Monday, December 10, 2012

रामाणीसर दीर्घायू व्हा...!

आमचे डॉ. प्रेमानंद रामाणीसर नुकतेच पंच्याहत्तर वर्षाचे झाले. त्यानी वयाचा हा टप्पा गाठला हे खरं वाटत नाही. गेल्याच वर्षी रामाणीसर आणि त्यांचे चिरंजीव अनुप आमच्या लेह-लडाखच्या टूरला आले होते. त्या वेळचा त्यांचा उत्साह पाहून डॉक्टरांना पंच्याहत्तर वर्षाचे कुणीच म्हणणार नाही. डॉ. रामाणी आमच्याबरोबर लेह-लडाखला आले हा माझ्यासाठी सुखद धक्काच होता. आणि त्या एका धक्क्यावर समाधान न मानता सरांनी मला व्यक्तिशः अनेक सुखद धक्के दिले. भारतीय लष्कराचा पाहूणचार आणि मानमरातब समोर हात जोडून उभा असताना डॉक्टर आमच्या सहलीबरोबर पुर्ण वेळ थांबलेच आणि कोणतीच खास सोय घेण्याचं त्यानी नम्रपणे नाकारलं. अख्ख्या ग्रुपबरोबर मिळून मिसळून वागत त्यांनी केलेली फोटोग्राफी हा त्या बॅचसाठी आणि मझ्यासाठी अमुल्य असा ठेवा ठरला. या सहलीत आम्हाला घरगुती वातावरणात वावरल्याचा आनंद मिळाला अशा शब्दात त्यानी आमच्या आयोजनाला दाद दिली. हजारो पर्यटकांबरोबरच अशी काही ऋषीतुल्य आणि दिलदार माणसं भेटली की ती टूर नेहमीच स्मरणार राहाते तशीच ही टूर माझ्या सदैव स्मरणात राहील.

डॉ. प्रेमानंद रामाणींना इशा टुर्स तर्फे लाख लाख शुभेच्छा आणि त्यांच्या दीर्घायुरोग्यासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना.            

आत्माराम परब
Sunday, November 4, 2012

ते आठ दिवस...!
नमस्कार,

इशा टूर्स ने आयोजित केलेली आमची श्रीनगर - कारगिल - लेह - लदाख टुर जेव्हा ठरली तेव्हा पासूनच मी खूप excited होते ... मी हळू हळू तिथली माहिती मिळवायला सुरुवात केली... आणि विशेष म्हणजे ती सारी माहिती मला इशा टूर्स च्या ब्लोग्स मध्येच मिळाली... श्री.नरेंद्र प्रभू यांनी इतक्या सरळ आणि जिवंत रीतीने तिथले वर्णन लिहिले होते कि वाचतानाच मी लेह लदाखला पोहचले होते. .. ऑगस्त कधी येतो आणि आम्ही कधी निघतो अशी काहीशी माझ्या मनाची स्थिती झाली  होती.. आणि अखेर तो दिवस आला... आमचा १२ जणांचा ग्रुप होता...आम्ही सगळे मुंबई विमानतळावर भेटलो आणि आमचा प्रवास सुरु झाला..

श्रीनगरला हाउस बोट मध्ये राहण्याचा अनुभव आणि आनंद काही वेगळाच होता. संध्याकाळी शिकारयातून फिरताना तर मी सुद्धा वल्हवण्याचा खूप आनंद लुटला.. खूप शोप्पिंग केल. श्रीनगर ला हिल करत सोनमर्ग मार्गे कारगिल कडे निघालो...वाह सगळी कडेच इतकं सौंदर्य पूर्ण प्रवास फोटो काढण्यात मग्न होते. आणि त्यातच आम्ही द्रास- कारगिल war  मेमोरिअल ला पोहोचलो.. तिथले दर्शन घेतल्यानंतर एका जवान कडून हे युद्ध कसा झाल व आपण ते कसं जिंकलं.. त्यात आपली कशी व कोणती हानी झाली ह्याची माहिती मिळाली. ते ऐकून कान सुन्न झाले डोळ्यांतून अश्रूंच्या धारा लागल्या. त्या सगळ्या जवानांना नमन करून आमचे अहोरात्र रक्षण करत असल्याबद्दल मनोमन धन्यवाद दिले आणि पुढच्या प्रवासाला लागलो. 

