Tuesday, April 27, 2010

जोझिला खिंडीचे भाग्य उजळणार



लडाखला जो एकदा जातो तो लडाखच्या प्रेमातच पडतो हे सत्य आहे. पहिल्यावेळी मी गेलो तो मनाली मार्गे. दुसर्‍यावेळीही मनाली मार्गेच पण नंतरच्यावेळी श्रीनगर मार्गे जाण्याचा योग आला. श्रीनगर हे नंदनवन असूनही मला कधी एकदा जोझिला खिंड पारकरून लडाख प्रांतात प्रवेश करतो असं झालं होतं. लडाख आहेच तसं महाराजा...!

तर नुकतीच एक बातमी वाचनात आली, जोझिला खिंडी विषयीची. सहा-सात महिने वर्फाच्छादीत असल्याने जोझिला पास मार्गे लडाखला जाता येत नाही. आता त्या जोझिलालाच  भुयार पाडून लडाख बाराही महिने श्रीनगरशी, पर्यायाने भारताशी रस्ते मार्गानेही जोडलेले रहाणार आहे ही आनंदाची बातमी आहे.  
             
नरेन्द्र प्रभू

Wednesday, April 7, 2010

कैलास मानसरोवर यात्राकरताना घ्यावयाची काळजी


  1. पावित्र्य जपा. 
  2. जास्त खोल पाण्यात जाऊ नका. 
  3. आखून दिलेल्या जागेजवळ स्नान करा 
  4. होमहवन, तर्पन मानसरोवराच्या काठी करा 
  5. कितीही ऊन-पाऊस पडला तरी कानटोपी (मंकी कॅप) कधीच काढू नका. 
  6. समुद्रसपाटीपासून १५ हजार फुटांवर पोहोचल्यावर वातावरणाचा परिणाम यात्रेकरूवर होतो. तो काहीसा चिडचिडा बनतो. यात्रेकरूंनी संयम पाळावा. 
  7. मानसरोवराच्या काठावर काचेचे तुकडे पडलेले आढळतात. ते पाहूनच स्नान करावे. काचेचे तुकडे कृपया एकत्र करून दूरवर एकाच ठिकाणी दुसऱ्या यात्रेकरूंना त्रास होणार नाही, अशा ठिकाणी टाकावेत. पेप्सी, कोकाकोला, पाण्याच्या प्लास्टिकच्या बाटल्या कुठेही फेकू नका. 
  8. संपूर्ण प्रवासात दिवसातून तीन ते चार लिटर पाणी अवश्य घ्या व ग्लुकॉन-डी व इलेक्ट्रॉन पावडरचा वापर करा. 
  9. खडीसाखर जवळ ठेवा. तास- दीड तासाच्या अंतराने तोंडात टाका. 
  10. प्रवासाला निघताना कुठल्याही तिबेटीयन लामाचे फोटो, पुस्तक, नकाशा घेऊन जाऊ नका. 
  11. कैलासाला परिक्रमा आखून दिलेल्या मार्गानेच सावकाश करा. 
  12. साथीदाराची वाट पाहा. जोडीने प्रवास करा. आपल्यासोबत जवळचा मित्र किंवा नातेवाईक असणे केव्हाही चांगले असते. 
  13. डोलमा पास येथे जास्त वेळ थांबू नका. ते अत्यंत उंचावर आहे. ऑक्सिजनचे प्रमाण ४० टक्के आहे. त्यामुळे डोलमा देवीचे दर्शन होताच त्वरित खाली उतरा. 
    आरतीचे, पूजेचे सामान तेथे काहीच मिळत नाही. शक्यतो घरातून सर्व वस्तू घेऊन जाव्यात. त्याचप्रमाणे परिक्रमा करणाऱ्या भाविकांनी चार-साडेचार फुटांची बांबूची भरीव मजबूत परंतु, हलकी काठी घरून घेऊन जावी. तेथे काठी मिळत नाही. 
  14. सदैव बॅटरी, औषधे, पासपोर्ट इत्यादी गोष्टी जवळ सांभाळून ठेवा. जास्तीत जास्त गरम कपडे घेऊन जा. 
  15. रक्तदाब, हृदयविकार, बायपास सर्जरी, दमा, मधुमेह किंवा श्वासाचा विकार असल्यास किंवा वयोवृद्ध व लहान मुलांनी ही यात्रा करू नये. 
