यांना व छोट्या इशाला ईशकृपेने सदबुद्धी, सुबुद्धी, मन:शक्ती, मन:सामर्थ्य लाभो, तसेच दोघांना उत्तम आयु-आरोग्य लाभावे ही ईशचरणी प्रार्थना.        



No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails