Thursday, December 29, 2011

मी डोंबिवलीकर मध्ये ‘आत्मा’मी डोंबिवलीकर या मासिकात इशा टुर्स चे संचालक श्री. आत्माराम परब यांच्या फोटोग्राफीच्या प्रवासा विषयी लेख प्रसिद्ध झाला आहे. फोटोग्राफर ऑफ द मंथ या सदरात समाविष्ट असलेल्या या लेखात आत्मारामनी हाताळलेल्या छायाचित्रण कलेच्या विविध अंगांची माहिती दिली गेली आहे. सदर लेख पुढे देत आहे.  

Saturday, December 24, 2011

उत्सव २०११ मध्ये ‘इशा टुर्स’
डोंबिवली शहरात डोंबिवली जिमखाना आयोजित उत्सव २०११ हा महोत्सव चालू आहे. सन १९९७ पासून दरवर्षी आयोजित करण्यात येणार्‍या उत्सवात वेगवेगळ्या सेवा आणि उत्पादने पुरवणारे अनेक उत्पादक भाग घेत असतात. गेल्या वर्षी तीन लाखाहून जास्त लोकांनी या ठिकाणी भेट दिली होती. वेगवेगळ्या स्टॉल्स बरोबरच विविध सांसकृतीक कार्यक्रम सुद्धा इथे सादर केले जातात.

या वर्षी प्रथमच  इशा टुर्स ने या महोत्सवात भाग घेतला आहे. इशा टुर्स च्या वेगवेगळ्या सहलीची माहिती या ठिकाणी उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी इशा टुर्सच्या स्टॉलला भेट देणार्‍यांसाठी एका लकी ड्रॉचंही आयोजन इशा टुर्सने केलं असून विजेत्याला लडाखची मोफत सहल घडऊन आणण्यात येणार आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी आणि जेष्ठ पत्रकार दै. दिव्य भास्करचे संपादक श्री. कुमार केतकर यांनी इशा टुर्सच्या स्टॉलला सदिच्छा भेट दिली. सदर उत्सव २८ डिसंबर २०११ पर्यंत सयांकाळी ६ ते रात्रो १० पर्यंत डोंबिवली जिमखानाच्या प्रांगणात सर्वांसाठी खुला आहे.     

Saturday, December 17, 2011

लडाखचे अंतरंग पुण्यात 

लडाखचे अंतरंग जाणून घेणं ही पर्वणी असते. एखाद दूसर्‍या लडाख भेटीत लडाखच्या सौदर्याची तशी कल्पना येत नाही. गेली पंधरा वर्ष सातत्याने लडाखच्या वाटा धुंडाळणारे आत्माराम परब यांनी छायाचित्रणाच्या माध्यमातून लडाखचे हजारो मुडस्  टिपले आहेत. अनेक अनवट वाटा पादाक्रांत करत असताना लडाख प्रांत त्याना अधिकाधिक भावत गेला. शुन्यच्या खाली तीस पस्तीस तपमान गेलं असतानाही तीथे जावून गोठलेलं लडाख त्यांनी अनुभवलं आहे. असं करता करता लडाख हा त्यांचा ध्यास झाला. भरवश्याची सरकारी नोकरी सोडून इशा टुर्स ही स्वत:ची टुर कंपनी स्थापन केली आणि पर्यटन व्यवसायाला वाहून घेतलं. आपण पाहिलेले असे अनेक नजारे इतरांना पाहाता यावेत, हौशी छायाचित्रकारांना उत्तमोत्तम फोटो काढता यावेत असा उद्देश डोळ्यासमोर ठेऊन वॉन्डरर्स हा फोटोग्राफी क्लब स्थापन केला, त्यालाही आता दहा वर्ष होवून गेली. आजवर १४० हून जास्त छायाचित्रकारांनी वॉन्डरर्सच्या माध्यमातून आपली कला लोकांसमोर मांडली आहे.  

लडाखचे अंतरंग दाखवणारं एक प्रदर्शन काल पासून पुण्यात सुरू झालं आहे. कोथरूड, पुणे येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात सदर प्रदर्शन १५ ते १८ डिसेंबर २०११ सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत सुरू आहे. या प्रदर्शनात रेखा भिवंडीकर, स्मिता रेगे, गीतांजली माने, नरेंद्र प्रभू, गिरीश गाडे आणि स्वत: आत्माराम परब यांनी भाग घेतला आहे.

सदर प्रदर्शनात सर्वांना विनामुल्य प्रवेश दिला जाईल. रसिकांनी लडाखच्या सौंदर्याचा आस्वाद घ्यावा ही विनंती.           


        


Wandering Moments
EXPRESS FEATURES SERVICE


From the picturesque landscape of Ladakh to the culture and traditions of the people living there, this photography exhibition will put forth the different shades of Ladakh. Organised by Wanderers, a group formed in 2003 to promote amatuer photography, the display will include photographs captured by showcase members of the group - Rekha Bhiwandikar, Geetanjali Mane, Narendra Prabhu, Smita Rege, Girish Gade and Atmaram Parab. Apart from the beauty of the summer months, the photographers have even shot the winter months - the frozen Zanskar river and the colourful Monastery festival that adds life to the snow-covered landscape. It will be held at Yeshwantrao Chavan Natyagruha, Kothrud, from December 15-18.

Friday, December 16, 2011

Picture-perfect LadakhThursday, December 15, 2011 AT 08:06 PM (IST)
Catch an exhibition of photographs that showcase the beauty of the place at Yashwantrao Chavan Natyagruha 

A group of amateur photographers has captured Ladakh like never before.

Rekha Bhiwandikar, Geetanjali Mane, Narendra Prabhu, Smita Rege, Girish Gade and Atmaram Parab are part of Wanderers and will display their pictures of the nature, life, culture, tradition, monasteries, rituals of worship, lakes, rivers, high altitude passes and wildlife from their recent visit.

The exhibition will be held at Yashwantrao Chavan Natyagruha, Karve Road, from December 15 to 18.

 
The intention of the photographers is to not only showcase the beauty of Ladakh, but also encourage more people to visit it.

They maintain that it is breathtaking in summer and winter as well, when the colourful monastery festival adds life to the snow-covered landscapes.

The thrill of walking on the frozen Zanskar river is indescribable, according to them.

Friday, November 25, 2011

डोंबिवलीत ‘गोठलेलं लडाख’ छायाचित्र प्रदर्शन
गेल्या पाच-सहा वर्षांत भारतीय पर्यटकांच्या आकर्षणाचा प्रमुख केंद्र असलेले लेह-लडाखचे सौदर्य छायाचित्रांद्वारे अनुभविण्याची संधी डोंबिवलीकर रसिकांना उपलब्ध झाली आहे. २३ ते २७ नोव्हेंबर दरम्यान कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या बालभवन कलादालनात दुपारी १२ ते रात्री ९ यावेळेत हे प्रदर्शन रसिकांसाठी खुले आहे. आत्माराम परब, रेखा भिवंडीकर, वृषाली सातपुते आणि गीतांजली माने यांच्या छायाचित्रांचा प्रदर्शनात समावेश आहे. नोव्हेंबर ते मार्च दरम्यान लडाखमध्ये साधारण ५ ते उणे २५-३० इतके तपमान असते. अशा गोठलेल्या लडाखमध्ये काढलेल्या छायाचित्रांचा या प्रदर्शनात समावेश आहे. आत्माराम परब यांनी १९९४ मध्ये सर्वप्रथम मोटार सायकल मोहीमेच्या निमित्ताने लडाखला भेट दिली. त्यानंतर ते लडाखच्या प्रेमातच पडले. नियमितपणे लडाखच्या सहली आयोजित करून त्यांनी पर्यटकांना हिमालयाच्या कुशीतील या सृष्टीसौदर्याचे दर्शन घडविले. हौशी छायाचित्रकारांना सोबत घेऊन लडाखमध्ये काढलेल्या छायाचित्रांची महाराष्ट्रभर प्रदर्शने भरवली. त्यातून लडाखमधील भारतीय पर्यटकांचे प्रमाणे १५ टक्क्य़ांवरून ६५ टक्क्य़ांपर्यंत गेले. त्याची दखल घेत जम्मू-काश्मीर पर्यटन मंत्रालय आणि लेह-लडाख हिल कौन्सिलने विशेष पुरस्कार देऊन आत्माराम परब यांचा गौरव केला. डोंबिवलीतील प्रदर्शनामध्ये थंडीतील लडाखचे जीवन पहावयास मिळणार आहे.

(लोकसत्ता मधून साभार) Tuesday, November 22, 2011

डोंबीवलीत छायाचित्र प्रदर्शन


चीन-भारत युद्धाला काल पन्नस वर्षं पुर्ण झाली. चीन ने प्रथम भारताच्या लडाख प्रांतावर अक्रमण केलं आणि नंतर अरूणाचल प्रदेशच्या तवांग या प्रांतावर. हिमालयातील ही ठिकाणं अतिशय दुर्गम अशा ठिकाणी वसलेली आहेत. अशाच दुर्गम विभागाचं आकर्षण असतं ते खर्‍या जिप्सीला. भारताच्या सिमावर्ती भागात विशेषत: हिमालयात फिरताना आपल्याला बोट धरावं लागतं ते तज्ज्ञ मारगदर्शकाचं. आत्माराम परब हे त्या पैकीच एक. गेली पंधरा-सोळा वर्ष लडाख प्रांताच्या सातत्याने वार्‍या करणार्‍या आत्मारामनी आजपर्यंत साडेचार हजारावर पर्यटकांना लडाखची वारी घडवली आहे. गेली चार वर्ष अरूणाचल प्रदेश, असम, मेघालय आणि मणीपूर या पुर्वोत्तर राज्यांमधेही त्यांच्या इशा टुर्स च्या माध्यमातून हजारो पर्यटक सहलींचा आनंद लुटत आहेत.
     