प्रवासात मजा तर होतीच पण मस्ती हि खूप केली. इतकी छान आखली होती आमची ट्रीप कि प्रत्येक वेळा आत्माराम दादाला आपोआपच धन्यवाद दिले जायचे.. आम्ही बिनधास्त होतो कारण कुठे तरी मनात हे माहिती होतं कि आपली पूर्ण काळजी घेतली जाते आहे ..त्यामुळे आपण या निसर्गाचा मनोसोक्त आनंद लुटू शकतो. 

आम्ही लेह ला जायला सज्ज झालो. सज्जच म्हणावे लागेल कारण इतकं काही एकल होतं कि लेह लदाख मध्ये पोहचल्यावर आपण रोबो बनणार असंच वाटायला लागलं होतं. श्रीनगर ते लेह हा प्रवास माझ्या दृष्टीने तरी अवर्णनीय आहे, त्या सौद्याला शब्दच नाहीत.प्रत्येकाने ते स्वतः अनुभवावे. 

कारगिल हून मुल्बेख, नमिकला पास, फोतुला पास, लामायुरू, मून land पार करत सिंधू व झंस्कार नदीच्या संगमावर पोहोचलो..पुढे माग्नेतिक हिल रेंज पार करत पत्थर साहेब गुरुद्वारा मध्ये गेलो. दर्शन घेतलं आणि लेह मधील हॉटेल अल्पाईन व्हिला ह्या हॉटेल ला थांबलो

लेहचे हे  आमचे हॉटेल पण अप्रतिम होते .. त्या हॉटेलचेच बरेच फोटो काढले. दुसऱ्यादिवशी सकाळी लवकर thikasey monestryla भेट दिली. व लदाख फेस्टिवल ला गेलो. आवर्जून कौतुक कराव ते येथील  रहिवाशांच.. इतकी प्रेमळ व निर्मल मनाची माणसे.. वाह.. 

दुसऱ्या दिवशी निघून आम्ही Hall of fame पहिले ते   पाहून मन आतूनच हललं..  पुढे शांती स्तूप पहिला ध्यान मंदिरात ध्यान  केले . संध्याकाळी आम्ही जेव्हा सिंधू घाटावर गेलो तेव्हा तर तेथील छटा तर निराळीच.. संध्याकाळी घाटावर कोणी नव्हते.. शांत मानाने मनोसोक्त नदीच्या प्रवाहाची मजा लुटली. तिथून पाय निघता निघत नव्हता. छान ध्यान लागल होत. 

सकाळी लवकर उठून आम्ही आमचा मोर्चा दिस्कीत (नुब्रा व्हाल्ली) कडे वळवला. तिथे जाण्यासाठी आज आम्ही जगातील सर्वात उंच moterable रोड म्हणजेच खारदुंगला पास (१८३८० फुट ) पार करणार होतो ..आमचा प्रवास त्या दिशेने सुरु झाला.. प्रवास सुरु झाला कि आमचे फोटो सेशन सुरु होत असे...कुठे हि पहा आणि क्लिक करा..  दिस्कीत ला पोहोचल्यावर थोडा आराम करून  आम्ही मैत्रेय बुद्धाची विशाल मूर्ती पाहायला गेलो..तिथून आजूबाजूचा परिसर  देखील खूप छान दिसत होता. फोटो घेतले. तेथून निघून आम्ही लदाख च्या वाळवंटात गेलो.. खूप मजा मस्ती केली.इथे  तिन्ही गोष्टी एकत्र केल्या सारख्या होत्या वाळू, पाणी आणि बर्फाचे डोंगर ... 

दुसऱ्या दिवशी परतून साबू गावात राहायला आलो.. तेथील वास्तव्य मन शांत करून गेलं. लदाख ची झलक तिथे पाहायला आणि अनुभवायला मिळाली.

दुसऱ्या दिवशी अगदी पहाटे पहाटे बाहेर पडलो ते पंगोंग lake पहायच्या ओढीने. १४५०० फीट उंचीवर हा खाऱ्या पाण्याचा लेक तो हि ४०% भारतात तर ६०% चीन मध्ये आहे. येथे पोहचण्यासाठी आम्हाला करू गावातून पुढे चांगला पास (3rd highest pass  of the world at 17800ft )पार करायचा होता. पास वर बर्फ वृष्टी झाली होती .. आम्ही बर्फात मनोसोक्त बागडलो. बर्फाचा गोळा बनवून त्यावर माझा हे पेय टाकून खाल्लं.. आणि पुढये अधेमध्ये थांबत आम्ही लेक वर पोहोचलो आणि त्या पाण्याचे बदलते रंग पाहून थक्क झालो. बराच वेळ त्याची मजा घेत जेवून पुन्हा परतलो. त्या रात्री लेह हॉटेल ला परतून शोप्पिंग आटपले. 

अशा प्रकारे तेथून निघून परत मुंबईला यायचा दिवस उजाडला ... मनात एकाच प्रश्न होता ... खरंच परत  मुंबईला गेलाच पाहिजे का?...

आणि त्या ८ दिवसाच्या सर्व आठवणी मनात साठवत पुन्हा मुंबई कडे उड्डाण केल.

ऋचा खेडेकर  
Saturday, November 3, 2012

Letter of Appreciation
Tour to Leh-Kargil, my first feeling was an adventurous tour. Which inspired me to say big yes for the tour.when I returned from the tour I experienced that I belong to a family (Isha  Tours).

Highlight of the tour for me was going to Kargil. We visited the Vijay Smarak there. Actually visiting Vijay Smarak makes drastic change in the attittude from adventurous stories to love and respect towards all soldiers. Our young india Must visit  Kargil Vijay Smarak and Hall of Fame, to experience in what critical conditions our army has made Operation Vijay a grand success.

We can also see the miracles of the nature in Himalays in the form of salt lake and scenic beauty at Leh. Cameras were constantly on click mode during the entire tour. Really hats off to Isha Tours’.  The entire tour was very well planned and organised.  Group leaders were very caring and protective. The food provided there was appreciable. The entire tour was truly amazing.   

My specail thanks to Atmaram Parab, the backbone of the Isha Tours & Smita Rege our tour leader.

Chhaya gholap. Pune

Friday, November 2, 2012

ASSAM, ARUNACHAL PRADESH, MEGHALAYA AND NAGALAND.
Visit  unexplored Indian North Eastern States of ASSAM, ARUNACHAL PRADESH, MEGHALAYA AND  NAGALAND.
 
Ø Visit the world heritage site – The wildlife sanctuary at KAZIRANGA.

Ø View the mighty Brahmaputra from one of the best vantage points in TEZPUR.

Ø Feel the adrenaline rush as you meet the army personnel on the way to TAWANG.

Ø Spend time in the “Scotland of the East” – Shillong

Ø Visit the place which was a part of your childhood – famed at the time for its highest rainfall – CHERRAPUNJEE.

Ø Enjoy lovely limestone caves unlike any you have seen before - Mawsmai caves

Ø See the self proclaimed cleanest village in Asia – MAWLYNNONG.

And above all experience the colorful and exciting HORNBILL FESTIVAL in KOHIMA– NAGALAND. Enjoy the tribal and cultural life of each of Nagaland’s 16 warrior tribes at  one place – An experience you are unlikely to forget.

CONTACT : DADAR(W): 09320031910, THANE(W): 09320131910, BORIVALI(W):  09324531910
 
click on following link for photographs: http://www.ishatours.net/gallery_main.html

Regards,
TEAM ISHA

Monday, October 29, 2012

Explore MANALI In Winter

Enjoy your vacation in admiring its astounding landscapes with snow capped peaks, crystal clear water, tiny fields and fruit orchards and also add a bit of adventure to our life with sporting activities.
Date: - 26 Dec - 31 Dec , 23 Mar - 28 Mar
For more detail contact ISHA TOURS on – 9320131910 , 9324531910
Regards ,
TEAM ISHASunday, October 28, 2012

Savarkar Smaran Yatra - Andaman


Visit the ANDAMAN ISLANDS on the Occasion of the PUNYATITHI OF VEER  SAVARKAR and be a part of the Special  function at the Cellular Jail which stood a mute witness to the Atrocities meted out to the Indian Freedom fighters.

Experience the life story of the Great Hero Vinayak Damodar Savarkar and the  thrill of the freedom struggle through the Speech of our Esteemed Speaker on the Occasion – Shree Sharad Ponkshe.

The Andaman Group of Islands is also home to sparsely populated beaches which give way to an Ocean brimming with Interesting coral gardens and marine life, the evergreen tropical forests, and adventure activities like snorkelling & Lime stone Cave visits.

 Date: 25 Feb – 2 Mar

Call ISHA TOURS on 9323431910 OR 9320231910 for details

You can also write to us at abhay.ishatour@gmail.net

Saturday, October 20, 2012

दस-दस को एक ने मारा..
लेह शहराकडून  पँगगॉंगला निघालं की छांग-ला (पास)  नंतरच्या पँगगॉंगकडच्या संपूर्ण भागाला 'चुशूल घाटी' म्हणतात. येथे असणार्‍य़ा रेजिमेंटला 'चुशूल वॉर्रीअर्स' असं म्हणतात. चांग-ला पासून चीन सीमेपर्यंतची सर्व जबाबदारी या चुशूल वॉर्रीअर्स कडे असते. याच रस्त्यावर 'मेजर शैतानसिंह' (PVC) फायरिंग रेंज आहे. इथे गेल्यावर चीन-भारत युद्धाच्या इतिहासाच्या आठवणी जाग्या होतात. 

मेजर सैतानसिंह यांनी इथे असा पराक्रम गाजवला की त्यांना युद्धा नंतर पुढल्याच वर्षी परमवीर चक्र’ (मरणोत्तर)  बहाल केलं गेलं.  आज १९  ऑक्टोबर चुशूल घाटीच्या युद्धाला पन्नास वर्षं पुर्ण होत आहेत. दै. लोकसत्ता मध्ये आजच प्रसिद्ध झालेला लेख खास इशा टुर्सच्या वाचकांसाठी आणि प्राणपणाने सिमेचं रक्षण करणार्‍या भारतीय जवानांना मानाचा मुजरा. 

Friday, October 19, 2012

Thats what touched us allWe, a group of 12 Reiki Masters had been on the tour of Shrinagar - Kargil _Drass _ Leh from 29th Aug to 5th Sept with Isha Tours .It was an awesome experience for all of us. Our total group size was 107. And the way it was smoothly organised is really to be appreciated. following the timings, Travel arrangements & comfort, homogeneity within the group were only some of the few things we all enjoyed. sight selection, nature's beauty Outstanding !!!


But the best part of the journey is we got some v good human beings as friends - Atmaram, Smita, Pritam ('Pritam pyaare' as we named him !) Rohit & Meghan. All of them were not only tour guides for us but they were just as our family members during the whole journey. Nature, beauy etc is not our creation. Its already there but creating belongingness, love, taking care & being happy are humane qualities. and thats what touched us all. 

All our wishes for their unique n special work. wl be in touch with u all. 
thanks again.... 


Vnay Vaidya 

Sunday, September 9, 2012

मास्टर्सचा अभिप्रायआजचा रविवार खुप छान गेला. म्हणजे तसा तो गेला नाही, तर तो अजूनही मनात ठाण मांडून बसलाय. असं होतं कधी कधी. पकडून ठेवावेसे वाटणारे क्षण शेवटी त्यांच्या स्वभावाप्रमाणे निसटून जातात.... पण आपण त्यांच्यात गुंतून जातो, मग मात्र ते क्षण संपतच नाहीत. तसाच आजचा रविवार.... दुपारी दोन वाजल्यापासूनचे पुढचे तीन तास अगदी झोपाळ्या वाचून झुलायचे असेच होते. त्याच काय झालं नुकताच लडखला जाऊन आलेल्या रेकी इंडीयाच्या ग्रुपने परममित्र आत्माराम आणि स्मिताला खास निमंत्रीत केलं होतं. लडाख सहलीची चित्रफीत आणि अनुभव कथन असा काहीसा कार्यक्रम होता. आरती ओवाळून आणि अक्षता टाकून मोठ्या दिमाखात स्वागत झालं.

लडाख प्रवासाची ती चित्रफित चालू असताना शामल दुर्वेजी आपले अनुभव सांगत होत्या, नंतर विनय वैद्य,डॉ.संदेश खेडेकर,लय दुर्वे आणि  कमलताई सावंत (सर्व रेकी मास्टर्स) यांनी आपले अनुभव सांगितले. सगळेच भरभरून बोलत होते. वातावरण भारावलेलं होतं.


शामलताई प्रसन्न मुद्रेत 
 आत्मारामनी लडाख आणि तिथल्या लोकांबद्दल मुख्यता त्यांच्या आनंदी स्वभावाबद्दल माहिती दिली. लडाखचा निसर्ग, तिथली सिंधू नदी, मुनलॅंड, पर्वत, दर्‍या, नद्या, तलाव आणि सैनिक सगळं पुन्हा एकदा डोळ्यासमोर यायला लागलं. लडाखबद्दल आम्ही नेहमीच लोकांना सांगत असतो, आज इशा टुर्सचे पर्यटक आम्हाला लडाखबद्दल सांगत होते. भरभरून बोलत होते. सहली दरम्यान सकारात्मक भानवा बाळगल्यामुळे त्यांचा आनंद शतगुणीत झाल्याचं जाणवत होतं. असा अभिप्राय ऎकायला मिळणं हे भाग्यच आहे. पण ही दाद देणारी मंडळीही तेवढीच महत्वाची असतात, मनमोकळं बोलणं आणि खळखळून हसणं हल्ली कमी होताना दिसतं......., आजचं चित्र वेगळं होतं. जगणं हे गाणं कसं होईल या बद्दल सतत जागृत राहून आपण आनंदीत असताना दुसर्‍याला सतत आनंदीत ठेवणारी ही मंडळी आज भेटली. आजूबाजूला कितीही वाईट गोष्टी घडत असल्या तरी अशी माणसं मोठा गाजावाजा न करता सकारात्मक गोष्टी करत राहातात म्हणूनच जग चालतं यावर विश्वास बसतो. आज पुन्हा तसा अनुभव आला.     
Thank you नरेंद्र प्रभू 
             

Friday, August 17, 2012

गर्भश्रीमंत केनिया अद्भुत टांझानिया


अग्रगण्य अशा लोकप्रभा साप्ताहिकात इशा टुर्सचे संचालक आत्माराम परब यांचा केनिया आणि टांझानिया या प्राणी आणि पक्षांच्या नंदनवनाबद्दलचा माहितीपर लेख प्रसिद्ध झाला आहे.  सदर लेख खास आपल्यासाठी खाली देत आहे.

एखाद्या सिंहाच्या कळपाने केलेली थरारक शिकार, एखाद्या चित्त्याने हरणांच्या कळपाचा  केलेला जीवघेणा पाठलाग, शिकार झाडावर खेचून नेणारा बिबळ्या, मेलेल्या जनावराभोवती जमलेली गिधाडे.. केनिया- टांझानियाच्या जंगलांमध्ये घडणारं हे निसर्गाचं दर्शन भुरळ  घालणारं असतं...


ज्या व्यक्तींना निसर्गाची ओढ आहे, त्यांनी आयुष्यात एकदा तरी भेट द्यायला हवीत अशी स्थळे आहेत केनिया आणि टांझानिया. आर्थिकदृष्टय़ा अतिशय मागासलेली आणि गरीब असणारी ही दोन शेजारील राष्ट्रे जैवविविधतेच्या बाबतीत मात्र गर्भश्रीमंत आहेत. लाखोंच्या संख्येत प्राणी आणि पक्षी पाहायचे असतील तर या दोन देशांशिवाय पर्याय नाही. आफ्रिकन सिंह, चित्ते, बिबळे, कोल्हे, तरस असे हिंस्र प्राणी तसेच गेंडे, गवे, हत्ती, हिप्पो यांच्यासारखे अजस्र प्राणी त्याचबरोबर केवळ आफ्रिकेत मिळणारे जिराफ, झेब्रा यांच्यासारखे प्राणी इथे पाहायला मिळतात. हरणांच्या अनेक जाती हजारोंच्या संख्येने पाहाण्याचे भाग्य डिस्कव्हरीकिंवा ॅनिमल प्लॅनेटयांच्याव्यतिरिक्त इथे आल्याशिवाय मिळणार नाही. निसर्गाचा हा अद्भुत नजारा याची देही याची डोळाबघण्याची मजा काही औरच आहे.
केनिया आणि टांझानिया या दोन देशांमध्ये अनेक सरकारी राष्ट्रीय उद्याने आहेत. त्यांची प्रत्येकाची अशी खास वैशिष्टय़े आहेत. या सरकारी उद्यानांबरोबरच काही खासगी उद्यानेदेखील आहेत. त्याला प्रायव्हेट कॉन्झरवरीअसे म्हणतात. सर्व प्रथम पाहूया केनियाच्या वैशिष्टय़ांबद्दल. केनिया हा आफ्रिकेच्या किनारपट्टीवर वसलेला पाच लाख छप्पन्न हजार सहाशे चौरस किलोमीटर क्षेत्रफळामध्ये पसरलेला आणि विशेष म्हणजे विषुववृत्तावर पसरलेला आहे. तसेच देशाचा ४० टक्के भाग हा राष्ट्रीय आणि खासगी उद्यानांनी व्यापलेला आहे.

अंबोसेली नॅशनल पार्क
केनियामधील अंबोसेली नॅशनल पार्क हे प्रसिद्ध आहे आफ्रिकन हत्तींसाठी. या हत्तींचे वैशिष्टय़ म्हणजे प्रत्येक नर आणि मादीला असणारे अजस्र हस्तिदंत आणि सुपासारखे मोठे कान. अंबोसेली हे पार्क केनिया आणि टांझानिया या देशांच्या सीमेवर आहे. या पार्कमधील सफारीदरम्यान प्रत्येक वेळी शेकडे हत्ती आणि त्यामागे दिसणारा माऊंट किलिमंजारो डोळ्यांचं पारणं फेडतो. माऊंट किलिमंजारो हा पर्वत आफ्रिकेमधील सर्वात उंच म्हणजे २९००० फूट उंचीचा पर्वत आहे ज्यावर कायम बर्फ असतो. अंबोसेली हत्तींसाठी प्रसिद्ध असलं तरीही इथे सर्वच प्राणी मुबलक प्रमाणात पाहायला मिळतात.

अ‍ॅबरडेअर नॅशनल पार्क
अँबरडेअर नॅशनल पार्क हे केनियामधील समृद्ध वाइल्डलाइफचं एक प्रतीक आहे. या पार्कचं वैशिष्टय़ म्हणजे इथे कोणत्याही प्रकारची जीवसफारी करता येत नाही. इथे असलेल्या केवळ तीन आलिशान लॉँजेसमध्ये राहून, त्या त्या लॉँजेसच्या  गॅलरीमधूनच वाइल्डलाइफचा आनंद घेता येतो.

ओल पजेय

ओल पजेय ही एक Private Conservancy आहे. या Conservancy चे वैशिष्टय़ म्हणजे या १०००० एकर क्षेत्रफळ असलेल्या पार्कमध्येच स्वीटवॉटर टेन्टेड कॅम्प नावाचे रीसॉर्ट आहे आणि त्यात दोन पाण्याचे साठे (Waterholes) आहे. तिथे सर्व प्राणी आळीपाळीने पाणी पिण्यासाठी येतात आणि त्याचा आनंद तुम्हाला रिसॉर्टमध्ये बसल्याबसल्या घेता येतो. ओल पजेय हे चिंपाझी कनझव्‍‌र्हेशनसाठीही प्रसिद्ध आहे.


लेक नकुक
लेक नकुक हा खाऱ्या पाण्याचा तलाव विशेष करून फ्लेमिंगो आणि पेलिकन यांच्यासाठी प्रसिद्ध आहे. लाखोंच्या संख्येने हे पक्षी पाहताना डोळ्यांचं पारणं फिटतं. या पक्ष्यांबरोबरच इतरही अनेक पाणपक्षी या सरोवरामध्ये सहजपणे पाहावयास मिळतात आणि अर्थातच सर्व प्रकारचे प्राणीसुद्धा. लेक नकुकमध्ये जिराफाची वेगळी जात पाहता येते ती म्हणजे Rothschild Giraffe आणि त्याचबरोबर Eland नावाचा सर्वात मोठा Antelope ही इथे पाहावयास मिळतो.