  16. कॅमेऱ्याचे व बॅटरीचे सेल आपल्या खिशात गरम कपडय़ांमध्ये गुंडाळून ठेवा. गरज भासल्यास त्याचा वापर झाल्यावर पुन्हा गरम कपडय़ांत गुंडाळून ठेवा. 
  17. ही यात्रा करण्यापूर्वी धार्मिक अनुभवी व्यक्तींचा, डॉक्टरांचा व नेपाळी शेर्पाचा सल्ला घ्या. 
    ही यात्रा सनातन धर्माचे मठ आयोजित करते, परमार्थ निकेतन आश्रम हरिद्वार किंवा कैलास मासरोवर आश्रम, पालम कॉलनी, दिल्ली यांच्याशी अधिक माहितीसाठी जरूर संपर्क साधावा. किंबहुना सहकार्य घ्यावे. तसेच काठमांडू येथील हीरा धमाला, कर्नाली एक्सकर्शन, हॉटेल मरशगडी समोर, दुसरा माळा, थेमल, काठमांडू, पोस्ट बॉक्स नं. ४५८३ नेपाळ यांच्याशी संपर्क साधल्यास आत्मविश्वास वाढतो. त्याचे मूळ कारण त्यांनी ही यात्रा स्वत: जवळजवळ ३० ते ४० वेळा केली आहे, त्याचा लाभ घ्यावा. प्राधान्य द्यावे.
  18. कैलासाला परिक्रमा करतेवेळी यार्कवाले किंवा सामान घेऊन जाणारे शेर्पाचा आदर करा. त्यांच्याशी प्रेमाने, आपुलकीने वागा. आपल्याजवळचे खाद्यपदार्थ त्यांना द्या. त्यांची भाषा कळली नाही तरी हाताच्या इशाऱ्याने त्यांचे मन जिंका. त्यांना आपलेसे करा. डेराफूक या दुसऱ्या टप्प्यापासून काही अंतर चढून गेल्यावर वाटेत शिवस्थळ या पवित्र ठिकाणी आपणाजवळची जुनी वस्त्रे फेकून मगच पुढचा प्रवास करा. 
  19. ऊन पडले असता गॉगल आळस न करता सदैव घाला. त्याचप्रमाणे नाकात वाळू जाऊ नये म्हणून मास्क लावावा. 
  20. संपूर्ण प्रवासात एका एअर बॅगेत खाण्याचे, पूजेचे सामान, कॅमेरा, पाण्याच्या बाटल्या सदैव जवळ असू द्या व सात्त्विक आहार घ्या. 
  21. डोलमा पास येथे देवीची पूजा करताना कितीही थंडी पडली तरी पायमोजे काढून, हात स्वच्छ धुवून मगच पूजा करावी. 
  22. पाऊस व बर्फवृष्टीपासून संरक्षणार्थ सदैव रेनकोट जवळ ठेवा. 
    यात्रेला निघण्यापूर्वी पहाटे लवकर उठून सूर्याला नमस्कार करून स्मरण करावे. सूर्यनमस्कार घालून चार ते पाच फर्लाग हळू गतीने धावण्याची सवय करावी. 
    यात्रेची आखणी जून किंवा श्रावण महिन्यात करावी. मुलांना शाळेला सुटी असते म्हणून स्वत:च्या सोयीसाठी एप्रिल किंवा मे महिन्यात यात्रा करू नये. यात्रेमध्ये तीर्थपुरीचा सहभाग असावा. 
  23. यात्रा पूर्ण झाल्यावर काठमांडूला येताना वातावरणाच्या बदलामुळे भोवळ किंवा गरगरल्यासारखे वाटते. त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. काही दिवसांनी शारीरिक स्थिती पूर्ववत होईल. 
  24. आपत्कालीन अपघात विमा एक वर्षांच्या मुदतीकरिता न्यू इंडिया अ‍ॅश्युरन्स, मुंबईतर्फे उतरवावा. 
  25. काठमांडू विमानतळावर उतरल्याबरोबर एमिग्रेशनचा शिक्का आपल्या पासपोर्टवर न विसरता मारून घ्यावा व मगच विमानतळाबाहेर यावे. तिबेटमध्ये अशा शिक्क्याची गरज असते.

साभार लोकसत्ता
मुळ लेख इथे वाचा

LinkWithin

Related Posts with Thumbnails