चला सहज फिरून येवू असं म्हणून अशा ठिकाणी जाता येत नाही. निसर्गाचा प्रकोप आणि अवघड रस्ते वाहतूक यांचा सामना करत इथे जावं लागतं. गेल्या वर्षभरात त्या ठिकाणी इशा टुर्स बरोबर जावून छायाचित्रांच्या माध्यमातून अनेकांनी हा भुभाग आपल्या कॅमेर्‍यात बंदिस्त केला आहे. अशा छायाचित्रकारांपैकी रेखा भिवंडीकर, स्मिता रेगे, वृषाली सातपूते, गितांजली माने, गिरीश गाडे आणि स्वत: आत्माराम परब यांनी काढलेल्या छायाचित्रांचं प्रदर्शन बालभवन आर्ट गॅलरी, डोंबीवली पुर्व इथे २३ ते २७ नोव्हेंबर २०११ या दिवसात दुपारी १२ ते ९ या वेळात आयोजित करण्या आले आहे. हिमालयाच्या विविध छटा आणि बहारदार निसर्गचित्रे आपणास या प्रदर्शनात पाहाता येतील.               

Wednesday, January 19, 2011

शेडस् ऑफ लडाख


शेडस् ऑफ लडाख हे छायाचित्रांचं प्रदर्शन रविंद्र नाटयमंदिर आवार, प्रभादेवी, येथे भरलं आहे. लडाख हे असं ठिकाण आहे जे आपल्याच पृथ्वी तलावरचं असूनही तिथे गेल्यावर वेगळ्या ग्रहावर आल्याचा भास होतो. बहुतांशी भाग वनस्पती विरहीत असूनही हा प्रदेश सौंदर्यात तसूभरही कमी नाही. निसर्गाच्या रंगांची अदाकारी आणि त्याच बरोबर अध्यात्माची शिखरं असलेल्या तिथल्या बौद्ध गुंफा, या सगळ्या वातावरणाशी तादात्म्य पावलेले तिथले लोक, अतिशय विषम असं हवामान, बर्फाच्छादीत पर्वत रांगा, निळं-निळं पाणी आणि निळाई ल्यालेलं आकाश, सप्तसिंधू मधली सिंधू नदी आणि तिच्या हातात हात घालून निघालेली झंस्कार नदी, अभावानेच आढळंणारं पण वैशिष्ट्यपुर्ण असं वन्यजीवन, तिथले सण, महोत्सव हे सगळच जगभरातल्या पर्यटकांचं आकर्षणाच केंद्र. आपले भारतातील चोखंदळ पर्यटकही आता लडाखकडे वळत आहेत.

वॉन्डररर्स या हौशी छायाचित्रकारांपैकी काही जण श्री. आत्माराम परब यांच्या नतृत्वाखाली याच ठिकाणी जाऊन आले. गेल्या वर्षभरात यांनी काढलेल्या चायाचित्रांचं  प्रदर्शन येथे मांडण्यात आलं आहे. अशाच 'वॉन्डररर्स' पैकी मानव दवे, नरेंद्र प्रभु, गिरीश गाडे, विराज नाईक, वसूधा माधवन, गिरीश केतकर, सतिश जोशी, आणि आत्माराम परब यांच्या छायाचित्रांचे प्रदर्शन पु.ल. देशपांडे कला दालन, रविंद्र नाटयमंदिर आवार, प्रभादेवी, मुंबई येथे दिनांक १६ जानेवारी ते २३ जानेवारी, २०११, सकाळी ११ ते सायंकाळी  वाजेपर्यंत सर्वांसाठी विनामुल्य आयोजित करण्यात आले आहे.

या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्धाटन दिनांक १५ जानेचारी २०११ रोजी सूप्रसिध्द छायाचित्रकार श्री. अधिक शिरोडकर  यांच्या हस्ते झालं, त्यावेळी त्यानी सर्वच छायाचित्रकारांच्या कलेचं कौतूक केलं आणि लडाखला या वयातही जावसं  वाटतं असं मनोगत प्रकट केलं. या प्रदर्शनाला रसिक पर्यटन प्रेमीं बरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवरानी आत्तापर्यंत भेट दिली आहे आपणही या संधीचा लाभ उठवावा.    

सदर प्रदर्शन 'इशा टुर्स्' ने प्रायोजित केलं असून इशा टुर्स् तर्फे   याप्रदर्शनादरम्यानहिमालयातील, भ्रमंती, लडाख, स्पिती व्हॅली, भूतान, सिक्किम, असाम अरूणाचल प्रदेश, मेघालय, नागालॅन्ड, विदेशातील केनीया, दुबई  तसेच अन्य ठिकाणांची महिती, स्लाईड शो चित्रफित आणि मार्गदर्शन विनामुल्य उपलब्ध करून दिले जाईल. संपर्क : 9892182655, 9320031910.
.

LinkWithin

Related Posts with Thumbnails