मसाई मारा
केनियामधील मसाई मारा हे केनियातील सर्वात मोठे 520 Sq. km. National Park असून आफ्रिकेमधील सर्वच प्रकारच्या प्राण्यांचे हे माहेरघर आहे. मसाई मारा हे नाव इथल्या स्थानिक मसाई जमातीवरून पडले आहे. या मसाई मारामधूनच मारा नदी पार करून लाखो झेब्रा आणि विल्डर बीस्ट टांझानियाच्या सेरेंगीरी National Park मध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये प्रवेश करतात ज्याला Great Migration्ल असे म्हटले जाते. या Migration चे दृश्य याची देही याची डोळापाहण्यासाठी जगभरातून हजारो लोक केनियाच्या या अद्भुत सफरीवर येतात. या Migration दरम्यान मारा नदीमध्ये असलेल्या भुकेल्या मगरी झेब्रा आणि विल्डर बीस्टवर तुटून पडतात हे दृश्य बघण्याची संधी मिळणे हा विलक्षण अनुभव आहे. Migration बद्दल एक सर्वसाधारण गैरसमज असतो की सर्वच प्राणी केनियामधून टांझानियामध्ये जातात, पण केवळ झेब्रा आणि बिल्डर बीस्ट हे दोनच ताज्या गवताच्या दिशेने केवळ उदरभरणाच्या उद्देशाने जिवावर उदार होऊन दरवर्षी स्थलांतर करत असतात. मसाई मारा हे एखाद्या माळरानासारखे आहे, त्यामुळे जीप सफारी करताना खूप दूरवरूनदेखील आपण या वन्यप्राण्यांच्या हालचाली टिपू शकतो. यात एखाद्या सिंहाच्या कळपाने केलेली थरारक शिकार पाहायला मिळू शकते. एखाद्या चित्त्याने हरणांच्या कळपाचा केलेला जीवघेणा पाठलाग तुम्ही अनुभवू शकता. एखादा बिबळ्या आपली शिकार झाडावर खेचून नेताना आपण पाहू शकतो. एखाद्या मेलेल्या जनावराभोवती जमलेली गिधाडांची टोळी आपण येथे पाहू शकतो. निसर्गाचे हे जीवनचक्र अनुभवणं हा अवर्णनीय आणि अद्भुत अनुभव आहे. हा अनुभव आपल्याला डिस्कव्हरी चॅनेल पाहून मिळणार नाही. त्यासाठी हे सारे प्रत्यक्ष पाहायला हवे.
केनियामधून इक्वेटर लाइन मधोमधच पार झालेली आहे. आपल्या पूर्ण प्रवासात आपण ही रेषा किमान पाच ते सहा वेळा पार करतो. जगामध्ये या रेषेचा ७० टक्के भाग पाण्यामध्येच आहे, पण केनिया हा असा देश आहे की, जेथे ही रेषा पूर्ण देशामधून जाते आणि जगातली सर्वात मोठी व्हॅली म्हणून ओळखली जाणारी रिफ्ट व्हॅली जी मोझ्ॉम्बिक, टांझानिया, केनिया, एथोपिया, सुदान, इजिप्त या देशांमधून पसरलेली ९६०० कि.मी. लांबीची व्हॅली आहे जी केनियामधील ओल पजेटा ते लेक नाकुरूच्या प्रवासात पाहता येते.  अशा या नयनरम्य सफरीवर जायचे असेल तर मे ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये जायला हरकत नाही. पूर्ण मे ते जून १५ या कालावधीमध्ये केनिया सफरीवर गेल्यास आर्थिकदृष्टय़ा स्वस्त होऊ शकते, परंतु १५ जूननंतर मात्र ग्रेट मायग्रेशन सुरू होत असल्यामुळे ही सफर महाग होते आणि जुलै-ऑगस्ट या महिन्यांमध्ये युरोपीयन मंडळींना सुट्टय़ा असल्यामुळेसुद्धा इथे गर्दी असते. केनिया-टांझानियामधील पर्यटन व्यवसाय युरोपीयन लोकांनी प्रचलित केल्यामुळे येथील हॉटेल व्यवसाय उच्च कोटीचा आहे. येथील सर्वच रिसॉर्ट-लॉजेस प्रत्यक्ष नॅशनल पार्कच्या आत आहेत आणि त्यांना इलेक्ट्रिक फेन्सिंग करून वन्यप्राण्यांपासून सुरक्षित केलं जातं. त्यामुळे आपण पर्यटक बंदिस्त आणि प्राणी मोकळे असं चित्र असतं. त्यामुळे तुमच्या लॉजमध्ये राहूनसुद्धा तुम्ही वन्यप्राण्यांचं दर्शन घेऊ शकता. त्याचबरोबर सकाळ आणि संध्याकाळच्या जीप सफारीही घेऊ शकता. नैरोबी विमानतळावर उतरल्यापासून पहिल्या दिवसापासून निसर्गाने वरदान दिलेल्या या वाइल्डलाइफचा आस्वाद घेताना शहरीकरणापासून कित्येक मैल आपण दूर गेलेलो असतो आणि जेव्हा नैरोबी विमानतळावर येतो तेव्हा जाणीव होते की, उद्यापासून निसर्गाच्या चमत्कारापासून कित्येक मैल आपण दूर जाणार आहोत आणि साहजिकच मन खट्टू होतं आणि आपण उत्सुक असतो आपण पाहिलेल्या, अनुभवलेल्या क्षणांची इत्थंभूत माहिती फोटोंच्या माध्यमातून आपल्या मित्रमंडळींना देण्यासाठी, पण विमानात बसताना आपण नकळत ठरवतो की या अद्भुत दुनियेमध्ये पुन्हा कधी तरी भविष्यात नक्की यायला हवे.

सर्व छायाचित्रे : आत्माराम परब
Atmparab2004@yahoo.com

LinkWithin

Related Posts with Thumbnails