Saturday, December 24, 2011

उत्सव २०११ मध्ये ‘इशा टुर्स’
डोंबिवली शहरात डोंबिवली जिमखाना आयोजित उत्सव २०११ हा महोत्सव चालू आहे. सन १९९७ पासून दरवर्षी आयोजित करण्यात येणार्‍या उत्सवात वेगवेगळ्या सेवा आणि उत्पादने पुरवणारे अनेक उत्पादक भाग घेत असतात. गेल्या वर्षी तीन लाखाहून जास्त लोकांनी या ठिकाणी भेट दिली होती. वेगवेगळ्या स्टॉल्स बरोबरच विविध सांसकृतीक कार्यक्रम सुद्धा इथे सादर केले जातात.

या वर्षी प्रथमच  इशा टुर्स ने या महोत्सवात भाग घेतला आहे. इशा टुर्स च्या वेगवेगळ्या सहलीची माहिती या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी इशा टुर्सच्या स्टॉलला भेट देणार्‍यांसाठी एका लकी ड्रॉचंही आयोजन इशा टुर्सने केलं असून विजेत्याला लडाखची मोफत सहल घडऊन आणण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आणि जेष्ठ पत्रकार दै. दिव्य भास्करचे संपादक श्री. कुमार केतकर यांनी इशा टुर्सच्या स्टॉलला सदिच्छा भेट दिली. सदर उत्सव २८ डिसंबर २०११ पर्यंत सयांकाळी ६ ते रात्रो १० पर्यंत डोंबिवली जिमखानाच्या प्रांगणात सर्वांसाठी खुला आहे.     

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails