Thursday, March 4, 2010

'लडाख' छायाचित्र प्रदर्शनलडाख आणि इशा टुर्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. 'वॉं न्ड र र्स'   हे असच एक नाव. ही तीन्ही नावं ज्या एका नावाशी जोडता येतील ते नाव म्हणजे आत्माराम परब.   'वॉं न्ड र र्स' या हौशी छायाचित्रकारांच्या गटाची   स्थापना आत्माराम परब यांनी नऊ वर्षांपुर्वी केली. महाराष्ट्राच्या विविध भागात आजपर्यंत  'वॉं न्ड र र्स'ची अनेक प्रदर्शनं झाली. आता हेच प्रदर्शन मुंबईच्या उपनगरात  बोरिवली (प.) येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़मंदिर कलादालनात ५ ते ७ मार्चदरम्यान छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.  या प्रदर्शनात लडाखची कला, संस्कृती, निसर्ग आणि मानवी जीवन याचं छायाचित्रीकरण पाहण्याची संधी रसिकांना उपलब्ध होईल.  

बोरिवलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात लेह-लडाखबद्दलची माहिती, स्लाईड शो, चित्रफीत व पर्यटन तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वासाठी खुले आहे.      अधिक माहितीसाठी लोकसत्तामधील ही बातमी वाचा


No comments:

Post a Comment

LinkWithin

Related Posts with Thumbnails