Thursday, March 18, 2010

India to build rail line to Ladakh



The ambitious and strategically crucial project to link mountain-locked Ladakh region of Jammu and Kashmir with rest of the country by train has moved a step closer to fructification with the Railways finalising the feasibility report in this regard.

The first rail link is proposed to be between Leh and Bilaspur in Himachal Pradesh and six passenger trains and nine goods trains are planned on the 498 km-long section.

"The feasibility report of Leh-Bilaspur rail link project is almost ready and it will be submitted to Railway Ministry shortly for scrutiny. After the scrutiny, the report would be sent to the Planning Commission before being sent to Parliament for final approval," said a senior Railway Ministry official involved with the feasibility study.

The project is strategically crucial as it is part of India's efforts to improve infrastructure in the border region considering that China has already built a rail link to Tibet.

China has also improved connectivity with Pakistan via the Karakoram highway which runs close to the Indian border.

The proposed Leh rail project came up for discussion at the Army Commanders' Conference here recently in the context of improving supply lines along the border like China has done. 


Monday, March 15, 2010

आत्मा


हा माझा जवळचा मित्र. याच्या बाबतीत रोज काहीतरी घडत असतं. कधी लडाखला गेलाय तर कधी भुतानला. नुकताच श्रीलंकेला जाऊन आला. ओळखीतलं कुणीही भेटलं तरी विचारणा होते आत्मा काय करतोय? आता काय म्हणून सांगायचं? हा माणूस एका मागोमाग एक काहीतरी करतच असतो. आपल्याला माहिती असलेलं सगळं सांगायचं असं ठरवलं तरी अनेक गोष्टी सांगायच्या राहून जातात. यावर उपाय म्हणून म्हटलं फेस बुकवर एक ग्रुप तयार करावा. तसा केलाय Atmaram Parab Fan Club या नावाने. बघा...वाचा.. जॉईन व्हा.

आत्मा... ज्याच्याशी माणसं मनाने जोडली जातात. जो सह्य आणि असह्य मित्रांनाही हसत मुखाने सामोरा जातो. क्रिकेट, कस्टमस्, फोटोग्राफी, इंटेरिअर डेकोरेशन अशी मुशाफिरी करत जो आता लोकांना भटकवण्यात दंग आहे. आत्ता तरी तेच करतोय, पुढे काय करणार इश्वर जाणे. एकूण काय, देवाक काळजी...!

लडाख, हिमाचल प्रदेश, स्पिती-व्हॅली, सिक्कीम, भुतान, अरुणाचल प्रदेश, असम, मेघालय, मणिपूर सगळ्या हिमालयात भ्रमंती. हिमालय हा त्याचा ध्यास असं असलं तरी तिकडे असताना सह्याद्रीच्या भेटीचीच मनात आस. म्हणून दशसहस्त्र फुटांवरून जो येतो तो समुद्र सपाटीला पार कोकणात तिकडे सिंधुदूर्गात जाऊन थडकतो. प्रत्येकवेळी नवे सखे-सोबती यांची भर पडलेली असते किंबहूना तीच मिळकत असते. असा हा आत्मा. मी त्याचा फॅन..... आपण...?







नरेंद्र प्रभू

Sunday, March 14, 2010

लडाखच्या प्रकाशछटा





लडाख  फोटोंतून  भेटतं.  तेही  अगदी  कडकडून!  कारण  हे  प्रदर्शरस्ज्;न  पहात  असताना  आपण  जणू  लडाखमध्ये  पोहोचलेलो  असतो.  आत्माराम  परब  आणि  त्यांच्या  चमूने  भरवलेलं  प्रदर्शरस्ज्;न  लक्षात  राहतं  ते  अगदी  फोटोंच्या  ओळींसकट! स्मृती  कुळकर्णी
मुळ लेख  लोकप्रभा मध्ये वाचा 








कसे  असेल  लडाखतेथे  पासपोर्ट  न्यावा  लागतो  कावजा  चाळीस  डिग्री  सेंटीग्रेडमध्ये  तेथील  लोक  कसे  राहतातत्यांच्या  उपजीविकेचे  साधन  काय  इथपासून  ते  लडाख  चक्क  भारतात  येतंइथपर्यंत  प्रश्न  विचारणारे  लोक  आहेत.  या  सगळया  प्रश्नांची  उत्तरे  आपल्याला  'शेडस्  ऑफ  लडाख'च्या  प्रदर्शनामधून  मिळतात.
' शेडस्  ऑफ  लडाखहे  प्रदर्शन  वेड  लावणारे  आहे.  तेथील  फोटोग्राफ्स  बघताना  स्थळाकाळाचा  विसर  पडतो  आणि  आपण  पूर्णपणे  त्यातच  रमून  जातो.  हे  प्रदर्शन  नुकतंच  एनसीपीए  येथील  'पिरॅमल  आर्ट  गॅलरीत  पार  पडलं.  या  प्रदर्शनामध्ये  नेमके  काय  असेल  याचा  विचार  करत  आपण  जेव्हा  आत  प्रवेश  करतो  तेव्हा  पटकन  समोर  येतो  तो  बुध्दाचा  हसरा  फोटो.  त्या  फोटोकडे  बघत  असतानाच  लडाखच्या  स्थानिक  वाद्याचे  सूर  कानी  पडतात.  ते  मंद  सूर  मग  आपल्याला  संपूर्ण  प्रदर्शनभर  साथ  देत  असतात.  छतावर  फडकणारे  लडाखचे  रंगीबेरंगी  झेंडे  आपले  लक्ष  वेधून  घेत  असतानाच  लडाख  परिसराचा  मॅप  आणि  फोटोग्रार्फ्सचा  थोडक्यात  परिचय  लावलेला  दिसतो.  लडाखबद्दल  अधिक  माहिती  जाणून  घ्यायला  उत्सुक  असणाऱ्या  लोकांना  माहिती  देण्याकरिता  स्वत:  आत्माराम  परब  सामोरे  येतात.  त्यांच्याकडून  लडाखचे  एकूणच  अनुभव  आणि  प्रदर्शनाबद्दल  माहिती  घ्यायला  गेल्यावर  पहिल्यांदा  एकच  वाक्य  ऐकायला  मिळते.  लडाख  म्हणजे  आश्चर्यच  आहे!  ते  पुढे  म्हणतात,  ''भारतातील  हा  एकमेव  भाग  असा  आहे  जिथे  आपण  एकाच  वेळेला  वाळवंटातील  कोरडी  वाळूहिरवीगार  झाडेबर्फासारखी  थंड  नदीडोंगर  आणि  डोंगराच्या  शिखरावरील  बर्फ  बघू  शकतो.  निसर्गाचा  हा  चमत्कार  आपल्याला  स्तंभीत  करतो.  श्वास  रोखायला  भाग  पाडतो.  किती  फोटो  काढू  आणि  किती  नको  असे  होते.''


या  प्रदर्शनाचे  निमित्त  होतेगिर्यारोहक  आणि  प्रकाशचित्रकार  आत्माराम  परब  यांच्या  नेतृत्वाखाली  'वॉन्डरर्सया  संस्थेमार्फत  हितेंद्र  सिनकरसर्वेश  जोशीमकरंद  जोशीअजय  कुळकर्णीशेहजाद  आरसीवालाअपर्णा  भट्टेराजेश  पितळेरुचिरा  राव  आणि  मेघन  पाटणकर  या  हौशी  फोटोग्राफर्सनी  केलेल्या  लडाखवारीचे!  गेल्या  वर्षी  15  ऑगस्ट  रोजीलडाखमध्ये  स्वातंत्र्यदिन  साजरा  करणे  आणि  'टाक-  थोकया  बौध्द  मठाच्या  उत्सवास  भेट  देण्याचे  ठरवून  त्यांनी  लडाखला  भेट  दिली  होती.  यांच्या  निवडक  फोटोंचे  प्रदर्शन  पिरॅमलमध्ये  भरवण्यात  आले  होते.
फोटो  बघत  असताना  लडाखबद्दल  बरेच  जाणून  घ्यायची  इच्छा  असते  आणि  आपल्या  मनातील  हे  विचार  ओळखून  आत्माराम  परब  बोलू  लागतात,  ''लडाखचा  प्रवास  'मुंबई  ते  मुंबई  व्हाया  लडाखअसा  गृहीत  धरला  तर  तो  17  दिवसांचा  आहे.  मनाली  ते  लडाख  हा  475  कि.  मी.चा  प्रवास  जीपने  केला  जात  असून  हा  प्रवास  करण्यासाठी  तीन  दिवस  लागतात.  कारण  तो  परिसर  एवढा  सुंदर  आहे  की  फोटोकरिता  इथे  जीप  थांबवू  की  तिथे  असे  होते.  साधारण  पाच  ते  सहा  जण  एका  जीपमध्ये  असतात.  आम्ही  विविध  ठिकाणी  जीप  थांबवून  फोटो  काढले  असल्यामुळे  लडाखच्या  फोटोग्राफ्समध्ये  प्रचंड  विविधता  दिसते.  या  तीन  दिवसांत  साधारण  18,300  फूट  उंच  जात  असताना  सार्चू  हे  ठिकाण  लागते.  हे  ठिकाण  अतिशय  सुंदर  असून  याच  प्रवासादरम्यान  आपल्याला  झंस्कार  आणि  सिंधू  नदीचा  संगम  बघायला  मिळतो.''  या  संगमाचा  एक  अप्रतिम  फोटोग्राफ  तेथील  प्रदर्शनात  लावलेला  दिसतो.आत्माराम  परब  सांगतात,  ''तेथील  नदीत  राफ्टिंग  करता  येते.  साधारण  साडेतीन  तासांचा  सुंदर  आणि  अतिशय  शांत  असा  हा  प्रवास  असून  या  दोन्ही  नद्यांच्या  तापमानामध्ये  साधारण  10  ते  12  डिग्री  सेंटीग्रेडचा  फरक  असतो.''
लडाखच्या  प्रवासादरम्यान  'चांग  ला  पासहे  17600  फुटांवरील  अतिशय  सुंदर  ठिकाण  लागत  असून  त्या  ठिकाणी  अनाघ्रात  निसर्ग  दिसून  येतो.  बौध्द  धर्माच्या  खुणा  बाळगणारे  बौध्द  मठत्यांचे  पारंपरिक  उत्सवजगातील  एकमेव  मूनलॅण्ड  (चंद्राच्या  पृष्ठभागाप्रमाणे  असलेली  भूमी)वैराण  वाळवंट  आणि  त्याचबरोबर  उत्तुंग  पर्वतराजींवर  दिसणारी  बर्फाच्छादित  हिमशिखरेप्रतिकूल  परिस्थितीचा  सामना  करत  आपले  जीवन  जगणारी  कणखर  मनोवृत्तीची  उत्सव  प्रिय  लडाखी  माणसेत्यांचे  रक्षण  करणारे  भारतीय  सैनिकअशी  अनेक  वैशिष्टये  लडाखच्या  सहलीदरम्यान  अनुभवायला  मिळतात.लडाखमधील  पर्यटन  आणि  प्रदर्शनाबद्दल  सांगताना  आत्माराम  परब  सांगतात,  ''खडतर  प्रवास  आणि  ऑक्सिजनचे  प्रमाण  35  टक्क्यांनी  कमी  असल्यामुळे  तेथील  पर्यटन  अगदी  टिचभरच  आहे.  तेथील  पर्यटन  वाढावेआमच्या  दर्जेदार  फोटोंच्यामाध्यमातून  लडाखमधील  दुर्लक्षित  पर्यटनस्थळेविविध  संस्कृतीउत्सवस्थापत्यकला  आणि  ऐतिहासिक  वस्तूंची  माहिती  सर्वसामान्यांपर्यंत  पोहोचावी  आणि  त्याचबरोबर  हौशी  फोटोग्राफर्सना  या  प्रदर्शनामधून  व्यासपीठ  उपलब्ध  करून  देण्यासाठी  हे  प्रदर्शन  आयोजित  केले  होते.''

200
  किंवा  400  आयएसओची  फिल्म  वापरून  काढलेल्या  काही  फोटोग्राफ्समध्ये  आलेले  ग्रेन्स  चाक्षण  फोटोग्राफर्सच्या  नजरेतून  सुटत  नाहीत.  फोटोग्राफीबाबत  सांगताना  आत्माराम  परब  म्हणतात,  ''लडाखला  डिजीटल  कॅमेरा  नेणे  केव्हाही  चांगले.  त्यामुळे  किती  फोटो  काढावे  यावर  बंधन  राहात  नाही.  पण  तरीही  एसएलआर  कॅमेऱ्याने  क्लिक  केलेल्या  फोटोंची  गंमतच  काही  वेगळी  असते.  एसएलआर  नेल्यास  कमीत  कमी  20  ते  25  रोल  नेणे  गरजेचे  आहे.  कारण  तेथे  फोटोग्राफीकरिता  खूप  स्कोप  असून  तेथे  100  आयएसओची  फिल्म  वापरणे  अतिशय  चांगले.''
त्या  प्रदर्शनातील  सगळेच  फोटोग्राफ्स  एकापेक्षा  एक  सुंदर  असले  तरीही  त्यातील  काही  फोटोंसमोर  आपले  पाय  जरा  जास्तीच  रेंगाळतात.  ते  फोटो  बघत  मनातल्या  मनात  आपण  फोटोग्राफरला  दाद  देऊन  जातो.  यामध्ये  खास  आवर्जून  दखल  घेण्याजोगे  काही  फोटोग्राफ्स  म्हणजेआत्माराम  परब  यांनी  'विथआऊट  वरी  इन  द  वर्ल्डहा  बर्डस्  आय  व्ह्यूने  शेतांच्या  तुकडयांचा  टिपलेला  हिरवेपणा.  तसेच  अजय  कुळकर्णी  यांचा  शिखरांवर  पडलेल्या  उगवत्या  सूर्याच्या  किरणांचा  फोटो;  'पेंटिंग  इन  प्रोग्रेस'.  हा  फोटोग्राफ  अप्रतिम  आहे.  पांढऱ्या  बर्फाच्छादित  डोंगरातून  वाट  काढत  गेलेला  काळाकूट्ट  रस्त्याचा  'व्हाईट  मॅजीकनावाचा  राजेश  पितळे  यांचा  फोटोग्राफही  खिळवून  ठेवतो.  अपर्णा  भट्टे  यांचा  'वाँट  टू  एक्स्चेंज  माय  बॅगपॅक?',  हितेंद्र  सिनकर  यांचे  'स्ट्रेच  टू  लिमिट',  'अलोन  बट  नॉट  लोनलीयाबरोबरच  फत्तच्  एका  प्रेच्ममध्ये  पकडलेली  एक  अतिशय  सुंदर  संध्याकाळ  'ऍन  इव्हेनिंग  टू  रिमेंबरहे  फोटो  आपल्याला  दंग  करून  जातात.  मेघन  पाटणकर  यांचा  'फेथ  टचेस  न्यू  लाईटस',  शेहजाद  आरसीवाला  यांचा  पॅनगाँग  लेकचे  प्रतिबिंब  असलेला  फोटोहे  एकपेक्षाएक  उत्कृष्ट  फोटोग्राफ्स  या  प्रदर्शनात  बघायला  मिळतात.  या  प्रदर्शनामध्ये  असलेला  मूनलॅण्डचा  फोटो  लोकांना  मूनलॅण्डची  भव्यता  समजावी  म्हणून  सहा  प्रेच्म  एकत्र  करून  बनवलेला  आहे.  या  प्रदर्शनाचे  वैशिष्टय  म्हणजेत्या  प्रदर्शनातील  फोटोंना  दिलेल्या  ओळी  नंतरही  बऱ्याच  वेळ  आपल्या  मनात  रेंगाळत  राहतात.  लडाखमध्ये  फोटोग्राफ्स  काढताना  फोटोग्राफर्सना  सूर्यप्रकाश  आणि  ढगांच्या  सावलीचा  (लाईट  ऍण्ड  शॅडो)  अद्भुत  खेळ  अनुभवायला  मिळतो.  लडाखमधील  98  टक्के  जनता  बौध्द  असून  तेथील  लोक  शांतताप्रिय  आहेत.  तेथे  अतिरेकी  आणि  दहशदवाद  नाही.  लडाखमध्ये  5.30  वाजता  उजाडत  असून  तेथे  सूर्यास्तही  उशिरा  होतो.  थंडीत  तेथील  तापमान  वजा  चाळीस  डिग्रीपर्यंत  जात  असल्यामुळे  घरावर  छ)पर  लावण्याआधी  साधारण  पाच  ते  सहा  फुटांचा  लाकडांचा  थर  रचून  मग  छ)पर  लावले  जाते.  हा  फोटोग्राफही  त्या  प्रदर्शनात  बघायला  मिळतो.'या  प्रदर्शनामधील  आत्माराम  परब  यांचा  स्वत:चा  आवडता  फोटो  कोणता?'  असे  त्यांना  विचारले  असता  ते  लगेच  'लाईट  प्रचॅम  हेवनया  फोटोकडे  कटाक्ष  टाकतात  आणि  गालातल्या  गालात  हसत  सांगतात,  ''एकदा  बेस  कॅम्पला  जाण्याकरिता  18  कि.  मी.  चालत  जावे  लागले.  13  हजार  फुटांवरील  सात  तासांचा  सलग  चालत  केलेला  तो  प्रवास  प्रचंड  थकवून  गेला  आणि  बेस  कॅम्पला  पोहोचल्यावर  तंबूत  आराम  करत  पडलेलो  असताना  मला  डोंगरावर  पडलेले  अप्रतिम  उन्हाचे  कवडसे  दिसले.  पण  तंबूच्या  बाहेर  येऊन  फोटो  काढण्याइतकेही  त्राण  माझ्यात  नव्हते.  अशा  वेळी  मी  त्याच  अवस्थेत  झोपून  तो  फोटो  काढला  आहे.''
आत्माराम  परब  हे  कस्टममध्ये  काम  करत  असून  त्यांना  नेचर  आणि  वाईल्डलाईफ  फोटोग्राफीची  प्रचंड  आवड  आहे.  गेली  वीस  वर्षे  ते  या  क्षेत्रात  असून  हे  त्यांचे  तिसरे  प्रदर्शन  आहे.  आत्तापर्यंत  लडाखला  ते  अनेक  वेळा  जाऊन  आले  असले  तरीही  दर  भेटीत  त्यांना  लडाखचे  नवे  सौंदर्य  दिसत  असल्यामुळे  लडाख  त्यांना  सतत  खुणावत  राहतो.

journalist.smruti@gmail.com





Thursday, March 11, 2010

Motorcycle diaries of riding to heaven



Expressindia » Story

Smita Nair

Posted: Mar 03, 2008 




It’s been 13 years, but 40- year-old Atmaram Parab still remembers precisely the taste of the six soggy biscuits that sustained him for more than a week as he waited for the snow blanket at Khardung La to melt.On the last day, when the entire ration—two packets of biscuits—had been shared equally among the group of expedition bikers, the only road that cleared was the road ahead to Ladakh. “Imagine you have snow all around you. And the only line of relief, when you have convinced yourself that there is nothing colder that you can take, leads to the top,” recalls the man who later voluntarily retired from a Customs job to pursue his new love.
A decade later, and two bikes older, Parab now chaperones bikers and nature lovers to Ladakh “every year, every season” because “it is much more fashionable to see nature changing her wardrobe”.
That weekend in 1995, once his team rode up to Ladakh, the Army took over once their Hero Hondas had given up, dropping them near a hotel. “We were given freeaccommodation and tasted real hospitality.” The hotel owner even arranged for hot water. “The first thing we did when we returned was to send him the money, with a heartfelt thank you note.”
His mother refused to permit “another risk after 1995 for two years”, but Parab is now a guide to many Mumbaikars who travel with him armed with a camera. The only difference between traveling with a regular travel operator and Parab’s team of “amateur photographers” is, as he says, that “you can expect a wake up call at 4 am for itineraries like Lake Pangong Tso, or you might get to drink the best gur gur (a local tea) at the house of a local”.
Having covered the beautiful valley a hundred times, it does not come as a surprise to hear that Parab has trekked to this land that’s above 3,000 feet above sea level “every season, and even in December, to see the shades of the region and get a sense of the place.” The expedition biker’s explanation of his choice of muse: “It is different to come back to a place which has the same horizon. It has no buildings or new man made structures cropping up every time you leave it. It’s like coming back to a piece of land which has not been abused.”
The anecdotes he shares are located in nooks and corners not identified even by the tourism board. “It’s like God changes the postcard at every turn and every bend that the road takes. So if you have a desert pattern on your right with the lake, the eyes are treated to a beautiful valley scene at the next bend. The shade of the snow changes with every mile.”
Parab has now organised a photo exhibition of Ladakh photographs taken by people he has accompanied. So, while the pictures placed at Ravindra Natya Mandir had amateur photographs of Ladakhi women, of the landscape and of the shadows of clouds on the hills, the big difference is that the name of his show, Shades of Ladakh, is dedicated to the Army.“Every time I think about how I quit my job with the Customs, I realise that the cause was much bigger. It’s like you have an entire heaven up there. I make it easier for you to stop dreaming. My job, or my destiny, is take people to their dreams,” Parab says.

Mulundkar Shoots to New Heights

 

A photograph speaks a thousand words. This adage seems to be the motivating line for 37-year-old nature lover, mountaineer and travel photographer, Atmaram Parab who has captured nature in its varied forms over a career span of 15 years.

This Arunodaya Nagar residents work has been featured in the April issue of Better Photography, South Asias largest selling photography magazine. Seventeen photos from Parabs trip to Zanskar Valley, Leh, in July 2004 have been published in the magazine. 

Parab along with seven other photographers had also gone to Ladakh to witness the Hemis festival. 

Says Parab, The monks stitch a 40 feet high cloth with intricate embroidery, silk, zari, gold, pearls, etc, which is called a Thangka and is exhibited after every 12 years. Last year, we went specifically to capture this event. 

This is not Parabs first visit to Ladakh. Since 1999, Parab has been travelling to Ladakh every year. He has conducted several exhibitions of his work in Mumbai since then. He says, I want to bring to the forefront unexplored sites in India.

A customs tax assistant by profession, Parabs romance with the camera started during his college days. 

He says, My father owned a camera but never allowed me to touch it. I finally got to use it after he passed away. I had a keen interest in photography and did a diploma in photography from the JJ School of Arts. He considers Manohar Gangan, a national award-winning photographer as his mentor. 

Parab even took lessons from him. 

Talking about his most interesting trip so far, Parab recalls his trip to the Andamans in 2001 where he had taken photographs of the Jarawa, Sentinelese and Onge tribes. 

Parab says, These tribals are not accustomed to outsiders so it was quite risky. I had to take the photographs from a distance. 

Ask him what fascinates him most about photography and Parab says, A photograph speaks volumes and leaves an indelible impact on the mind. Nature captivates me as it is so pure and pristine. 

rinky.kumar@mid-day.com

How to get to Ladakh

By air Jet Airways and Indian Airlines. Mumbai-Delhi-Leh
By road Mumbai-Chandigarh/Delhi, Delhi-Manali-Leh. The route from Manali to Leh is 475 km by jeep

Thursday, March 4, 2010

'लडाख' छायाचित्र प्रदर्शन



लडाख आणि इशा टुर्स हे आता एक समीकरणच बनलं आहे. 'वॉं न्ड र र्स'   हे असच एक नाव. ही तीन्ही नावं ज्या एका नावाशी जोडता येतील ते नाव म्हणजे आत्माराम परब.   'वॉं न्ड र र्स' या हौशी छायाचित्रकारांच्या गटाची   स्थापना आत्माराम परब यांनी नऊ वर्षांपुर्वी केली. महाराष्ट्राच्या विविध भागात आजपर्यंत  'वॉं न्ड र र्स'ची अनेक प्रदर्शनं झाली. आता हेच प्रदर्शन मुंबईच्या उपनगरात  बोरिवली (प.) येथील प्रबोधनकार ठाकरे नाटय़मंदिर कलादालनात ५ ते ७ मार्चदरम्यान छायाचित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.  या प्रदर्शनात लडाखची कला, संस्कृती, निसर्ग आणि मानवी जीवन याचं छायाचित्रीकरण पाहण्याची संधी रसिकांना उपलब्ध होईल.  

बोरिवलीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात लेह-लडाखबद्दलची माहिती, स्लाईड शो, चित्रफीत व पर्यटन तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वासाठी खुले आहे.      



































अधिक माहितीसाठी लोकसत्तामधील ही बातमी वाचा


अंदमानमध्ये वीर सावरकर पुण्यतिथी साजरी.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या दोन काळ्यापाण्याच्या शिक्षेला नुकतीच शंभर वर्ष पुर्ण झाली. वीर सावरकरांनी त्यांच्या आयुष्यातील उमेदिची दहा वर्ष सश्रम कारावासात व्यतीत केली. अंदमान मधील पोर्टब्लेअर तेथील सेल्युलर जेलमध्ये सावरकरांना ठेवण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या आत्मार्पणदिनी इशा टुर्स आणि परिवारातर्फे त्यांना ठेवण्यात आलेल्या कोठडीत जावून आदरांजली वाहण्यात आली. गेल्या २६ फेब्रुवारी २०१० रोजी सेल्युलर जेलमध्ये सावरकर प्रेमींचा जनसागरच लोटला होता, त्याचा एक भाग होता आलं हे आम्ही इशा टुर्स परिवार आपलं भाग्य समजतो. वीर सावरकरांना लाख लाख प्रणाम.


Tuesday, March 2, 2010

Drive Through The Himalayas

Atmaram Parab

The group of amateur photographers who call ourselves “Wanderers“. The group was formed in 2003 by Atmaram Parab to promote amateur creative photography.

Who have carried out photography expeditions to different regions of the Himalayan range and attempted to capture the beauty of the place. The unique combination of nature, human life, culture, tradition, Monasteries, rituals of worship, lakes, rivers and high altitude passes found in the region of Leh- Ladakh have been captured beautifully by our team of photographers.

An exhibition of our photographs will be held at:

The Art Gallery,

Prabodhankar Thackeray Natya Mandir

Borivali west

From 4th to 7th March, 2010

(11.00 am - 8.00 pm)

The participating photographers are Atmaram Parab, Tushar Nidambur, Narendra Prabhu, Vinayak Parab, Dr Ghanshyam Borkar, Deepankar Banerjee ,Kedar Malegaonkar, Manoj Naik and Sagar Karnik,

Groups objective is to popularize the Himalayan regions amongst the layman and to attract them to get away from the beaten track to explore this beautiful landscape. At the same time we also aim to make available a platform to showcase the talent and skill of the photographers.

A travel film as well as a Slideshow on Ladakh will also be organized during the Exhibition.



सिंधुदुर्ग - बॅकवॉटर्स




चमकलात ना ? कारण सिंधुदुर्गात बॅकवॉटर्स आहेत याची कल्पना खुद्द सिंधुदुर्गवासियांनाच नाही. असं असलं तरी सिंधुदुर्गात ४२ बॅकवॉटर्स उपल्ब्ध आहेत. अहो असणारच कारण मुळतच हा प्रदेश सागराने श्री. परशुरामासाठी सोडलेला आणि त्यामुळे ' परशुराम भुमी ' म्हणून ओळखला जातो. परशुराम भुमी कशी ? तर त्याने जिंकलेली सर्व भुमी कश्यप ऋषीना दान केली. दान दिलेल्या भुमित राहणे योग्य नाही म्हणून बाण मारून समुद्र मागे हटवला आणि जी भुमी तयार झाली ती कोकणची भुमी. तिला " अपरांत" असेही म्हणतात. ( अपर म्हणजे पश्चिम आणि अंत म्हणजे शेवट ) .सागराने ही जमिन स्वतःहुन परशुरामासाठी सोडली तरीसुध्दा आपल्या जवळ येण्यासाठी अनेक वाटा निर्माण केल्या. अशा या नितांत सुंदर सिंधुदुर्गात नौकानयन करण्यासारखे दुसरे सुख नाही. पण आपली परिस्थिती कस्तुरी मृगासारखीच आहे. या अमुल्य ठेव्याची आपल्याला कल्पनाच नाही.

कर्ली नदीच्या विस्तिर्ण पात्रातुन संथ वहणारे पाणी कापत आपली नौका निघाली कि आपण सारेच देहभान विसरून जातो. दोन्ही बाजुला असलेली गर्द झाडी, माड पोफळींच्या बागा, त्यांच्या छायेत विसावलेली छोटी-छोटी घरकुलं,मंदिरं , मधुनच डोकावणारं एखादं तुळशीवृंदावन, पक्षाची शीळ, खाली हिरवीगार वनराई आणि वर आकाशाची निळाई, वार्‍याची झुळुक आणि खाली वाहणारं शांत, थंड पाणी. भुलोकीचा स्वर्गच जणु.खरतर ही देवभुमीच. परमेश्वरने एकाच ठिकाणी एवढं निसर्गसौंदर्य ओतलय याचा इतरेजनांना हेवा वाटावा असा हा दृष्टीदुर्लभ देखावा याचीदेही याचीडोळा आपण पहातोय हे खरंच वाटत नाही. खरंखुरं स्वप्नातलं गाव.

हळुहळु अपली नौका नेरुरपार जवळ येते. वाटेत नदीच्या तळाशी बुडी मारून रेती काढणारे मजुर त्यांच्या पडावासहीत दिसतात. मधुनच एखादा माड आपल्याशी हस्तांदोलन करून जवळीक साधण्यासाठी पुढे आलेला असतो. दिड-पावणेदोन तासांच्या फेरफटक्यानंतर वालावल हे आणखी एक अप्रतिम गाव लागतं.हेमाडपंथी वास्तुकलेचा नमुन असलेलं श्रीदेव लक्ष्मीनारायण मंदिर तर बघत राहण्या सारखं. मंदिरा लगतचा सुंदर तलाव आणि वनराईने नटलेल्या या गावात विवीध पक्षांचं दर्शनही घडतं. इतर पक्षांबरोबरच धनेश (Horn-bill) हा हमखास दिसणारा पक्षी. पुढे आपली नाव भोगवे या गावी जाते तेव्हा तो या नौकानयनातला परमोच्य बिंदु ठरतो. इथेच सागर-सरितेचं मिलन होतं. समुद्रपक्षांचे थवेच्या थवे इथे पाहायला मिळतात. एवढा वेळ फिरून क्षुधाशांतीसाठी जर आपल्याला थांबायचे असेल तर येथील गावकरी आपले तशी सोयही करतात.

समुद्र आणि सह्याद्रीचे कडे यांचं सख्य इथे पहायला मिळतं. किनार्‍याने चार किलोमिटर चालत गेल्यास निवतीचा किल्ला लागतो. पुढे डुंगोबा ही देवराई. फार पुर्वीपासून इथल्या वनसंपदेला कुणी हात लावलेला नसल्याने नेहमीपेक्षा वेगळी झाडं इथे पहायला मिळतात. समोरच्या दर्यात आपल्याला डॉल्फीनचं दर्शनही होतं. समुद्रात बुडणारा सोन्याचा गोळा पहाताना एका स्वप्नाची पुर्ती झालेली असते.


LinkWithin

Related Posts with Thumbnails