Tuesday, November 22, 2011

डोंबीवलीत छायाचित्र प्रदर्शन






चीन-भारत युद्धाला काल पन्नस वर्षं पुर्ण झाली. चीन ने प्रथम भारताच्या लडाख प्रांतावर अक्रमण केलं आणि नंतर अरूणाचल प्रदेशच्या तवांग या प्रांतावर. हिमालयातील ही ठिकाणं अतिशय दुर्गम अशा ठिकाणी वसलेली आहेत. अशाच दुर्गम विभागाचं आकर्षण असतं ते खर्‍या जिप्सीला. भारताच्या सिमावर्ती भागात विशेषत: हिमालयात फिरताना आपल्याला बोट धरावं लागतं ते तज्ज्ञ मारगदर्शकाचं. आत्माराम परब हे त्या पैकीच एक. गेली पंधरा-सोळा वर्ष लडाख प्रांताच्या सातत्याने वार्‍या करणार्‍या आत्मारामनी आजपर्यंत साडेचार हजारावर पर्यटकांना लडाखची वारी घडवली आहे. गेली चार वर्ष अरूणाचल प्रदेश, असम, मेघालय आणि मणीपूर या पुर्वोत्तर राज्यांमधेही त्यांच्या इशा टुर्स च्या माध्यमातून हजारो पर्यटक सहलींचा आनंद लुटत आहेत.
     
चला सहज फिरून येवू असं म्हणून अशा ठिकाणी जाता येत नाही. निसर्गाचा प्रकोप आणि अवघड रस्ते वाहतूक यांचा सामना करत इथे जावं लागतं. गेल्या वर्षभरात त्या ठिकाणी इशा टुर्स बरोबर जावून छायाचित्रांच्या माध्यमातून अनेकांनी हा भुभाग आपल्या कॅमेर्‍यात बंदिस्त केला आहे. अशा छायाचित्रकारांपैकी रेखा भिवंडीकर, स्मिता रेगे, वृषाली सातपूते, गितांजली माने, गिरीश गाडे आणि स्वत: आत्माराम परब यांनी काढलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन बालभवन आर्ट गॅलरी, डोंबीवली पुर्व इथे २३ ते २७ नोव्हेंबर २०११ या दिवसात दुपारी १२ ते ९ या वेळात आयोजित करण्या आले आहे. हिमालयाच्या विविध छटा आणि बहारदार निसर्गचित्रे आपणास या प्रदर्शनात पाहाता येतील.               

No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails